अहमदनगर : संगमनेर तालुक्यातील दरेवाडी गावाची लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार 1 हजार 12 एवढी असली तरी ती आता वाढली आहे. गावातील अनेक तरुण उच्चशिक्षित आहेत. मात्र, आज ते चांगली शेती करत आहे. मात्र त्यांचे लग्न होण्यात अडचणी येत आहेत. कारण मुलीचे पाहुणे म्हणतात मुलगा काय करतो? शेती म्हटल्यावर कुणी मुलगी देत नाही. त्यामुळे आज गावातील जवळपास पन्नास ते पंचावन्न मुलांची लग्ने झालेली नाहीत. गावातील निवडून आलेले सरपंच आनंदा दरगुडे यांनी गावातील मुलांचे लग्न लावून देण्याची अनोखी शक्कल लढवली आहे. मुलांचे लग्न व्हावे यासाठी दरेवाडी गावातील मुलांशी लग्न करणाऱ्या मुलीला रोख 5 हजार 555 रुपये तसेच घरगुती साहित्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शेतकरी अर्धांगिनी योजने : सरपंच आनंदा दरगुडे यांनी या योजनेला शेतकरी अर्धांगिनी योजना असे, नाव दिले आहे. विशेष म्हणजे सरपंचांनीच ही योजना सुरू केली आहे. लग्न झालेल्या मुलीला ते रोख रक्कम तसेच संसारोपयोगी साहित्य देणार आहेत. यासाठी त्यांना उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक यांचे सहकार्य लाभले आहे. राज्यात अशी योजना राबविणारे ते पहिलेच सरपंच असल्याचे काहींनी सांगितले.
उपयुक्त साहित्याची भेट: शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. मात्र शेतकर्यांच्या मुलांना कोणी मुलगी देत नाही. त्यामुळे आम्ही शेतकरी अर्धांगिनी ही योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून दरेवाडी गावातील शेतकऱ्याच्या मुलाशी विवाह करणाऱ्या मुलीला रोख रक्कम, उपयुक्त साहित्य भेट देण्यात येणार असल्याची माहिती सरपंचानी दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कुटुंबाला थोडा तरी हातभार लागेल. असे दरेवाडी गावचे सरपंच आनंदा दरगुडे यांनी सांगितले आहे.
शेतकऱ्यांना मुली देण्यास टाळाटाळ : दरेवाडी गावातील अनेक शेतकऱ्यांची मुले उच्चशिक्षित आहेत. मात्र, त्या मुलांचे लग्न झाले नाही. त्यामुळे लग्नाची समस्या आज गावत ओढावली आहे. कोरोना सारखा आजार झाला की शहरातून लोक गावात यायचे. मात्र, शेतकऱ्याच्या मुलांना मुली ते देत नाही, त्यामुळे हे चुकीचे आहे. शेतकऱ्यांच्या मुलांसाठी मनाचे औदार्य दाखवून शेतकऱ्यांच्या मुलांना मुली देणे गरजेचे असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते जनार्दन मैड यांनी व्यक्त केले.
Farmers Marriage Issue : आता शेतकऱ्यांच्या मुलासोबत लग्न कराल तर मिळतील पैसे; जाणून घ्या खास योजना
अहमदनगर जिल्ह्यातील दरेवाडी गावचे लोकनियुक्त सरपंच आनंदा दरगुडे यांनी एक अनोखी युक्ती लढवली आहे. जी मुलगी गावातील शेतकर्याच्या मुलाशी विवाह करेल त्या मुलीस रोख रक्कम 5 हजार 555 रूपये, संसार उपयोगी साहित्य भेट देण्यात येणार आहे. शेतकरी अर्धांगिनी असे या योजनेचे नावही ठेवले आहे. गावातील शेतकर्यांच्या मुलांचे विवाह व्हावे म्हणून योजना सुरू करण्यात आली असल्याची माहिती सरपंच आनंदा दरगुडे यांनी दिली आहे.