ETV Bharat / state

पिंपळगाव खांड धरण ‘ओव्हर फ्लो’; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

सध्या पिंपळगाव खांड धरणातून दोनशे क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे. धरणाच्या पाणलोटात भागात पावसाने पुन्हा एकदा जोर दाखविला तर मुळेच्या विसर्गात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

author img

By

Published : Jul 6, 2019, 3:06 PM IST

अहमदनगर

अहमदनगर - संगमनेर अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेले मुळा नदीवरील पिंपळगाव खांड धरण पूर्णक्षमतेने भरले आहे. या धरणाच्या सांडव्यातून शनिवारी दुपारी बाराच्या दरम्यान पाणी वाहू लागल्याने मुळा नदी वाहती झाली. भंडारदरा पाणलोटात क्षेत्रात पावसाने उघडीप घेतल्याने धरणात पाण्याची आवक काही अंशी मंदावली आहे.

मुळा नदीच्या पाणलोट क्षेत्रात जूनच्या शेवटच्या आठवड्यात मुसळधार पाऊस पडत होता. या पावसामुळे मुळा नदीवरील आंबित हे पहिले धरण पूर्ण क्षमतेने भरले. हे धरण भरल्यानंतर पिंपळगाव खांड धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू झाली होती. ६०० द.ल.घ.फु क्षमता असलेल्या पिंपळगाव खांड धरणात पाण्याची आठवड्यापासून आवक सुरू होती. या धरणात पाणी साचल्याने कोतुळचा पूल बुधवारी (३ जुलै) पुन्हा पाण्याखाली गेला आहे.

पिंपळगाव खांड धरण ‘ओव्हर फ्लो

मुळा खोऱ्यात पावसाने उघडीप घेतल्याने पिंपळगाव खांड धरणात पाण्याची आवक मंदावली होती. शुक्रवारी दिवसभर चांगला पाऊस झाल्याने धरण शनिवारी दुपारी बारा वाजता पूर्ण क्षमतेने भरले आणि पाणी मुळा धरणाच्या दिशेने झेपावले. सध्या पिंपळगाव खांड धरणातून दोनशे क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे. धरणाच्या पाणलोटात भागात पावसाने पुन्हा एकदा जोर दाखविला तर मुळेच्या विसर्गात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पिंपळगाव खांड धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे लाभधारक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मुळा पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यास पाच ते सहा दिवसात मुळा धरणात नवीन पाण्याची आवक सुरू होणार आहे.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ संगमनेर अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेले मुळा नदीवरील पिंपळगाव खांड धरण पूर्णक्षमतेने भरले आहे. या धरणाच्या सांडव्यातून पाणी शनिवारी दुपारी बाराच्या दरम्यान वाहत असल्याने मुळा नदी वाहती झाली आहे.भंडारदरा पाणलोटात पावसाने उघडीप घेतल्याने धरणात पाण्याची आवक काही अंशी मंदावली आहे....

VO_मुळा नदीच्या पाणलोटात जूनच्या शेवटच्या आठवड्या मुसळधार पाऊस पडत होता. या पावसामुळे मुळा नदीवरील आंबित हे पहिले धरण पूर्ण क्षमतेने भरले. हे धरण भरल्यानंतर पिंपळगाव खांड धरणात (२९ जूनला) पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू झाली होती. ६०० दलघफू क्षमता असलेल्या पिंपळगाव खांड धरणात पाण्याची आठवड्यापासून आवक सुरू होती. या धरणात पाणी साचल्याने कोतुळचा पूल बुधवारी (३ जुलै) पुन्हा पाण्याखाली गेला आहे. मुळा खोऱ्यात पावसाने उघडीप घेतल्याने पिंपळगाव खांड धरणात पाण्याची आवक मंदावली होती. शुक्रवारी दिवसभर चांगला पासून झाल्याने धरण शनिवारी दुपारी बारा वाजता पूर्ण क्षमतेने भरले. आणि पाणी मुळा धरणाच्या दिशेने झेपावले. सध्या पिंपळगाव खांड धरणातून दोनशे क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे. धरणाच्या पाणलोटात पावसाने पुन्हा एकदा जोर दाखविला तर मुळेच्या विसर्गात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पिंपळगाव खांड धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे लाभधारक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मुळा पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याच पाच ते सहा दिवसात मुळा धरणात नवीन पाण्याची आवक सुरू होणार आहे....
Body:MH_AHM_Shirdi_ Pinpalgaon Khand Dam_06_MH10010Conclusion:MH_AHM_Shirdi_ Pinpalgaon Khand Dam_06_MH10010
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.