ETV Bharat / state

चारा छावण्या बंदच्या निषेधार्थ दुसऱ्या दिवशीही आंदोलन; विष पिण्याची शेतकऱ्यांची धमकी - जिल्हा परिषद

नगर तालुक्यातील छावण्यांवर जिल्हा प्रशासनाने कारवाई करत ४ चारा छावण्या बंद केल्या होत्या. तर याच्या निषेधार्थ शिवसेनेच्यावतीने आंदोलन सुरू करण्यात आले होते. तर आज (३० जुलै) दुसऱ्या दिवशीही हे आंदोलन सुरू आहे. प्रशासनाने तातडीने या सर्व चारा छावण्या सुरू कराव्यात अन्यथा विष सेवन करुन आत्महत्या करू, असा इशारा शेतकऱ्यांनी दिलेला आहे.

चारा छावण्या बंदच्या निषेधार्थ दुसऱ्या दिवशीही शेतकऱ्यांचे आंदोलन
author img

By

Published : Jul 30, 2019, 6:05 PM IST

Updated : Jul 30, 2019, 6:49 PM IST

अहमदनगर - जिल्हा प्रशासनाने नगर तालुक्यातील ४ चारा छावण्यांवर एकतर्फी कारवाई केल्याचा आरोप करत शिवसेनेच्यावतीने आंदोलन सुरू करण्यात आले. तर आज (३० जुलै) दुसऱ्या दिवशीही हे आंदोलन सुरू आहे. प्रशासनाने तातडीने या सर्व चारा छावण्या सुरू कराव्यात अन्यथा विष सेवन आत्महत्या करू, असा इशारा शेतकऱ्यांनी दिलेला आहे.

चारा छावण्या बंदच्या निषेधार्थ दुसऱ्या दिवशीही आंदोलन

नगर तहसील कार्यालयाजवळ आज या चारा छावणी परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येत घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध केला. शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. सत्तेत आमचे सरकार असले तरी प्रशासकीय अधिकारी सरकारला बदनाम करण्यासाठी चुकीचे कारणे देत चारा छावण्या बंद करून शेतकरीवर्गाला वेठीस धरत आहे. यामागे प्रशासनाचा सरकारला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा डाव असल्याचा संशय यावेळी संदेश कार्ले यांनी व्यक्त केला. तसेच शिर्डीमध्ये होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात संतप्त शेतकरी, सरपंच, उपसरपंच हे या प्रश्नावर गोंधळ घालतील. याला जबाबदार प्रशासन असेल, असा इशाराही संदेश कार्ले यांनी दिला.

जोपर्यंत प्रशासन या चारा छावण्यांची कारवाई मागे घेत त्या पुन्हा सुरू करण्याचे आदेश देत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील. जर प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास शेतकरी विष घेऊन आत्महत्या करतील, असा संतप्त इशारा यावेळी देण्यात आला.

Intro:अहमदनगर- चारा छावण्या बंदच्या प्रशासकीय निर्णयाच्या निषेधार्थ दुसऱ्या दिवशीही शेतकऱ्यांचे आंदोलन..विष प्रश्न करण्याची शेतकऱ्यांची धमकी.. Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_01_cattel_camp_protest_pkg_7204297

अहमदनगर- चारा छावण्या बंदच्या प्रशासकीय निर्णयाच्या निषेधार्थ दुसऱ्या दिवशीही शेतकऱ्यांचे आंदोलन..विष प्रश्न करण्याची शेतकऱ्यांची धमकी..

अहमदनगर- जिल्हा प्रशासनाने नगर तालुक्यातील चार चारा छावण्यांवर एकतर्फी कारवाई केल्याचा आरोप करत शिवसेनेच्या वतीने सुरू असलेले आंदोलन आज मंगळवारी दुसऱ्या दिवशीही सुरू आहे. प्रशासनाने तातडीने या सर्व चारा छावण्या सुरू कराव्यात आणि शेतकरी आणि जनावरांना दिलासा द्यावा अन्यथा विष प्राशन करून आत्महत्या करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिलेला आहे. नगर तहसील कार्यालय आज या चारा छावणी परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येत घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध केला. शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी ह्या आंदोलनाचे नेतृत्व केलं. सत्तेत आमचे सरकार असले तरी प्रशासकीय अधिकारी सरकारला बदनाम करण्यासाठी चुकीचे कारणे देत चारा छावण्या बंद करून शेतकरीवर्गाला वेठीस धरत आहे, यामागं प्रशासनाचा सरकारला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा डाव असल्याचा संशय यावेळी संदेश कार्ले यांनी व्यक्त केला. तसेच शिर्डीमध्ये होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात संतप्त शेतकरी, सरपंच, उपसरपंच हे या प्रश्नावर गोंधळ घालतील याला जबाबदार प्रशासन असेल असा इशाराही संदेश कार्ले यांनी दिला. जो पर्यंत प्रशासन या चारा छावण्यांची कारवाई मागे घेत त्या पुन्हा सुरू करण्याचे आदेश देत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील आणि प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास शेतकरी विष प्राशन करतील असा संतप्त इशारा यावेळी देण्यात आला.

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगरConclusion:अहमदनगर- चारा छावण्या बंदच्या प्रशासकीय निर्णयाच्या निषेधार्थ दुसऱ्या दिवशीही शेतकऱ्यांचे आंदोलन..विष प्रश्न करण्याची शेतकऱ्यांची धमकी..
Last Updated : Jul 30, 2019, 6:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.