ETV Bharat / state

शिर्डीत प्रसादात गुंगीचे औषध टाकून भाविकांना लुटायची महिला, असा झाला पर्दाफाश - theif

साईबाबांच्या दुपारच्या आरतीवेळी भाविकांना मंदिर परिसरात संस्थानाच्यावतीने प्रसाद वितरीत करण्यात येतो. हाच प्रसाद घेत त्यात गूंगीचे औषध टाकून झारखंडमधून चोरीच्या उद्देशाने शिर्डीत आलेल्या पिंकी नावाच्या महीलेने शिर्डीतीतच राहणारी वृद्ध महिला छबुबाई गरडची लुट केल्याचे समोर आले.

शिर्डीत प्रसादात गुंगीचे औषध टाकून लुटायची महिला
author img

By

Published : Jul 1, 2019, 4:12 PM IST

Updated : Jul 1, 2019, 4:37 PM IST

अहमदनगर - शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी अनेक भक्त येत असतात. याचाच फायदा घेत देशभरातील चोरांचेही शिर्डीत आश्रय स्थान बनले आहे. अशात साईच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांना प्रसादात गुंगीचे औषध टाकून तो भक्तांना खाऊ घालत त्यांना लुटणाऱया महिलेला शिर्डीत अटक करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे

साईबाबांच्या दुपारच्या आरतीवेळी भाविकांना मंदिर परिसरात संस्थानाच्यावतीने प्रसाद वितरीत करण्यात येतो. हाच प्रसाद घेत त्यात गूंगीचे औषध टाकून झारखंडमधून चोरीच्या उद्देशाने शिर्डीत आलेल्या पिंकी नावाच्या महीलेने शिर्डीतीतच राहणारी वृद्ध महिला छबुबाई गरडची लुट केल्याचे समोर आले.

गुरुस्थान मंदिरा जवळ छबूबाई गेल्या असताना एका महिलेने त्यांना प्रसाद खायला दिला. त्यानंतर थोड्याच वेळात छबुबाई गूंगी येऊन पडल्या. काही वेळाने शुद्धीवर येताच आपल्या गळ्यातील सोन्याची पोत आणि पैसे गायब झाल्याचे छबुबाईंच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने संस्थानच्या सुरक्षा रक्षकांना याची माहीती दिली. या माहितीच्या आधारे संस्थानच्या सुरक्षा रक्षकांनी 19 जून रोजीचे मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता, एक महिला या वयोवृद्ध आजीच्या गळ्यातील पोत घेऊन जात असल्याचे उघड झाले. या महिलेला पकडण्यासाठी संस्थानच्या सुरक्षा रक्षकांनी तपास सुरू केला असता, ती महीला मंदिर परीसरातच आढळून आली. यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले.

शिर्डीत प्रसादात गुंगीचे औषध टाकून लुटायची महिला

अटक केलेल्या महिलेनी मुलांच्या शिक्षणासाठी चोरी केल्याची कबुली दिल्यानंतर तिने आतापर्यंत किती वेळा चोरी केली आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांची फसवणूक तसेच पाकीट मारीच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत असताना आता बाबांचा प्रसाद खावू घालून लुटण्याची घटना उघडकीस आल्याने भक्तांनी सावधगीरी बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी अनेक भक्त येतात त्यात देशभरातील चोरांचही शिर्डीत आश्रय स्थान बनलय..साईच्या दर्शनाला येणार्या भक्तांना साई संस्थानच्या वतीने वाटला जाणार प्रसाद घेवुन त्यातच गुंगीच औषध टाकुन तो इतरभक्तांना खावु घालत भक्तांना लुटणार्या महीलेला शिर्डीत अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे....

VO_साईबाबांच्या दुपारच्या माध्यान्ह आरतीचा भाविकाना मंदिर परिसरात संस्थानच्या वतीने प्रसाद वितरीत करण्यात येतो हाच प्रसाद घेवुन त्यात गूंगीचे औषध टाकत झारखंड मधुन चोरीच्या उद्देशाने शिर्डीत आलेल्या पिंक नावाच्या महीलेने शिर्डीतीतच राहणारी वृद्ध महिला छबुबाई गरड़ची लुट केल्याच समोर आलय.... गुरुस्थान मंदिरा जवळ छबूबाई गेल्या असताना एका महिलेने त्यांना प्रसाद खायला दिला त्या नंतर थोड्याच वेळात गूंगी येऊन त्या पडल्या थोड्या वेळयाने उठल्या नंतर आपल्या गळ्यातील तीन ग्रम सोन्याची पोत आणि काही पैसे गायब झाल्याच छबुबाईंच लक्षात आल्या नंतर त्यांनी संस्थानच्या सुरक्षा रक्षकाना याची माहीती दिली या माहितीच्या आधारे संस्थानच्या सुरक्षा रक्षकानी 19 जून रोजीच मंदिर परिसरातील सी सी टीव्ही फुटेज चेक केले असता एक महिला या वयोवृद्ध आजीच्या गळ्यातील पोत काढून घेऊन जात असल्याच उघड झाल त्या नंतर या महीलेला पकडण्यासाठी संस्थानच्या सुरक्षा रक्षकानी तपास सुरु केला असता ती महीला पुन्हा मंदीर परीसरात आढळुन आल्या नंतर तीला ताब्यात घेवुन पोलीसा़च्या ताब्यात दिले आहे....

BITE_मधुकर गंगावणे साई मंदिर सुरक्षा अधिकारी

VO_ ही महिला झारखंड येथील असून तिचे नाव पिंकी असल्याच तपासातुन पुढ आलय 19 जून रोजी दुपारी 1 वाजन्यचा सुमारास साई मंदिरात वयोवृद्ध महिलेला प्रसादातुन गूंगीचे औषध देत त्यांच्या कडील पैसे तसेच सोने काढून घेतले असल्याची काबुली या महीलेने दिलीये...

BITE_पिंकी चोर_ झारखंड

VO_ छब्बुबाई या वयोवृद्ध महिलेला गूंगीचे औषध देऊन सोन्याची पोत आणि काही पैसे घेऊन फरार झालेल्या झारखंड येथील पिंकी नावाच्या महिलेला साई संस्थानच्या सुरक्षा रक्षकाने पकडून आज शिर्डी पोलिसांनाच्या ताब्यात दिले असून लुट झालेल्या महीलेच्या तक्रारी नंतर शिर्डा पोलीस स्टेशन मध्ये पिंकी वर कलम 328 नुसार गुन्हा दाखल करत आरोपी पिंकीला अटक करण्यात आली आहे....

BITE_अनिल कटके पोलीस निरीक्षक शिर्डी पोलास स्टेशन

VO_अटक केलेल्या महीलेनी मुलांच्या शिक्षणा साठी चोरी केल्याची कबुली दिल्या नंतर आता आरोपी महीलेने आता पर्यन्त अश्या प्रकारचे किती गुन्हे केलेत याचा तपास सुरु केलाय साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांची फसवणूक तसेच पाकीट मारीच्या घटनेत दिवसांन दिवस वाढ होत असतांना आता बाबांचा प्रसाद खावु घालुन लुटण्याची घटना उघडकीस आल्याने भक्तांनी सावधगीरी बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे....Body:MH_AHM_Shirdi Dumb Medicine On Devotees Exclusive Story_1 July_MH10010Conclusion:MH_AHM_Shirdi Dumb Medicine On Devotees Exclusive Story_1 July_MH10010
Last Updated : Jul 1, 2019, 4:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.