अहमदनगर- कोरोना विषाणूला रोखण्यासाठी प्रशासनाने मंदिरे, गर्दीचे ठिकाणे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रार्श्वभूमीवर शिर्डीतील साईबाबा देवस्थानने सुद्धा आज पासून (मंगळवार) मंदिर बंद ठेवले आहे. जिल्ह्यातील शनी शिंगणापूर देवस्थानही बंद करण्यात आले आहे.
हेही वाचा- सर्दी-खोकला झालेल्या नागरिकांत कोरोनाची भीती; डॉक्टरांनी दिला 'हा' सल्ला
नागरिकांनी कोरोनाबाबत धास्ती घेतलेली आहेत. गर्दीच्या ठिकाणी न जाता घरीच बसण्याला नागरिकांनी पसंती दिली आहे. दरम्यान, गर्दीचे ठिकाणे टाळून, योग्य ती आरोग्याची काळजी नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.