ETV Bharat / state

साईबाबांचा पुण्‍यतिथी उत्‍सव भक्तीमय वातावरणात संपन्न - ईबाबा समाधी शताब्‍दी स्‍तंभ

उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी पहाटे 4.30 वाजता साईंची काकड आरती झाल्‍यानंतर साईसच्‍चरित्र या पवित्र ग्रंथाच्‍या अखंड पारायणाची समाप्‍ती झाली. पारायण समाप्‍तीनंतर साईबाबांच्‍या प्रतिमेची व श्री साईसच्‍चरित या पवित्र ग्रंथाची मिरवणूक काढण्‍यात आली. या मिरवणूकीत जिल्‍हा व सत्र न्‍यायाधिश तथा संस्थानचे तदर्थ समिती अध्‍यक्ष सुधाकर वेंकटेश्‍वरराव यार्लगड्डा यांच्यासह मान्यवरांनी सहभाग नोंदवला.

साईबाबा
साईबाबा
author img

By

Published : Oct 15, 2021, 8:12 PM IST

Updated : Oct 15, 2021, 8:48 PM IST

शिर्डी (अहमदनगर) - साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था शिर्डीच्‍या वतीने आयोजित केलेल्‍या 103 वा साईंच्या पुण्‍यतिथी उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी रुढी परंपरेनुसार आयोजित करण्‍यात आलेला प्रतिकात्‍मक भिक्षा झोळी कार्यक्रम पार पडला. उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी पहाटे 4.30 वाजता साईंची काकड आरती झाल्‍यानंतर साईसच्‍चरित्र या पवित्र ग्रंथाच्‍या अखंड पारायणाची समाप्‍ती झाली. पारायण समाप्‍तीनंतर साईबाबांच्‍या प्रतिमेची व श्री साईसच्‍चरित या पवित्र ग्रंथाची मिरवणूक काढण्‍यात आली. या मिरवणूकीत जिल्‍हा व सत्र न्‍यायाधिश तथा संस्थानचे तदर्थ समिती अध्‍यक्ष सुधाकर वेंकटेश्‍वरराव यार्लगड्डा यांच्यासह मान्यवरांनी सहभाग नोंदवला.

साईबाबांचा पुण्‍यतिथी उत्‍सव भक्तीमय वातावरणात संपन्न

असा पार पडला सोहळा

सकाळी 6 वाजता जिल्‍हा व सत्र न्‍यायाधिश तथा संस्थानचे तदर्थ समिती अध्‍यक्ष सुधाकर वेंकटेश्‍वरराव यार्लगड्डा यांच्‍या हस्‍ते समाधी मंदिरात साईंची पाद्यपुजा करण्‍यात आली. सकाळी 8.30 वाजता संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत व त्‍यांचे पती संजय धिवरे सहआयुक्‍त प्राप्तिकर विभाग, नासिक यांच्‍या हस्‍ते लेंडीबागेत साईबाबा समाधी शताब्‍दी स्‍तंभाच्‍या ध्‍वजाचे विधीवत पुजन करुन ध्वज बदलण्‍यात आला. सकाळी 9 वाजता जिल्‍हा व सत्र न्‍यायाधिश तथा संस्थानचे तदर्थ समिती, अध्‍यक्ष सुधाकर वेंकटेश्‍वरराव यार्लगड्डा यांच्‍या हस्‍ते समाधी मंदिरात काढण्‍यात आलेल्‍या प्रतिकात्‍मक भिक्षा झोळी कार्यक्रमाचा शुभारंभ करण्‍यात आला. या भिक्षा झोळी कार्यक्रमात अप्‍पर महसुल विभागीय आयुक्‍त, नाशिक तथा संस्‍थान तदर्थ समिती सदस्‍य भानुदास पालवे, उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, सहआयुक्‍त प्राप्तिकर विभाग संजय धिवरे व प्रशासकीय अधिकारी डॉ.आकाश किसवे आदी सहभागी झाले होते. तर यावेळी मुख्‍यलेखाधिकारी बाबासाहेब शिंदे, सरंक्षण अधिकारी आण्‍णासाहेब परदेशी, मंदिर प्रमुख रमेश चौधरी व मंदिर पुजारी उपस्थित होते. भिक्षा झोळीकरीता गांवकरी व साईभक्‍तांकडून दान भिक्षा स्विकारण्‍याकामी मंदिर परिसरातील गेट नंबर 4 पिंपळवाडी रोड गेट नंबर 2 चावडी समोर, नाट्यगृहा शेजारी तसेच साईनगर मैदान येथे काऊंटर्सची व्‍यवस्‍था करण्‍यात आली होती. सकाळी 10 वाजता मंदिर कर्मचारी संभाजी तुरकणे यांचा कीर्तन कार्यक्रम झाला.

सकाळी 10 वाजता जिल्‍हा व सत्र न्‍यायाधिश तथा संस्थानचे तदर्थ समिती अध्‍यक्ष सुधाकर वेंकटेश्‍वरराव यार्लगड्डा व त्‍यांची पत्‍नी सौ.मालती यार्लगड्डा आणि संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत व त्‍यांचे पती संजय धिवरे सहआयुक्‍त प्राप्तिकर विभाग, नासिक यांच्‍या हस्‍ते रितीरिवाजाप्रमाणे समाधी मंदिरातील स्‍टेजवर आराधना विधी करण्‍यात आला. दुपारी 12.30 वाजता साईबाबांची माध्‍यान्‍ह आरती झाली. सायंकाळी 5 वाजता खंडोबा मंदिर येथे सिमोल्‍लंघन करण्‍यात आले. सायंकाळी 6.15 वाजता साईबाबांची धुपारती झाली. तर रात्रौ 10.30 वाजता शेजारती झाली. यावर्षी उत्सवाच्या निमित्ताने कोईमतुर येथील दानशूर साईभक्त नागाराज यांच्या देणगीतून मंदिर व परिसरात फुलांची आकर्षक सजावट व शिर्डी येथील सुनिल बाराहाते, साईसमर्थ डेकोरेटर्स यांनी देणगीस्‍वरुपात मंदिर व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई केली. तसेच रतलाम येथील साईभक्‍त अनिल सिसोदिया, श्री साई सेवा समिती ट्रस्‍ट यांनी मंदिर परिसरात ठिक-ठिकाणी आकर्षक रांगोळी काढल्‍या.

हेही वाचा - शिवसेनेचा दसरा मेळावा षण्मुखानंद सभागृहात; ठाकरे आज काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष

Last Updated : Oct 15, 2021, 8:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.