ETV Bharat / state

Sanjay Raut : छत्रपतींचा अपमान करणाऱ्या राज्यपालांवर अद्याप कारवाई का नाही झाली? संजय राऊतांचा सवाल... - खासदार संजय राऊत

खासदार संजय राऊत तुरूंगातून सुटल्यानंतर पहिल्यांदाच परिवारासह शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी ( Sanjay Raut in Shirdi ) आले आहेत. दरम्यान त्यांनी पत्रकार परिषदेतून राज्य सरकारवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी सीमावादाबाबतही प्रतिक्रिया व्यक्त केली.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Dec 3, 2022, 10:36 PM IST

अहमदनगर (शिर्डी) : मोहम्मद पैगबारांविषयी टिपणी करणाऱ्या नुपूर शर्मा यांना पक्षातून काढण्यात आले आणि पदावरून हकालपट्टी करण्यात आली. शर्माच्या विरोधात कारवाई मग छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या त्रिवेदी आणि राज्यपाल यांच्यावर अद्याप कारवाई का झाली नाही? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी भाजपला केला आहे. खासदार राऊत यांनी आज सहकुटुंब शिर्डी साईबाबाचे दर्शन ( Sanjay Raut in Shirdi ) घेतले,त्यावेळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

शिंदे गटाला आव्हान - गद्दार आमच्या सारख्या निष्ठावंतां शिवसैनिकांना शिव्या देत असतील तर हा आमच्या निष्ठेचा विजय आहे. यांना शिव्या देण्याची एवढीच हौस असेल तर राज्यात अनेक प्रकरण घडत आहेत. यांनी रस्त्यावर उतरले पाहिजे. महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचा अपमान होत असताना त्यांनी किती लोकांना शिव्या दिल्या ? असा सवाल केला. शिवाजी महाराजांचा अपमान सुरू आहे. तुम्हाला संधी मिळाली आहे. शिव्या द्या. राजभवनाच्या बाहेर उभं राहून देता का शिव्या असं आव्हानच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाला दिलं आहे.

लक्ष विचलित करण्यासाठी वाद - महाराष्ट्रातील गावांनी कर्नाटकात जावे म्हणून कर्नाटक सरकारने योजनाबद्ध कार्यक्रम आखला आहे. सीमाभाग लढा आणि शिवाजी महाराजांच्या अपमानावरून लक्ष विचलित करण्यासाठी हा वाद काढला आहे. या विषयावर महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांनी विधानही केलं नाही. याकडेही त्यांनी लक्ष वेधलं. तसेच आमचं कर्नाटकातील जनतेशी भांडण नाही. हा मानवतेचा लढा आहे. 20 लाख मराठी बांधव 60 वर्षापासून लढत आहेत. पण कानडी सरकार त्यांच्यावर वारंवार अन्याय करत आहे, असेही संजय राऊत म्हणाले आहे.ऋ

आम्ही घाबरणार नाही - तुमच्यात हिंंमत असेल तर भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्याला शिव्या द्या. महाराष्ट्रावर कर्नाटकाचा हल्ला होत आहे. मुंबईला शिव्या देताय ? नाही. शिव्या कुणाला देताय निष्ठावंतांना शिवसैनिकांना जरूर शिव्या द्या. तुमच्या शिव्या ऐकण्यासाठी महाराष्ट्र उत्सुक आहे. त्यांच्या शिव्यांचा काही परिणाम होणार नाही. हे लोक वेडे झाले आहेत. वेडे लोक आहेत असा हल्ला संजय राऊत यांनी चढवला. शिवसेनेत असेही लोक आहेत. ज्यांनी गुडघे टेकवले नाही. आजही लढत आहेत. कितीही चौकशा झाल्या तरी आम्ही लढणारे लोक आहोत. ही बाळासाहेब ठाकरेंची पार्टी आहे. हा वाघांचा पक्ष आहे. घाबरणार नाही. बंदुकीची गोळी आली तरी आम्ही घाबरणार नाही, असा इशाराच संजय राऊतानी दिला.

दर्शनसाठी कायम येतो - खासदार राऊत पुढे म्हणाले की, जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा कुटुंब आणि मित्र परिवार पक्ष न्यायालयीन लढाई लढत असताना आपण देवाच्या चरणीही जातो. ही आपली परंपरा आहे. मी शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी कायम शिर्डीत येत असतो. मात्र मधील काळात आलो नाही. मला या भूमीचा आशीर्वाद मिळाला आहे, असल्याचं खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.