ETV Bharat / state

Saibaba Sansthan Controversy : साईबाबा संस्थान आणि शिर्डी ग्रामस्थांमधील संघर्ष पुन्हा एकदा पेटणार - शिर्डी साईबाबा संस्थान

Saibaba Sansthan Controversy: शिर्डी साईबाबा संस्थानने देशभरात साईबाबांची मंदिरे उभारण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. मात्र, शिर्डीचा विकास अपूर्ण असताना आणि साईबाबा संस्थानचा कारभार सुरळीत नसताना देखील साई संस्थानच्या देशभरात मंदिरे उभारण्याच्या निर्णयाला शिर्डी ग्रामस्थांकडून विरोध होत आहे. शिर्डीतील या निर्णया विरोधात साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त अनिता जगताप यांनी आपल्या पतीसह साईबाबा मंदिराच्या चार प्रवेशद्वारा समोर आजपासून (गुरुवार) बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. यामुळे साईबाबा संस्थान आणि शिर्डी ग्रामस्थांमधील संघर्ष पुन्हा एकदा पेटणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

Saibaba Sansthan Controversy
दाम्पत्याचे उपोषण
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 5, 2023, 10:19 PM IST

शिर्डीत उद्‌भवलेल्या वादावर बोलताना संस्थानचे कार्यकारी अधिकारी आणि उपोषणकर्ते

शिर्डी (अहमदनगर) Saibaba Sansthan Controversy: साईबाबा संस्थानच्या त्रि-सदस्यीय समितीचे सदस्य आणि साई संस्थानचे कार्यकारी अधिकारी पी शिवा शंकर यांनी साई मंदिर निर्माण धोरण जाहीर केले. साईबाबांच्या शिकवणुकीचा प्रचार व प्रसारासाठी साई संस्थानकडून देशभर साई मंदिर उभारणीचे विचाराधीन आहे. याकरिता एखाद्या संस्थेने किंवा राज्य सरकारने पाच एकर जागा उपलब्ध करून दिल्यास तेथे साई संस्थान शिर्डीसारखेच मंदिर उभारणार आहे. याशिवाय तेथे रुग्णालय, अन्नदान आदी उपक्रम राबवले जाणार आहेत. याशिवाय गावोगावी नव्याने उभारण्यात येणाऱ्या साईबाबांच्या मंदिरांच्या बांधकामासाठी पन्नास टक्के रक्कम अथवा ५० लाख रूपयांची मदत करण्याचा विचार साई संस्थान करत आहे. याबाबत साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी शिवाशंकर यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली होती. यावर भाविक आणि शिर्डीकरांच्या सूचना, मतेही मागवली आहेत.

यामुळे पती-पत्नीचे बेमुदत उपोषण: साई संस्थानने साई मंदिर निर्माण धोरण जाहीर केलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून साई संस्थान आणि शिर्डी ग्रामस्थ यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा सुरू झाला आहे. साईबाबा संस्थान यांना सध्याच्या व्यवस्थापनामध्ये नियंत्रण ठेवणे कठीण असताना नवीन उठाठेव कशासाठी असा सवाल उपस्थित करत शिर्डीकर एकवटले आहेत. साई संस्थानच्या या प्रस्तावित मंदिर निर्माण धोरणास विरोध करत शिर्डीच्या माजी नगराध्यक्षा आणि साई संस्थानच्या माजी विश्वस्त अनिता जगताप आणि त्यांचे पती माजी उपनगराध्यक्ष विजय जगताप या पती-पत्नीने साई मंदिराच्या चार नंबर प्रवेशद्वार समोर बेमुदत उपोषणास आजपासून सुरुवात केली आहे.

