ETV Bharat / state

Saibaba Temple : साईबाबांचा पुण्यतिथी सोहळा; जाणून घेऊया या सोहळ्याचा इतिहास - साडेतीन मुहूर्तांपैकी एक दसऱ्याचा मुहूर्त

साईबाबांची १०४ वा पुण्‍यतिथी उत्‍सव ( Sai Baba Cremated at Shirdi 103 Years Ago on Dasara ) मंगळवार दिनांक ४ ऑक्‍टोबर ते शुक्रवार दिनांक ७ ऑक्‍टोबर २०२२ या काळात साजरा होणार ( Year 1919 Baba First Punyatithi was Celebrated as Per Date ) आहे. या निमित्‍ताने पुण्‍यतिथी सोहळ्याची पूर्वपिठीका जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. साईबाबांनी १०३ वर्षांपूर्वी दसऱ्याच्‍या दिवशी दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी शिर्डी येथे आपला देह ठेवला. त्‍या दिवशी मंगळवार होता. १९१९ साली तिथीप्रमाणे बाबांची पहिली पुण्‍यतिथी ( Vijayadashami Means Death Anniversary of Sai Baba ) साजरी करण्‍यात आली. त्‍यानंतर आजतागायत हा पुण्‍यतिथी उत्‍सव नव्‍या उत्‍साहात साजरा केला जात आहे.

Saibaba Death Anniversary Celebration
साईबाबा पुण्यतिथी उत्सव
author img

By

Published : Sep 30, 2022, 11:06 AM IST

मुंबई : साईबाबांनी १०३ वर्षांपूर्वी दसऱ्याच्‍या दिवशी दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी शिर्डी येथे आपला ( Sai Baba Cremated at Shirdi 103 Years Ago on Dasara ) देह ठेवला. त्‍या दिवशी मंगळवार होता. १९१९ साली तिथीप्रमाणे बाबांची पहिली पुण्‍यतिथी साजरी करण्‍यात ( Year 1919 Baba First Punyatithi was Celebrated as Per Date ) आली. त्‍यानंतर आजतागायत हा पुण्‍यतिथी उत्‍सव नव्‍या उत्‍साहात साजरा केला जात आहे. ज्‍यामुळे विजयादशमी म्‍हणजे साईबाबांची ( Vijayadashami Means Death Anniversary of Sai Baba ) पुण्‍यतिथी, अशी एक नवी ओळख या सणाची निर्माण झाली आहे. देशभरातील व जगातील साईभक्‍त हा उत्‍सव साजरा करतात. शिर्डी येथे या पुण्‍यतिथी उत्‍सवानिमित्‍त तीन दिवस विविध कार्यक्रमाचे ( Various Programs are Organized in Shirdi ) आयोजन करण्‍यात येते.

Saibaba Death Anniversary Celebration
साईबाबा पुण्यतिथी उत्सव

साईबाबांच्या 42 अध्यायात बाबांच्या महानिर्वाणाचे महत्त्व : श्री साईसच्‍चरिताच्‍या ४२ व्‍या अध्‍यायात बाबांच्‍या महानिर्वाणाचे वर्णन करण्‍यात आले आहे. हेमाडपंत म्‍हणतात, बाबांचे एक भक्‍त रामचंद्र पाटील कोते एकदा अतिशय आजारी पडले. जीवावरचे संकट त्‍यांना सोसवत नव्‍हते. कोणताच उपाय बाकी राहिला नव्‍हता. जीव अगदी नकोसा होऊन गेला. अशा अवस्‍थेत एका मध्‍यरात्री बाबांची मूर्ती एकाएकी रामचंद्र पाटलांच्‍या उशापाशी प्रकटली.

Saibaba Death Anniversary Celebration
साईबाबा पुण्यतिथी उत्सव

रामचंद्र पाटलांच्या मदतीला धावले बाबा : रामचंद्र पाटलांनी बाबांचे पाय धरले आणि निराश होऊन म्‍हणाले ‘मला मरण नक्‍की कधी येईल तेवढे सांगा. या आयुष्‍याचा कंटाळा आला आहे.’ त्‍यावर मूर्तीमंत करुणा असलेले बाबा म्‍हणाले, रामचंद्रा...उगाच चिंतातूर का होतोस काळजी करू नकोस तुझे गंडांतर टळले आहे. पण, तात्‍या पाटलाची मला धडगत दिसत नाही. शके अठराशें चाळीस शके १८४० च्‍या दसऱ्याच्‍या दिवशी तात्‍या मोक्षपदाला पावेल. परंतु, ही गोष्‍ट तात्‍या जवळ बोलू नकोस. तो मनात धास्‍ती घेऊन बसेल.

Saibaba Death Anniversary Celebration
साईबाबा पुण्यतिथी उत्सव

साईबाबांनी तात्‍या पाटलांचे मरण स्वतःच्या अंगावर घेतले : दिवस भराभर उलटू लागले. तशी तात्‍या पाटलांच्‍या मरणाची वेळ जवळ येऊ लागली. रामचंद्र पाटलांची धास्‍तीही वाढू लागली. कारण बाबांचे बोल म्‍हणजे वज्रलेप ते त्‍यांनी तात्‍या पाटलांपासून गुप्‍त ठेवले. पण कोणाकडे तरी मन मोकळे केल्‍याशिवाय त्‍यांना चैन पडेना. शेवटी ही गोष्‍ट त्‍यांनी बाळा शिंप्‍याला सांगितली आणि हे कोणालाही सांगू नकोस असं बजावले. एकोणीसशें अठरा १९१८ चा भाद्रपद सरला अश्विन लागणार तोच तात्‍या पाटलांनी अंथरुण धरले.

