अहमदनगर- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते डी. पी. त्रिपाठी यांच्या दुःखद निधनाबद्दल पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दुःख व्यक्त केले आहे. अहमदनगरमध्ये आज शरद पवार उपस्थित असताना आपल्या सहकार्याच्या दुःखद निधनाचे वृत्त येताच पवार यांनी दुःख व्यक्त केले.
आपल्या सहकार्याबद्दल संवेदना व्यक्त करताना पवार म्हणाले, त्रिपाठी हे अभ्यासू लेखक आणि उत्तम राजकारणी आणि हिंदीमधील विद्वान होते अशी, भावना व्यक्त केली. राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर निभावलेल्या भूमिकेचा आवर्जून उल्लेख केला.
हेही वाचा - VIDEO - भाई का बड्डे... तलवारी हातात घेऊन नाचले तरुण