शिर्डी साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाचा Board of Trustees of Saibaba Sansthan वतीने ठराव करत साईमंदिरात Sai Mandir Shirdi भाविकांना हार फुल प्रसाद घेवुन जाण्यास बंदी Temple closed for devotees घालण्यात आली आहे. या बंदी विरोधात आता शिर्डीत आंदोलने सुरू झाले आहे. साईबाबांच्या मंदिरात भाविकांना हार फुल प्रसाद पूर्वीप्रमाणे घेवुन जावून द्यावा ही मागणी घेवुन कोपरगाव येथील सामजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी गेल्या काही दिवसापूर्वी आंदोलन केले होते. आता पुन्हा हीच मागणी घेवुन शिर्डीतील सामाजिक कार्यकर्ते दिगंबर कोते यांनी साईबाबांच्या द्वारकामाई मंदिरासमोर उपोषण सुरू केले आहे.
साई मंदिरात फुल प्रसाद आणि पुजा साहित्य घेवून जाण्यावर बंदी कोरोना निर्बंधाच्या आधी साई मंदिरात हार फुल प्रसाद घेवुन भाविकांना जात येत होते. मात्र कोरोणा आल्याने राज्यातील सर्वच मंदिरांचे कावड भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले होते. त्यानंतर हाळूहाळू कोरोनाचे नियम शिथील झाल्यानंतर राज्य शासनाच्या आदेशानंतर साईमंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले झाले. साई दर्शनासाठी भाविकांनाची संख्या व मर्यादा देखिल हटवली गेली. सर्व काही सुरुळीत झाले. मात्र साई मंदिरात फुल प्रसाद आणि पुजा साहित्य घेवून जाण्यावर बंदी कायमच आहे. तसे निर्बधांचे फलक देखिल साई मंदिराच्या प्रवेशव्दारावर लावण्यात आले आहे.
गेल्या तीन दिवसा पासुन उपोषण सुरू साई मंदिरात सर्व काही सुरु झाले आहे. मात्र पुजा साहित्य बंद ठेवण्यात आले. देश विदेशातून भाविक साईबाबांचे दर्शन आणि फुल प्रसाद चढवण्यासाठी येतो. मात्र येथे त्यांना फुल प्रसाद बंदीच्या नियमांना सामोरे जावे लागते. गुलाबची गुच्छ घेवून भाविक दर्शन रांगेत गेला तर त्याच्याकडील पुजा सामान संस्थानच्या सुरक्षा रक्षाकाकडून काढून घेतले जाते. त्यामुळे भाविकांस साईदर्शनाचे पुरेपुर समाधान मिळत नाही. साई मंदिरात फुल हार बंदी असल्याने परिसरातील फुल उत्पादक शेतकरी आणि व्यावसायिक यामुळे अडचणीत सापडला आहे. आधीच कोरोनाच्या दोन वर्षात शिर्डीचे आर्थिक समीकरण बिघडले असून त्यात अशा बंदी व नियमांमुळे अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे साई संस्थानच्या या निर्णया विरोधात गेल्या काही दिवसांनापूर्वी कोपरगाव येथील सामजिक कार्यकर्ते संजय काळे तबल्ल 16 किलो मिटर पाई चालत डोक्यावर फुलांनी भरलेली कटोरी घेवुन साईबाबांच्या द्वारकामाई मंदिरासमोर फुले वाहून आंदोलन केले होते. पुन्हा हीच मागणी घेवुन शिर्डीतील सामजिक कार्यकर्ते दिगंबर कोते यांनी साईबाबांच्या द्वारकामाई मंदिरासमोर गेल्या तीन दिवसा पासुन उपोषण सुरू केले असुन आज या उपोषणाचा चौथा दिवस असल्याचे कोते म्हणाले आहे.
देव हा श्रद्धेचा भूकेला असतो साईबाबांचे दर्शन करण्यासाठी कोट्यावधी भाविक वर्षाकाठी शिर्डीला येतात. अशावेळी आलेल्या भाविकाच्या श्रद्धेचा आणि भावनांचा आधार घेत फुल हार प्रसाद अशा पुजा साहित्याच्या माध्यमातून त्यांना फसवले जाते. दोनशे रुपयांची फुल माळा दोन हजार रुपयांना विकून भाविकांची लुबाडणूक केल्याच्या अनेक तक्रारी साईसंस्थानला प्राप्त आहेत. तसेच साई समाधीवर चढवलेली फुले पायदळी येवून मंदिरात फुलांचा एकप्रकारे चिखल होत होता. त्यास स्वच्छ करण्यासाठी अतिरिक्त वेळ लागत असतो. त्यामुळे त्याचा परिणाम भाविकांच्या दर्शन वेळेवर होत असल्यानं फुल प्रसाद हार नारळ बंदीचा निर्णय घेतल्याचं साईसंस्थानचे विश्वस्त डॉ.एकनाथ गोंदकर यांनी सांगीतले. देव हा श्रद्धेचा भूकेला असतो असं म्हणटल जाते. भाविक देखिल याच श्रद्धेपोटी देवाच्या मंदिरात दर्शनासाठी जातात. दर्शन घेतल्यानंतर फुल प्रसाद देवाला वाहिली जावी ही श्रद्धा असते. मात्र ही श्रद्धा अर्पित करताना त्यात पारदर्शकता असणे महत्वाचे आहे. भाविकांना फुल प्रसाद विक्री करताना त्यांची वाजवी किमंत असावी. फुल-भांडार दुकानात फुल प्रसादांच्या विक्रीचे मोठ्या अक्षरातील फलक असणे महत्वाचे आहे. जेणेकरून भाविकांची फसवणूक होणार नाही. मात्र शिर्डी नगरपंचायत कडुन ती वेळेत लावली गेली नव्हती आता आंदोलन सुरु झाल्याने लावली गेली आहे. फुल प्रसाद बंदी करण्याची वेळ साई संस्थान वर का आली जर ती बंद होवु नये अस खरच विक्रेते आणि ती भक्तांनी कोणत्या दुकानातुन घ्यावी त्यासाठी मध्यस्थी करण्यांना वाटत असेल तर त्यासाठी नियमावली आणि त्याच देवाला स्मरून पालन होणे देखिल गरजेचे आहे.