ETV Bharat / state

शनिशिंगणापुरात भाविकांशिवाय शनिजयंती साजरी - Shani Jayanti celebration without devotees

आज स्वयंभू शनिमूर्तीला वस्र, अलंकार व मुखवटा घालण्यात आला होता. चौथऱ्याला शनिभक्त व्यंकटेश राव यांच्या वतीने फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.

Shani Jayanti celebration
शनिजयंती साजरी
author img

By

Published : May 22, 2020, 7:21 PM IST

अहमदनगर - शनिशिंगणापुर येथे कोरोना संसर्गाच्या स्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रथमच भाविकांच्या विरहित फक्त पंचवीस जणांच्या उपस्थितीमध्ये शनिजयंती निमित्त अभिषेक आणि आरती सोहळा करण्यात आला.

शनिशिंगणापुरात भाविकांशिवाय शनिजयंती साजरी

कोरोना संसर्गास प्रतिबंध म्हणून दोन महिन्यापासून शनीमंदीर दर्शनासाठी बंद करण्यात आलेले आहे. आज शनिजयंती निमित्त पोलीस प्रशासन व देवस्थान सुरक्षा विभागाने महाद्वार येथून एकाही भाविकास आत सोडले नाही. पुरोहित अशोक कुलकर्णी यांनी स्वयंभू शनिमुर्तीला गंगेच्या पाण्याने अभिषेक घातला. महंत त्रिबंक महाराज यांच्या हस्ते महापूजा व आरती सोहळा झाला. दुपारी बारा वाजता झालेल्या आरती सोहळ्यास देवस्थानचे कोषाध्यक्ष योगेश बानकर, विश्वस्त भागवत बानकर, विनायक दरंदले, मंदिराचे पुरोहित असे मोजकेच लोक उपस्थित होते. आज स्वयंभू शनिमूर्तीला वस्र, अलंकार व मुखवटा घालण्यात आला होता. चौथऱ्याला शनिभक्त व्यंकटेश राव यांच्या वतीने फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.