ETV Bharat / state

Deepak Kesarkar : 'मातोश्री, शिवसेना भवनावर दावा केला नाही, परंतु...'; दीपक केसरकरांनी स्पष्टचं सांगितलं - दीपक केसरकर मातोश्री

आम्ही मातोश्री, शिवसेना भवनावर दावा करायला गेलेलो नाही. मातोश्री हे बाळासाहेबांच निवास्थान होतं, ते आमचं आदरस्थान आहे, ते तसेच राहील, असे स्पष्टीकरण दीपक केसरकरांंनी दिलं ( Deepak Kesarkar On Matoshree And Shivsena Bhavan ) आहे.

Deepak Kesarkar
Deepak Kesarkar
author img

By

Published : Jul 20, 2022, 7:03 PM IST

शिर्डी ( अहमदनगर ) - आम्ही मातोश्री, शिवसेना भवनावर दावा करायला गेलेलो नाही. मातोश्री हे बाळासाहेबांच निवास्थान होतं, ते आमचं आदरस्थान आहे, ते तसेच राहील. शिवसेना भवनाला ही बाळासाहेबांचे पाऊल लागलं आहे. बाळासाहेंच्या वारशाबद्दल दावा केला नाही. परंतु, लोकशाहीत पक्ष हा लोकांनी बनलेला असतो. त्यालाच पक्ष म्हणतात. बाळासाहेबांशी नातं असलं तर त्या नात्याचा मान जपला जाईल, असे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी स्पष्ट ( Deepak Kesarkar On Matoshree And Shivsena Bhavan ) केलं.

बंडखोर 16 आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर आज ( 20 जुलै ) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. मात्र, शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर हे शिर्डीत साईबाबांच्या चरणी आले होते. त्यांनी साईबाबांच्या मध्यान्ह आरतीलाही हजेरी लावली आहे. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

'साईबाबांनी सदबुध्दी द्यावी' - दीपक केसरकर म्हणाले, बाळासाहेब ठाकरेंचा विचार घेवुन आम्ही पुढे निघालो आहोत. मात्र, पक्षातील राहिलेल्या लोकांकडून जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करुन देण्याचं काम केलं जात आहे. राज्यात स्थिर सरकार आलं आहे आणि तेच कायम राहणार आहे. सध्या ही जी लढाई सुरु आहे, ती थांबवता आली पाहीजे. मात्र, लढाई कुठुन होतेय ते तुम्हाला माहीत आहे. तेच थांबवू शकतात त्यांना साईबाबांनी सदबुध्दी द्यावी ही प्रार्थना केल्याचं केसरकरांनी म्हटलं.

दीपक केसरकर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना

'काही तरी बोलू नका, जनता वेडी...' - बंडखोर आमदारांनी राजीनामे देत पुन्हा निवडणुकीला सामोर जा, असे आव्हान आदित्य ठाकरेंनी दिलं होते. 'कोकणात नारायण राणे शिवसेनेतुन बाहेर पडले होते. त्यावेळी केवळ शाम सावंत यांचा पराभव झाला होता. बाकीचे सगळे निवडून आले होते. त्यामुळे तुम्ही कोणता वीस वर्षाचा इतिहास सांगतायेत हा आत्ताचा इतिहास आहे. त्यामुळे काही तरी बोलू नका, जनता वेडी नसते आणि जनतेला कोणी ग्रुहीत धरु नये. जनतेची तुम्ही जेवढी सेवा कराल, तेवढी जनता तुम्हाला भरभरुन देते,' असे प्रत्युत्तर केसरकरांनी दिलं आहे.

'कोकणाच्या विकासासाठी राणेंसोबत जाऊ' - कोकणात राणे विरुध्द केसरकर संघर्ष आता थांबनार का?, असा सवाल विचारला असता केसरकर म्हणाले की, राणेंशी माझा व्यक्तीगत विरोध नाही. कोकणाच्या विकासासाठी आम्ही एकत्र येऊ. विदर्भासाठी मराठवाड्यासाठी महामंडळ आहे. कोकणासाठी नाही. त्यामुळे कोकणाचाही बँकलॉग तो आम्ही नाही भरुन काढणार. जर आम्ही भांडत बसलो, तर कोकणची जनता आम्हाला माफ नाही करणार, असेही केसरकरांनी म्हटलं.

'शरद पवारांपासून आव्हाडांनी मला लांब लोटल' - शरद पवारांपासून जितेंद्र आव्हाडांनी लांब लोटल, तसं कसब संजय राऊतांमध्ये असेल. नेत्यांशी असलेली जवळीकता तुटू शकत नाही. त्यासाठी आव्हांडासारखे कार्यकर्ते तिथे तयार व्हावे लागतात. ते कसब कदाचीत राऊत साहेबांना मिळालं असेल. ते देवाने त्यांना दिलं आहे, असेही दीपक केसरकर म्हणाले.

हेही वाचा - CM On SC Hearing : राज्यघटनेनुसार सरकार बनवलं नियमबाह्य काहीही नाही; मुख्यमंत्र्यांचा दावा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.