उपोषणाला शिर्डी ग्रामस्थांचा पाठिंबा: शिर्डीतील जगताप दाम्पत्याने सुरू केलेल्या उपोषणास शिर्डी ग्रामस्थ आणि सर्वपक्षीयांनी पाठिंबा दिला आहे. साईमंदिर निर्माण धोरणास विरोधाच्या बरोबरीने साईबाबा संस्थानच्या वतीने शिर्डीत चालवले जात असलेल्या हॉस्पिटलमध्ये कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाही. त्रिसदस्य समितीचे लक्ष द्यावे. शिर्डी हद्दीमधील नगर-मनमाड रोडवर साई भक्तांच्या सुविधेसाठी, सुरक्षिततेसाठी स्कायवॉक निर्माण करावा. शिर्डी गावच्या सर्वांगीण विकासासाठी साईबाबा संस्थानने वार्षिक उत्पन्नाच्या 30 टक्के रक्कम शिर्डी नगरपरिषदेला द्यावी. लेजर शो गार्डनचे काम पूर्ण करण्यात यावे अशा अनेक मागण्या घेऊन शिर्डीतील जगताप दाम्पत्याने बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

उपोषणाला बसण्याचे कारण:
1) श्री साईबाबा संस्थान त्रिसदस्य समितीने देशभर श्री साईबाबा मंदिर उभारण्याचा घेतलेला निर्णय

2) श्री साईबाबा संस्थान यांना सध्याच्या व्यवस्थापनामध्ये नियंत्रण ठेवणे कठीण असताना नवीन उठाठेव कशासाठी?

3) राधाकृष्ण विखे पाटील हे श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेमध्ये असताना शिर्डी नगरपंचायतीला भरघोस निधी प्राप्त होत होता. तशा प्रकारचा निधी त्रिसदस्य समितीने शिर्डी नगरपरिषदेस तात्काळ उपलब्ध करून द्यावा.

4) निळवंडे धरणातून शिर्डी कोपरगावसाठी बंद पाईपलाईनद्वारे येणाऱ्या पाणीपुरवठा योजनेला त्रिसदस्य समितीने ठराव करून विरोध केला आहे.

5) श्री साईबाबा संस्थान संचलित हॉस्पिटलमध्ये कुठल्याही प्रकारची व्यवस्था नसून अनागोंदी झालेली आहे. त्रिसदस्य समितीचे याकडे लक्ष नाही.

6) शिर्डी विकास आराखड्यानुसार ज्या जमिनीवर आरक्षण टाकण्यात आले आहेत. त्या जमिनी ताब्यात घेण्याबाबत श्री सदस्य समिती टाळाटाळ करत आहे. त्या आरक्षण टाकलेल्या जमिनी त्वरित ताब्यात घेण्यात येऊन विकसित करण्यात याव्यात.

7) शिर्डी हद्दीमधील नगर मनमाड रोडवर साई भक्तांच्या सुविधेसाठी सुरक्षिततेसाठी स्कायवॉक निर्माण करणे गरजेचे आहे. जेणेकरून साई भक्तांना हायवे क्रॉस करताना दुखापत होणार नाही व वाहतुकही सुरळीतपणे सुरू राहील याबाबत त्रि सदस्य समितीने लक्ष देणे गरजेचे आहे.

8) श्री साईबाबा संस्थान मधील देणगी विभागामधील व्यवहारावर व्यवस्थापनाचे नियंत्रण नाही. तेथे फार मोठ्या प्रमाणामध्ये अनागोंदी सुरू आहे.

9) शिर्डी गावच्या सर्वांगीण विकासासाठी श्री साईबाबा संस्थानने वार्षिक उत्पन्नाच्या 30 टक्के रक्कम शिर्डी नगरपरिषदेला द्यावी.

10) श्री साई भक्तांसाठी मोफत पार्किंग करण्यात यावे. लेजर शो गार्डनचे काम पूर्ण करण्यात यावे.

11) शिर्डीचा विकासासाठी आवश्यक असलेल्या रिंग रोडची अपूर्ण कामे श्री साईबाबा संस्थान त्वरित पूर्ण करावीत.

हेही वाचा:

  1. Shirdi Coin Issue: शिर्डीतील राष्ट्रीयकृत बँकेंची डोकेदुखी संपणार, नाण्यांच्या प्रश्नावर तोडगा निघाला- राहुल जाधव
  2. Shirdi Saibaba Sansthan Board Dismissed : शिर्डी साईबाबा विश्वस्त मंडळ बरखास्त; औरंगाबाद खंडपीठाचे आदेश
  3. Sai Sansthan Shirdi Controversy : आयएएस भाग्यश्री बानायत यांनी मागितली माफी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.