ETV Bharat / state

गुरुपौर्णिमेनिमित्ताने शिर्डीत पालखी घेऊन न येण्‍याचे साई संस्थानचे आवाहन; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर

author img

By

Published : Jul 10, 2021, 7:29 PM IST

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी 22 ते 24 जुलै 2021 यादरम्यान गुरुपौर्णिमेनिमित्त पालखी घेऊन शिर्डीत येण्याचे टाळावे, असे आवाहन साई संस्थानच्यावतीने करण्यात आले आहे.

shirdi GuruPoornima news
गुरुपौर्णिमेनिमित्ताने शिर्डीत पालखी घेऊन न येण्‍याचे साई संस्थानचे आवाहन

शिर्डी - देशातील व राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाच्‍या कोविड-19 संदर्भातील नवीन मार्गदर्शक सूचना जाहिर करण्यात आल्या आहेत. या सुचनांनुसार 5 एप्रिलपासून पुढील आदेशापर्यंत साईबाबा समाधी मंदिर दर्शनाकरीता बंद ठेवण्‍यात आले आहे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी 22 ते 24 जुलै 2021 यादरम्यान गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त पालखी घेऊन शिर्डीत येण्याचे टाळावे, असे आवाहन संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी कान्‍हूराज बगाटे यांनी केले.

दैनंदिन कार्यक्रम सुरु राहतील -

शिर्डी हे देशातील नामांकित देवस्‍थान असून साईबाबांच्या समाधीच्या दर्शनाकरीता देशाच्‍या व जगाच्‍या कानाकोपऱ्यातून भक्‍त दर्शनाकरीता शिर्डी येथे येतात. तसेच साईबाबा संस्‍थानच्‍यावतीने दरवर्षी श्रीरामनवमी, गुरुपौर्णिमा, पुण्‍यतिथी आदी प्रमुख उत्‍सवांचे आयोजन करण्‍यात येते. त्‍यामुळे राज्‍यासह देशाच्‍या कानाकोपऱ्यातून पालखीसह येणाऱ्या पदयात्रींची संख्‍या ही मोठ्या प्रमाणात असते. त्‍यामुळे मंदिर परिसरात मोठी वर्दळ असते. त्यामुळे पुन्हा राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाने नवीन मार्गदर्शक सूचना केल्‍या आहेत. यामध्‍ये धार्म‍िक स्‍थळे, सामाजिक ठिकाणे आदि ठिकाणी गर्दी करु नये, असे निर्देश देण्‍यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर साईबाबा संस्‍थानच्‍यावतीने 5 एप्रिलपासून श्री साईबाबा समाधी मंदिर दर्शनाकरीता बंद ठेण्‍यात आले आहे. यादरम्‍यान समाधी मंदिरातील दैनंदिन कार्यक्रम सुरु ठेवण्‍यात आले आहे. दरम्यान, कोरोनामुळे गेल्या वर्षी 17 मार्च रोजी समाधी मंदिर बंद करण्‍यात आले होते. त्‍यानंतर 14 नोव्हेंबर 2020च्या शासन आदेशानुसार 16 नोव्हेंबर 2020पासून साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी काही अटी व शर्तीसह खुले करण्यात आले होते.

हेही वाचा - महाविकास आघाडीतील एक मोठा नेताच ओबीसी आरक्षणात 'झारीतील शुक्राचार्य' - चंद्रशेखर बावनकुळे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.