शिर्डी : साईबाबा संस्थानला स्वच्छतेसाठीचे ISO नामांकन मिळलंय. हे ISO नामांकन साईबाबा संस्थानच्या साई प्रसादलय आणि भक्त निवासाला मिळाल्याने शिर्डीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय. शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी वर्षाकाठी करोडो तर दररोज 60 ते 70 हजार भाविक येतात. त्याचबरोबर उत्सव काळात साईबाबा प्रसादलयात 80 ते 90 हजार भाविक भोजनाचा अस्वाद घेतात.
ISO नामांकनाचे नूतनीकरण : आशियातील सर्वात मोठे प्रसादालय साई संस्थान चालवले जाते. साईबाबा संस्थानच्या साई प्रसादालयाला 2010 मध्ये ISO नामांकन मिळाले होते. तसेच साईबाबा संस्थानच्या साई आश्रम, भक्त निवास, साई प्रसादालय, भक्त निवास, दारावती भक्त निवास यांना देखील चांगली स्वच्छता राखण्यासाठी 2014 मध्ये ISO नामांकन मिळाले होते. साईबाबा संस्थानाच्या स्वच्छतेचा आढावा घेण्यासाठी दरवर्षी ISO अधिकारी शिर्डीत येतात. त्यानंतर दरवर्षी ISO नामांकनाचे नूतनीकरण केले जाते.
साई भक्ताने उचलला खर्च : दरम्यान, या आयएसओ नामांकनाच्या नूतनीकरणाचा खर्च बेंगळुरू येथील साई भक्त केशू मूर्ती यांनी उचलला आहे. साईबाबा संस्थानला हे आयएसओ नामांकन प्रमाणपत्र आज देण्यात आले आहे. साईभक्त केशू मूर्ती यांनी हे आयएसओ प्रमाणपत्र आज साई संस्थानला दिले आहे. साईबाबा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवा शंकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी आयएसओ प्रमाणपत्र स्विकारले आहे.
साईबाबा संस्थान नंबर वन : गेल्या 14 वर्षात साईबाबा संस्थान स्वच्छतेच्या बाबतीत नंबर वन झाले आहे. साई संस्थेचे आयएसओ नामांकन मिळवण्यासाठी साई संस्थेचे अध्यक्ष सुधाकर येरलागड्डा, साई संस्थेचे सीईओ पी. शिवा शंकर, डेप्युटी सीईओ राहुल जाधव यांच्यासह साई संस्थेचे प्रशासकीय अधिकारी दिलीप उगले, साई प्रसादालयाचे प्रमुख विष्णू थोरात आणि कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.
काय आहे आयएसओ नामांकन : ISO म्हणजे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशन. या संस्थेची स्थापना 23 फेब्रुवारी 1947 रोजी झाली होती. या संस्थेचे मुख्यालय जिनेव्हा, स्वित्झर्लंड येथे आहे. ISO नामांकन हे कंपन्या, संस्था, व्यवसाय, उद्योगांना दिले जाणारे दर्जेदार मानक प्रमाणपत्र आहे. 155 हून अधिक देश ISO चे सदस्य आहेत. ही एक स्वतंत्र संस्था आहे. ज्याद्वारे व्यावसायिक उत्पादने, सेवांची गुणवत्ता, सुरक्षितता, कार्यप्रदर्शन यासाठी मानके प्रदान करते. व्यवसायातील वाढती स्पर्धा पाहता ग्राहकांना दर्जेदार उत्पादने, सेवा देणेही गरजेचे झाले आहे. यामुळे शिर्डीच्या साईबाबा संस्थानाला वरील गुणवत्तेमुळे आयएसओ नामांकन प्रमाणपत्र बहाल करण्यात आले आहे.
हेही वाचा -