ETV Bharat / state

विद्यार्थ्यांची विदेशभरारी.. कोपरगावच्या समता आंतरराष्ट्रीय स्कूलची सहल थेट जपानच्या दारी - international

जपानमधील नागरिकांशी त्यांच्याच भाषेत संभाषण करण्यासाठी जपानी भाषेचे धडेही विद्यार्थ्यांनी गिरवले जात आहेत. पहिल्यांदाचा विमानवारी घडणार असल्याने मुलांमध्ये आनंदाच वातावरण आहे.

विद्यार्थ्यांची विदेशभरारी
author img

By

Published : Apr 10, 2019, 11:28 AM IST

अहमदनगर - कोपरगाव येथील समता इंटरनॅशनल स्कूलची शैक्षणिक सहल थेट जपानला जाणार आहे. सांस्कृतिक आणि दोन देशातील विचारांची देवाणघेवाण व्हावी, या उद्देशाने सहलीचे आयोजन केले आहे. परदेशात विद्यार्थ्यांची सहल घेऊन जाणारी ही ग्रामीण भागातील कदाचित पहिली शाळा ठरणार आहे.

विद्यार्थ्यांची विदेशभरारी

सहल म्हटले की, नजरेसमोर येतात ते गडकिल्ले, समुद्र किनारे, पर्यटनस्थळे किंवा धार्मिक स्थळे, मात्र कोपरगाव येथील समता इंटरनेशनल स्कूलने या सगळ्यांना फाटा देत थेट जापानला सहल नेण्याचे ठरविले. या सहलीमध्ये २८ विद्यार्थी सहभागी होणार आहेत. जपानमधील नागरिकांशी त्यांच्याच भाषेत संभाषण करण्यासाठी जपानी भाषेचे धडेही विद्यार्थ्यांनी गिरवले जात आहेत. पहिल्यांदाचा विमानवारी घडणार असल्याने मुलांमध्ये आनंदाच वातावरण आहे. शहरी भागातील शाळेंप्रमाणेच आता ग्रामीण भागातील शाळाही परदेशात सहलींचे आयोजन करत आहेत. देशातील महत्वाच्या ठिकाणी सहली नेण्यासोबत शालेय विद्यार्थ्यांना परदेशात नेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोपरगाव येथील समता इंटरनेशनल स्कुलने एक पाऊल पुढे टाकले आहे. एक लाख १० हजार सहलीची फी आकारण्यात आले आहेत. शेतकरी कुटूंबासह व्यवसायिक तसेच नोकरी करणाऱया मध्यमवर्गीय कुटूंबाचा समावेश आहे. कुटूंबातील कोणीही यापूर्वी विदेशवारी न केलेल्या पालकांनी या उपक्रमाच स्वागत केले आहे. विशेष म्हणजे या सहलीत मुलींचे प्रमाण अधिक आहे.
या सहलीच्या माध्यमातून मुलांना नवीन विश्व पहावयास मिळणार आहे. ही केवळ सहल नसून या सहलीत दोन देशातील सांस्कृतिक तसेच वैचारांची देवाणघेवाण होणार असल्याचे समता इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका स्वाती कोयटे ईटीव्हीशी बोलताना म्हणाल्या.

सहलीच्या माध्यमातुन मुलांना परदेशात जाण्याची संधी मिळणार आहे. तेथील संस्कृती , तंत्रज्ञान , शिक्षणव्यवस्था , जपानी लोकांची देशाप्रती आस्था असे नव विश्व विद्यार्थ्यांना अनुभवयास मिळेल, आणि याचा उपयोग एक आदर्श ध्येयवादी पिढी घडण्यास त्याचा उपयोग होईल यात शंका नाही.

Intro:
Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ कोपरगाव येथील एका शाळेतील मुल कोपरगाव ते थेट जपानची सफर करणार आहेत.. सांस्कृतिक आणि दोन देशातील विचारांची देवाणधेवाण व्हावी या उद्देशाने कोपरगाव येथील समता इंटरनेशनल स्कुलच्या वतीने कोपरगाव ते जपान अशा शैक्षणिक सहलिच आयोजन केल आहे. परदेशात विद्यार्थ्यांची सहल नेणारी हि ग्रामीण भागातील कदाचित पहिली शाळा ठरणार आहे....

VO_सहल म्हणटल की नजरे समोर येतात ते गढकिल्ले , समुद्र किनारे , पर्यटनस्थळे किंवा धार्मिक तिर्थस्थळे मात्र कोपरगाव येथील समता इंटरनेशनल स्कुलने या सगळ्यांना फाटा देत थेट जापानला सहल नेण्यासाठी पाऊल उचलली आहेत..शाळेतील 28 विद्यार्थी जपान देशाचा दौरा करणार असुन जपानी नागरिकांशी त्यांच्याच भाषेत संभाषण करण्यासाठी जपानी भाषेचे धडेही विद्यार्थ्यांनी गिरवले आहेत.पहिल्यांदाचा विमानवारी घडणार असल्याने मुलांमध्ये आनंदाच वातावरण आहे....

BITE _विद्यार्थी

VO _शहरी भागातील शाळेंप्रमाणेच आता ग्रामीण भागातील शाळाही परदेशात सहलींच आयोजन करत आहेत. देशातील महत्वाच्या ठिकाणी सहली नेण्यासोबत शालेय विद्यार्थ्यांना परदेशात नेण्याच स्वप्न पुर्ण करण्यासाठी कोपरगाव येथील समता इंटरनेशनल स्कुलने एक पाऊल पुढ टाकलय...यासाठी एक लाख दहा हजार आकारण्यात आले आहेत. शेतकरी कुटूंबासह व्यवसायिक तसेच नौकरी करणा-या मध्यमवर्गीय कुटूंबाचा समावेश आहे. कुटूंबातील कोणीही यापुर्वी विदेशवारी न केलेल्या पालकांनी या उपक्रमाच स्वागत केलय.. विशेष म्हणजे या सहलीत मुलींच प्रमाण अधिक आहे....

BITE_ पालक

VO_ या सहलिच्या माध्यमातुन मुलांना नविन विश्व पहावयास मिळणार आहे. हि केवळ सहल नसुन या सहलित दोन देशातील सांस्कृतिक तसेच वैचारांची देवाणघेवाण होणार आहे....

BITE_ स्वाती कोयटे , संचालित

VO_सहलीच्या माध्यमातुन मुलांना परदेशात जाण्याची संधी मिळणार आहे. तेथील संस्कृती , तंत्रज्ञान , शिक्षणव्यवस्था , जपानी लोकांची देशाप्रती आस्था अस नव विश्व विद्यार्थ्यांना अनुभवयास मिळेल आणि याचा उपयोग एक आदर्श ध्येयवादी पिढी घडण्यास त्याचा उपयोग होईल यात शंका नाही....Body:9 April Shirdi School Tours JapanConclusion:9 April Shirdi School Tours Japan
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.