ETV Bharat / state

Shirdi Triple Murder : तिहेरी हत्याकांडानं शिर्डी हादरलं; जावयाकडून मेव्हण्यासह पत्नी, आजी सासूची हत्या - shirdi crime news

Shirdi Triple Murder Case : जावयानं पत्नी, मेव्हणा आणि आजी सासूचा खून केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना शिर्डीजवळील सावळीविहीर इथं घडली. जावयाला नाशिकमधून अटक केल्याची माहिती पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली.

Shirdi Triple Murder Case
घटनास्थळ
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 21, 2023, 9:48 AM IST

Updated : Sep 21, 2023, 11:47 AM IST

तिहेरी हत्याकांडानं शिर्डी हादरलं

शिर्डी : Shirdi Triple Murder Case : कौटुंबिक वादातून जावयानं मेव्हणा, पत्नी आणि आजी सासूचा निर्घृण खून केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना शिर्डीजवळील सावळीविहीर इथं बुधवारी रात्री घडली आहे. सुरेश निकम असं मारेकरी (Shirdi Crime News) जावयाचं नाव आहे. तर वर्षा सुरेश निकम (मारेकऱ्याची पत्नी), मेव्हणा रोहीत चांगदेव गायकवाड यांच्यासह आजी सासू यांचा मृत्यू (Shirdi Triple Murder) झालाय. जावयानं केलेल्या हल्ल्यात (Son In Law Attack) सासरे चांगदेव गायकवाड यांच्यासह त्यांची पत्नी आणि मुलगी जखमी असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिलीये.

जावयानं रात्री घडवलं हत्याकांड : चांगदेव गायकवाड यांचा परिवार सावळीविहीर गावातील विलासनगर परिसरात राहतो. बुधवारी रात्री उशीरा त्यांचा जावाई सुरेश निकम हा घरी आला. घरी आल्यानंतर त्यानं पुढं आलेल्या आजी सासूवर चाकूनं सपासप वार केले. त्यामुळं त्याची पत्नी आणि मेव्हणा त्याला सोडवण्यासाठी पुढं आले. मात्र, यावेळी सुरेश निकमनं त्यांच्यावरही सपासप वार केले. त्यानंतर घरातील त्याची मेव्हणी, सासू आणि सासरे चांगदेव गायकवाड यांच्यावरही सुरेश निकमनं चाकूनं वार केल्यानं ते गंभीर जखमी झाले. चाकूहल्ला केल्यानंतर मारेकरी सुरेश निकम त्याचा चुलत भाऊ रोशनसह घटनास्थळावरुन पळून गेल्याची माहिती या घटनेतील जखमी योगिता जाधव यांनी दिली.

कौटुंबिक छळामुळं पत्नी राहत होती माहेरी : मारेकरी सुरेश निकम याचा त्याची पत्नी वर्षासोबत वाद सुरु होता. सुरेश निकमचं कुटुंब छळ करत असल्याची तक्रार करत वर्षा माहेरी राहत असल्याचा दावा तिची बहीण योगिता जाधवनं केला आहे. पत्नी माहेरी राहत असल्यानं सुरेश निकम तिला घेण्यासाठी गेला होता, मात्र, वर्षाला पाठवण्यात आलं नव्हतं, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. यातूनच त्यांचा कुटुंबासोबत वाद सुरू होता.

आजी सासूचा घटनास्थळीच मृत्यू : मारेकरी सुरेश निकम हा बुधवारी रात्री अकरा साडेअकराच्या दरम्यान सावळीविहीर इथं आला होता. सुरेशनं घराचा दरवाजा ठोठावल्यानं आजी सासू पुढं आली, त्यामुळं सुरेशनं त्यांच्यावर चाकूनं सपासप वार केल्याचं योगिता जाधव यांनी सांगितलं. त्यानंतर मेव्हणा आणि पत्नीवर वार केले. आजी सासूवर अगोदर सपासप वार झाल्यानं त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचं प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं. तर सुरेश निकमची पत्नी वर्षा आणि त्याच्या मेव्हण्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला आहे. तर जखमी असलेल्या चांगदेव गायकवाड त्यांची पत्नी आणि मुलगी योगिता जाधव या तिघांवर साईबाबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

तिहेरी हत्याकांडानं हादरलं शिर्डी : सावळीविहीर इथं घडलेल्या तिहेरी हत्याकांडानं मोठी खळबळ उडाली आहे. मारेकरी सुरेश निकमनं रात्री हल्ला केल्यानंतर शेजाऱ्यांनी 112 ला फोन करुन घटनेची माहिती दिली. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ साईबाबा रुग्णालयात दाखल झाले आहे. पोलिसांनी तपासाची चक्रं फिरवून नाशिक जिल्ह्यातून मारेकरी सुरेश निकम आणि त्याचा चुलतभाऊ रोशन निकमला ताब्यात घेतलं आहे. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी घटनास्थळी दाखल होत घटनास्थळाची पाहणी केली आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.

हेही वाचा :

  1. Shirdi Murder Case : बिबट्यामुळे नाही तर 'या' कारणामुळे झाला वृद्धाचा मृत्यू, उघडकीस आले खळबळजनक सत्य
  2. Shirdi Murder : शिर्डीच्या कालिकानगर परिसरातील मयेश्वर कॉलनीत भावानेच केली बहीणीची हत्या

Last Updated : Sep 21, 2023, 11:47 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.