अहमदनगर (शिर्डी) : Sai Baba Death Anniversary : शिर्डी साईबाबा संस्थानच्या (Saibaba Sansthan) वतीनं साजरा करण्यात येणाऱ्या चार दिवशीय पुण्यतिथी उत्सवाची 23 ऑक्टोबरपासून सुरूवात होणार आहे. त्यासाठी जगभरातून तीन लाखाहून अधिक भाविक साईबाबांच्या समाधीच्या दर्शनासाठी शिर्डीत येणार असल्याचा अंदाज साईबाबा संस्थानच्या वतीनं व्यक्त करण्यात आलाय. साईबाबांच्या दर्शनासाठी (Shirdi Saibaba) येणाऱ्या या सर्व भाविकांना साईबाबांचे दर्शन तसेच साई संस्थानच्या सर्व सुविधा मिळाव्या यासाठी साईबाबा संस्थानच्या वतीनं जय्यत (Shirdi Saibaba Mandir) तयारी करण्यात आलीय.
साई समाधी मंदिर रात्रभर राहणार खुलं : 24 ऑक्टोबर अर्थात विजयादशमी (Vijayadashami) दिवशी साईबाबांच्या पुण्यतिथी उत्सवाचा मुख्य दिवस आहे. या दिवशी लाखो भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येत असतात. यामुळे या सर्व भाविकांना साईबाबांच्या समाधीचे दर्शन (Sai Baba Samadhi ) मिळावे यासाठी साईबाबांचे समाधी मंदिर रात्रभर खुलं ठेवण्यात येणार असल्याची माहिती साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवा शंकर (P Shiva Shankar) यांनी दिली आहे.
राम मंदिर कमान भाविकांसाठी ठरणार मुख्य आकर्षण : साईबाबांच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्तानं मुंबई येथील द्वारकामाई मंडळाच्या वतीनं साईबाबा मंदिराच्या चारनंबर प्रवेशद्वाराजवळ राम मंदिराची कमान साकारण्यात आली असून, देखावा सादर करण्यात आलाय. त्याचबरोबर शिर्डीतील साईभक्त सुनील बारहाते यांच्या वतीनं देणगी स्वरूपात साई मंदिराबरोबरच राम मंदिराच्या कमानीला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. साई मंदिर परिसरात साकारण्यात आलेल्या राम मंदिर (Ram Mandir) कमान भाविकांसाठी मुख्य आकर्षण ठरणार आहे. तसेच चार दिवस हा उत्सव चालणार असून अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
हेही वाचा -