Saibaba Death Anniversary Celebration
साईबाबा पुण्यतिथी उत्सव

बाबांनी तात्या पाटलांच्या वेदना स्वतःच्या अंगावर घेतल्या : तर दुसरीकडं बाबांनाही थंडी वाजून आली. तात्‍यांचा भरवसा बाबांवर आणि बाबांचा रक्षणकर्ता श्रीहरी होता. दुखण्‍याने त्रासलेल्‍या तात्‍यांचे चित्‍त बाबांकडे लागले होते. भेटीची ओढ लागली होती. परंतु त्‍यांना चालवतही नव्‍हते. दिवसेंदिवस दुखणे वाढत होते. औषधांना दाद न देता अनावर होत होते. बाबांनी भाकीत केलेला दिवस जवळ येत होता. बाबांचे म्‍हणणे आता खरं होणार या विचाराने रामचंद्र पाटील आणि बाळा शिंप्‍याची धास्‍ती वाढू लागली. शुध्‍द पक्षाची दशमी आली. तात्‍यांची नाडी कमी वाहू लागली. आप्‍तेष्‍ट घाबरून गेले. परंतु, तात्‍यांच्‍या बाबतीत कुठलीच वाईट घटना घडणार नव्‍हती. आलेल्‍या काळाला परत जावे लागणार होते. आणि तसेच झाले. तात्‍यांचे गंडांतर टळले. तात्‍या राहीले आणि बाबांनी देह त्‍याग केला.

Saibaba Death Anniversary Celebration
साईबाबा पुण्यतिथी उत्सव

बाबांनी बयाजी पाटलांच्या मांडीवर देह ठेवला : देहावसन जवळ आले तरी लक्ष ठेवून चारा-पाचांचा मेळ घालून बाबांनी लक्ष्‍मीबाई शिंदेना आपली आठवण म्‍हणून नऊ रुपये दिले. जवळ असलेल्‍या मंडळींना जेवायला पाठवून दिले. मनाने अस्‍वस्‍थ होते तरी आज्ञा झाल्‍याने ते जाण्‍यासाठी उठले. आज्ञेचे उल्‍लंघन करवेना, सोबतही सोडवेना आणि बाबांचे मनही मोडवेना. शेवटी सर्वजण वाड्यात जेवायला गेले. पण, मन बाबांजवळ गुंतलेले होते. सारे जेवायला बसले. तेवढ्यात बोलावणे आले. हातातला घास तसाच टाकून सर्वजण व्‍दारकामाईकडे धावले. परंतु वेळ निघून गेली होती. बयाजी पाटलांच्‍या मांडीवर बाबांनी आपला देह ठेवला होता.

Saibaba Death Anniversary Celebration
साईबाबा पुण्यतिथी उत्सव

बाबांना दसऱ्याच्या मुहूर्ताचे महत्त्व आणि प्रेम होते : दसऱ्याचे बाबांना प्रेम का होते? तर साडेतीन मुहूर्तांपैकी दसऱ्याचा हा मुहूर्त कोठेही जाण्‍यासाठी विशेष शुभ समजला जातो. हे सगळ्यांना चांगलेच ठावूक आहे. परंतु हेही म्‍हणणे बरोबर नव्‍हे. ज्‍याला जाणे व येणेच नाही त्‍याला कोठून आले आहे निर्याण! मुहूर्ताचीही त्‍याला काय जरूरी ज्‍याला धर्माचे किंवा अधर्माचे बंधन नाही. ज्‍याची सर्व बंधने निवळली आहेत ज्‍याच्‍या प्राणाला निघून जाणे नाही त्‍याला निर्याण ते कसले, अशा साई महाराजांना येणे किंवा जाणे नाही. मग निर्याण स्थिती तरी कोठली आयुष्‍यामर्यादारूपी तेल संपल्‍यावर प्राणरूपी ज्‍योत मंद झाल्‍यावर बाबांचा देह बयाजी पाटलाच्‍या मांडीवर विसवला. नाही पडून किंवा निजून पण स्‍वस्‍थपणे गादीवर बसून अशा प्रकारे आपल्‍या हस्‍ते दानधर्म करून बाबांनी आपल्‍या देहाचे विसर्जन केले.

Saibaba Death Anniversary Celebration
साईबाबा पुण्यतिथी उत्सव

संत देहरूपी मायेचा बुरख्याने घालून या जगात येतात आणि कार्यसिद्धी झाल्यावर ब्रह्मीभूत : साईसमर्थांचे मनोगत कोणालाही न कळता त्‍यांनी हातोहात आपला देह टाकला आणि ते ब्रह्मीभूत झाले. देहाचा व मायेचा बुरखा पांघरून संत या जगात अवतार घेतात आणि लोकांचा उद्धार करण्‍याचे कार्य संपले म्‍हणजे लगेच अव्‍यक्‍तात समरस होऊन जातात. बाबांनी आपला देह आपल्‍या भक्‍तांकरिता आजन्‍म कष्‍टविला. त्‍या स्‍मरणार्थ दरवर्षी त्‍यांची पुण्‍यतिथी साजरी करण्‍याचा निर्णय तत्‍कालीन भक्‍तांनी घेतला. पूर्वपरंपरा पाहिली तर पुण्‍यतिथी साजरी करणे हे महत्‍पुण्‍य आहे. वर्षभर घरोघरी प्रत्‍येक जण आराधना करीतच असतो. परंतु, त्‍याची पूर्तता करण्‍याकरिता व सदगुरूंचे आशीर्वाद घेण्‍याकरिता पुण्‍यतिथीच्‍या दिनी समाधीस्‍थानीच आले पाहिजे.

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.