ETV Bharat / state

साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदावरून काँग्रेस-राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरू - साई मंदिर विश्वस्त नियुक्ती न्यूज

साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदावरून काँग्रेस-राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरू असून हे पद खेचून आणण्याबरोबरच चांगला चेहरा देण्याचे आव्हान या पक्षांसमोर राहणार आहे.

साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदावरून काँग्रेस-राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरू

author img

By

Published : Jun 13, 2021, 3:51 PM IST

अहमदनगर - राज्यात एक नंबर तर देशात दोन नंबर श्रीमंत देवस्थान असलेल्या साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदावरून काँग्रेस-राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरू असून हे पद खेचून आणण्याबरोबरच चांगला चेहरा देण्याचे आव्हान या पक्षांसमोर राहणार आहे. एकीकडे राजकीय चेहऱ्यांची नावे चर्चेत आहेत, तर दुसरीकडे मात्र राजकारणातील प्रस्थापित चेहरे संस्थानरवर आल्यास सर्वसामान्य व भाविकांमध्ये रोष तयार होवू शकतो, अशीच परिस्थिती आहे.

साई मंदिर उघडण्यापूर्वीच विश्वस्त नियुक्तीचा बिगुल वाजेल

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने साई संस्थानवर विश्वस्त निवडीबाबत राज्य सरकारला ठणकावल्याने साई मंदिर उघडण्यापूर्वीच विश्वस्त नियुक्तीचा बिगुल वाजेल, अशी चिन्हे आहेत. यामुळे पडद्यामागील हालचालींना वेग आला आहे. राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी महाआघाडीचे सरकार आहे. सिद्धीविनायक देवस्थानचे अध्यक्षपद सेनेकडे असल्याने साईसंस्थानच्या अध्यक्षपदासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी दावेदार आहे.

आमदार रोहित पवार यांच्याही नावाची चर्चा
राष्ट्रवादीकडून कोपरगाव विधानसभेचे आमदार आशुतोष काळे यांचे नाव आघाडीवर असल्याचे समजते. स्थानिक, सामाजिक व राजकीय परिस्थिती माहिती असणे ही काळे यांची जमेची बाजू आहे. मात्र त्यांच्या कारखान्यात होणारी मद्य निर्मिती धार्मिक संस्थानच्या दृष्टीने नैतिकतेचा मुद्दा होवू शकतो. आमदार रोहित पवार यांच्याही नावाची चर्चा असून पवार संस्थानसाठी नवखे आहेत. मात्र त्यांना मोठे राजकीय पाठबळ आहे. याशिवाय कोविडमध्ये उल्लेखनीय काम करणारे आमदार निलेश लंके यांच्या नावासाठी जनतेतून होणारी मागणी ही लंकेची जमेची बाजू आहे. सामान्य कुटूंबातील असलेल्या लंके यांना मात्र अध्यक्ष होण्यासाठी पुरेसे राजकीय पाठबळ नाही.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांची नावे चर्चेत
काँग्रेसकडून आमदार डॉ. सुधीर तांबे व युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांची नावे चर्चेत आहेत. स्थानिक परिस्थितीची जाण असली तरी ते महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे जवळचे नातेवाईक असल्याने एकाच कुटूंबात अनेक पदे देतांना विचार होवू शकतो. श्रद्धा व विकासाची सांगड घालणारा, भक्तांच्या समस्या जाणून घेणारा, शिर्डीचे आंतराष्ट्रीय महत्व वृद्धींगत करतांनाच सामाजिक दृष्टीकोण असणारा अध्यक्ष साईसंस्थानला मिळावा, अशी भाविकांची सदैव अपेक्षा असते. सुदैवाने दोन्ही पक्षांकडे भाविकांना भावतील व विकास कामांसाठी धावतील असे अनेक डायनॅमिक चेहरे आहेत. त्यादृष्टीने निवड होण्यासाठी संबधित पक्षाकडे मात्र इच्छा शक्तीची गरज आहे. एकूणच संस्थानच्या अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते, याबाबत उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.