ETV Bharat / state

शिर्डी : कडक निर्बंधांमुळे प्रसाद विक्रेते अडचणीत, लाखोंचे नुकसान

राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली आहे, कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. याचा फटका शिर्डीतील लहान मोठ्या व्यवसायिकांना बसत असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साई मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आल्याने, दुकान परिसरात असलेले प्रसाद विक्रेते आर्थिक संकटात सापडले आहेत.

कडक निर्बंधांमुळे प्रसाद विक्रेते अडचणीत

author img

By

Published : Apr 27, 2021, 9:14 PM IST

शिर्डी - राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली आहे, कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. याचा फटका शिर्डीतील लहान मोठ्या व्यवसायिकांना बसत असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साई मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आल्याने, दुकान परिसरात असलेले प्रसाद विक्रेते आर्थिक संकटात सापडले आहेत. प्रसादांच्या पदार्थाची विक्री न झाल्याने ते फेकून देण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

साईबाबांच्या दर्शनासाठी देश विदेशातून लाखो भाविक शिर्डीत येतात. याच भाविकांवर मंदिर परिसरात असणारे छोटे मोठे व्यवसायिक अवलंबून असतात. शिर्डीत श्रीराम नवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो, या उत्सवासाठी देश विदेशतून लाखो भाविक शिर्डीत येतात. या पार्श्वभूमीवर शिर्डीतील प्रसाद विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात माल दुकानात भरून ठेवला होता. मात्र गेल्या वर्षी लॉकडाऊन लागले, लॉकडाऊन काळात व त्यापुढील काळात देखील अनेक दिवस मंदिर बंद असल्याने हे सर्व पदार्थ फेकून देण्याची वेळ त्यांच्यावर आली. आता देखील त्यांनी मालाची खरेदी केली होती, मात्र मंदिरच बंद असल्याने हे व्यवसायिक पुन्हा एकादा आर्थिक अडचणीमध्ये सापडले आहेत.

कडक निर्बंधांमुळे प्रसाद विक्रेते अडचणीत

व्यवसायिकांचे कोट्यावधिचे नुकसान

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यास सुरुवात झाल्याने, गेल्या वर्षी 17 मार्चला बंद करण्यात आलेले साईबाबा मंदिर तब्बल 9 महिन्यांनी म्हणजे 16 नोव्हेंबरला 2020 ला उघडण्यात आले होते. मंदिर उघडल्याने हळूहळू भाविक देखील दर्शनासाठी येऊ लागले होते, गेल्या वर्षीचा तोटा या वर्षी भरून काढू या आशेने विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली. मात्र ऐन श्रीरामनवमी उत्सवाच्या तोंडावर पुन्हा एकदा 5 एप्रिलला मंदिर बंद केल्याने, खरेदी केलेला माल फेकून देण्याची वेळ आल्याचे व्यवसायिक सांगत आहेत, या दोन वर्षांत तब्बल दोन कोटींपेक्षा अधिक फटका या सर्व व्यवसायिकांना बसला आहे.

हेही वाचा - 'निवडणूक आयोगच्या अध्यक्षांना केंद्र सरकारने राज्यपालपद बहाल केल्याची चर्चा'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.