ETV Bharat / state

रोहित पवारच 'अधिकृत उमेदवार'; कर्जत-जामखेडमधून उमेदवारी घोषित

कर्जत-जामखेड या मतदारसंघासाठी रोहित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी अंतिम टप्प्यात आहे. जिल्हाध्यक्षांकडून रोहित पवार अधिकृत उमेदवार असल्याची नोंद माध्यमांना दिलेल्या पत्रात समोर आली आहे.

author img

By

Published : Oct 1, 2019, 11:18 AM IST

जिल्हाध्यक्षांकडून रोहित पवार अधिकृत उमेदवार असल्याची नोंद माध्यमांना दिलेल्या पत्रात समोर आली आहे.

अहमदनगर : कर्जत-जामखेड या मतदारसंघासाठी रोहित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी अंतिम टप्प्यात आहे. मात्र, अद्याप पक्षाकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झाली नसली, तरीही राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी एक प्रकारे रोहित पवार यांची उमेदवारी घोषित केली आहे.

rohit pawar news
माध्यमांना दिलेले पत्र

विविध वृत्तपत्र व वाहिन्यांना माहितीसाठी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी एक पत्रक काढले असून, यामध्ये कर्जत-जामखेड मतदारसंघातील अधिकृत उमेदवार रोहित पवार यांबदद्ल कोणतेही प्रसिद्धीपत्रक अथवा जाहिराती संदर्भात जिल्हाध्यक्षांचे अधिकृत पत्र असल्याशिवाय प्रसिद्ध करू नये, अशी सूचना केली आहे.

या पत्रात रोहित पवार हे 'अधिकृत उमेदवार' असल्याचे सूचित करण्यात आले आहे. यावरूनच कर्जत जामखेड मतदारसंघाची उमेदवारी रोहित पवार यांना निश्चित झाल्याची माहिती मिळते.

हेही वाचा रोहित पवारांबाबत 'या' गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

जामखेड मतदारसंघातून सलग दहा वर्षे राम शिंदे हे भारतीय जनता पक्षाकडून निवडून येत असून, यंदा विजयाची हॅटट्रिक होईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला आहे. या परिस्थितीत शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनीही गेल्या दीड वर्षापासून या मतदारसंघात कंबर कसली आहे. तसेच लोकसभा व त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी मतदारसंघात मोठे शक्तिप्रदर्शन केले. अजित पवार, जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे आदींच्या उपस्थितीत कर्जत आणि जामखेड येथे मोठ्या सभा घेऊन विजयासाठी राम शिंदे यांच्यासमोर आव्हान निर्माण केले आहे.

हेही वाचा 'अजित पवारांचा राजीनामा हे त्यांना उशिरा सुचलेले शहाणपण'

प्रचारासाठी काही दिवस बाकी असताना अधिकृतरित्या उमेदवारी घोषित झाली नसली, तरीही पक्षाकडून एक प्रकारे रोहित पवार यांना अपेक्षेप्रमाणे हिरवा कंदील देण्यात आला आहे.

Intro:अहमदनगर- रोहित पवार यांची उमेदवारी घोषित !!Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_01_rohit_pawar_news_image_7204297

अहमदनगर- रोहित पवार यांची उमेदवारी घोषित !!

अहमदनगर- राज्यात लक्षवेधी ठरणाऱ्या नगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड या मतदारसंघासाठी रोहित पवार यांची राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून उमेदवारी अंतिम मानली जातेय. मात्र अद्याप पक्षाकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झाली नसली तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी एक प्रकारे रोहीत पवार यांची उमेदवारी घोषित केली आहे. विविध वृत्तपत्र,वाहिन्यांना माहितीसाठी पाठवलेल्या एका पत्रात त्यांनी, 227- कर्जत-जामखेड मतदारसंघातील पक्षाचे अधिकृत उमेदवार रोहित राजेंद्र फाळके यांच्या संदर्भातील कोणतेही प्रसिद्धीपत्रक, जाहिरात आदी बाबी जिल्हाध्यक्षकांचे अधिकृत पत्र असल्याशिवाय प्रसिद्ध करू नये अशी सूचना वजा विनंती त्यांनी केली आहे. या पत्रात रोहित पवार अधिकृत उमेदवार असल्याचे सूचित केले आहे. जामखेड मतदारसंघातून सलग दहा वर्षे पालकमंत्री राम शिंदे हे भारतीय जनता पक्षाकडून निवडून येत असून यंदा त्यांनी आपली विजयाची हॅटट्रिक होईल असा विश्‍वास व्यक्त केला आहे. या परिस्थितीत शरद पवार यांचे नातू आणि पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार यांनीही गेल्या दीड वर्षापासून या मतदारसंघात कंबर कसली आहे. त्याचबरोबर लोकसभा आणि त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी मतदारसंघात मोठे शक्तिप्रदर्शन करत अजित पवार,जयंत पाटील, खा.अमोल कोल्हे आदींच्या उपस्थितीत कर्जत आणि जामखेड येथे मोठ्या सभा घेत या ठिकाणी विजयासाठी दावेदारी निर्माण करत राम शिंदे यांच्यासमोर आव्हान निर्माण केले आहे. आता प्रचारासाठी अवघे काही दिवस बाकी असताना उमेदवारी घोषित झाली नसली तरी पक्षाकडून एक प्रकारे रोहित पवार यांना अपेक्षेप्रमाणे हिरवा कंदील देण्यात आलेला आहे..

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- रोहित पवार यांची उमेदवारी घोषित !!
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.