ETV Bharat / state

Shirdi Gurupournima Festival: साईनगरीत भक्तीसागर; गुरुपौर्णिमा उत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ - साई बाबा

शिर्डीत साईबाबांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या आणि तब्बल ११३ वर्षांची परंपरा लाभलेल्या साईनगरीतील गुरूपौर्णिमा उत्सवास एरवी मोठी गर्दी होत असते. मात्र या वर्षी कोरानामुळे साईबाबा मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद असल्याने भाविकांना मंदिरात जाऊन साईबाबाचे दर्शन घेता येत नाही आहे. असे असले तरी आज पहाटेपासूनच भाविकांनी शिर्डीत गर्दी केली होती.

Shirdi Saibaba: Gurupournima festival begins in a devotional atmosphere
साईनगरीत भक्तीसागर; गुरुपौर्णिमा उत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ
author img

By

Published : Jul 23, 2021, 11:44 AM IST

शिर्डी - साईबाबांच्या शिर्डीत तीन दिवस चालणाऱ्या गुरुपौर्णिमा उत्सवाला मोठ्या उत्साहात साजरा करण्यात झाली आहे. गुरुपौर्णिमा उत्सवानिम्मिताने साई मंदिर आणि परिसराला नयनरम्य फुलांची सजावट तसेच विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. आज (शुक्रवार) पहाटेच्या साईबाबांच्या काकड आरतीसाठी मंदिराबाहेर मोठ्या संख्येने भक्तांनी उपस्थिती लावली होती.

गुरुपौर्णिमा उत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ

काकड आरतीसाठी द्वारकामाई प्रांगणात भक्तांची रिघ -

शिर्डीत साईबाबांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या आणि तब्बल ११३ वर्षांची परंपरा लाभलेल्या साईनगरीतील गुरूपौर्णिमा उत्सवास एरवी मोठी गर्दी होत असते. मात्र या वर्षी कोरानामुळे साईबाबा मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद असल्याने भाविकांना मंदिरात जाऊन साईबाबाचे दर्शन घेता येत नाही आहे. असे असले तरी आज पहाटेपासूनच भाविकांनी शिर्डीत गर्दी केली होती. आज गुरुपौर्णिमाच्या दिवशी पहाटेच्या काकड आरतीला राज्यातील आणि राज्याबाहेरील आलेल्या भक्तांनी द्वारकामाई समोरील प्रांगणात उपस्थित राहत काकड आरती केली आहे.

Shirdi Gurupournima Festival
साईनगरीत भक्तीसागर

शेकडो भाविकांनी कळसाचे दर्शन -

आज उत्सवाच्या मुख्य दिवशी साईबाबांची काकड आरतीनंतर द्वारकामाईतील अखंड पारायणाची सांगता करण्यात आली. यावेळी प्रतिमा तसेच साईसच्चरित ग्रंथाची मिरवणुक काढण्यात आली होती. त्यानंतर दुपारी मध्यान्ह, सायंकाळी धुपारती तर रात्री शेजारती होणार आहेत. दुपारी मंदिरात किर्तनाचा कार्यक्रम होईल. आज कोविडमुळे गुरुपौर्णिमा उत्सव भक्ताविना साजरा झाला तरी दूरदूर वरून आलेल्या शेकडो भाविकांनी कळसाचे दर्शन घेऊन या उत्सवाला हजेरी लावली आहे.

रथ मिरवणुक कोरोनामुळे रद्द -

दर वर्षी शिर्डीत लाखोंच्या संखेने भाविक येऊन साईंच्या पहाटेच्या मिरवणुकीचा सोहळा पहात असतात. मात्र, सलग दुसऱ्या वर्षी भाविकांविनाच सर्व धार्मिक सोहळे पार पाडले जात आहेत. आज रात्री होणारी रथ मिरवणूकही कोरोनामुळे रद्द करण्यात आली आहे.

अमेरिकेतील साईभक्तांकडून फुलांच्या सजावट -

यंदाच्या उत्सवात अमेरिका येथील साईभक्त शुभा पाई यांच्या देणगीतून मंदिर व परिसरात फुलांची आकर्षक सजावट व सुनिल बाराहाते, साई समर्थ इलेक्ट्रीकल, शिर्डी यांनी मंदिर व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई याच बरोबरीने साईच्या विवीध छटा दाखविणारा लेझर शो ही केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.