ETV Bharat / state

Shani Amavasya : शनी भक्ताकडून मूर्तीस एक कोटी रुपयांचा सोन्याचा कलश अर्पण - शनिशिंगणापूरमध्ये भाविकांची प्रचंड गर्दी

पौष शनी अमावस्या निमित्ताने शनिवारी देशभरातून लाखोंच्या संख्येने शनीभक्त शनी शिंगणापूरमध्ये दाखल झाले होते. यावेळी एका भक्ताकडून शनी मूर्तीस एक कोटी रुपयांचा सोन्याचा कलश अर्पण केला. भाविकाने हे गुप्तदान केले आहे.

A gold urn worth one crore rupees was offered to the idol by a Shani devotee
शनी भक्ताकडून मूर्तीस एक कोटी रुपयांचा सोन्याचा कलश अर्पण
author img

By

Published : Jan 22, 2023, 10:23 AM IST

Updated : Jan 23, 2023, 12:42 PM IST

अहमदनगर : शनिशिंगणापूरला ओडिशामधील एका भक्ताने एक किलो 700 ग्रॅम सोने व पाच किलो चांदीचा वापर केलेला एक कोटी रुपयाचा कलश शनी अमावस्येच्या निमित्ताने शनी देवाला अर्पण केला आहे. अनेक वर्षानंतर आलेल्या पौष शनी अमावस्या निमित्ताने शनिवारी दिवसभर आणि रविवारी पहाटेपर्यंत देशभरातून लाखोंच्या संख्येने शनीभक्त शनी शिंगणापूरमध्ये दाखल झाले होते. भक्तांच्या प्रचंड गर्दीचे नियोजन आणि नागरी, आरोग्य सुविधा या शनी देवस्थानच्या वतीने पुरवण्यात आल्या. शनिवारी येणारी अमावस्या हा शनिभक्तांसाठी मोठी पर्वणी असते. त्यात पौष महिन्यात तब्बल वीस वर्षानंतर पौष शनी अमावस्या आल्याने भक्तांनी या दुर्मिळ पर्वणीचा लाभ घेतला.

भक्ताचे एक कोटीचे गुप्तदान : या निमित्ताने एका भक्ताने सहपरिवार येत शनीमूर्ती चरणी सोन्या-चांदीचा एक कोटीचा कलश अर्पण केला. मात्र या भक्ताने आपले नाव जाहीर न करण्याची विनंती देवस्थान प्रशासनाला केली. सायंकाळच्या आरतीनंतर हा स्वर्ण कलश मूर्तीसमोर विधी पूर्वक अर्पण करण्यात आला.मात्र ज्या भक्ताने हा सुवर्णकलश अर्पण केला आहे. त्याचे नाव गुप्त ठेवण्यात यावे, अशी विनंती त्या भक्ताने केल्याने त्याचे नाव देवस्थाने जाहीर केले नाही. सदर भाविकाने हे गुप्तदान केले आहे.

नगर जिल्ह्यातच तयार केला कलश : सोनई येथील भळगट ज्वेलर्सचे संचालक आनंद भळगट यांनी हा कलश तयार केला आहे. या कलशावर श्री शनेश्वराय नमः कोरण्यात आले असून यावर शनी देवाचे मंत्रही कोरण्यात आले आहे. या सुवर्णकलशात नऊ लिटर तेल बसणार आहे. आजपर्यंतच्या दानात सर्वाधिक मोठे दान या कलशाचे असल्याची सध्या चर्चा शनिशिंगणापूरमध्ये आहे.

शनी अमावस्येला गंगा स्नानाचे महत्त्व : शनी अमावस्येच्या दिवशी गंगेत स्नान करणे फार महत्वाचे आहे. या दिवशी गंगेत स्नान केल्याने अमृत स्नान करण्याइतके पुण्य मिळते. विशेषत: ज्यांची शनीची महादशा आहे. त्यांनी या दिवशी गंगा स्नानासह काही विशेष उपाय अवश्य करावेत. असे केल्याने शनीदेवाची अपार कृपा होते आणि सर्व संकटे दूर होतात. जाणून घेऊ या शनिश्चरी अमावस्येला शनीला प्रसन्न करण्यासाठी हे उपाय केले जातात.

हेही वाचा : Konkan Teacher Constituency Election : सत्तांतरानंतर भाजप शिंदे गट कोकण शिक्षक मतदार निवडणुकीसाठी सज्ज, निवडणुकीच्या मेळाव्यासाठी दिग्गजांची हजेरी

Last Updated : Jan 23, 2023, 12:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.