ETV Bharat / state

संगमनेरमध्ये घरफोडी करून ६ तोळे सोन्यासह अडीच लाख रुपये लंपास - सुकेवाडी

चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून घरामध्ये प्रवेश केला. मात्र, याची घरच्यांना भनकही लागली नाही. घरचे लोक सकाळी झोपेतून उठल्यानंतर चोरी झाल्याचा प्रकार त्यांच्या लक्षात आला.

श्नानाच्या साहाय्याने शोध घेताना पोलीस
author img

By

Published : May 11, 2019, 1:57 PM IST

अहमदनगर - जिल्ह्यातील संगमनेर येथे घरात सर्वजण असताना घरफोडी झाल्याचा प्रकार आज पहाटेच्या सुमारास घडला. यात चोरट्यांनी ६ तोळ्यांचे सोन्याचे दागिने आणि रोख अडीच लाख रूपये लंपास केले आहेत.

घरफोडी बद्दल माहिती सांगताना रामनाथ कुटे

संगमनेर शहराजवळ असणाऱ्या सुकेवाडी येथील रामनाथ बाळाजी कुटे यांच्या घरात पहाटेच्यासुमारास चोरटे घुसले. त्यांनी अडीच लाख रुपये रोख रक्कम आणि सहा तोळे सोन्याचांदीचे दागिने घेऊन पोबारा केला.
चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून घरामध्ये प्रवेश केला. मात्र, याची घरच्यांना भनकही लागली नाही. घरचे लोक सकाळी झोपेतून उठल्यानंतर हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. संगमनेर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी श्वान पथकालाही पाचारण केले. श्वानाने घरापासून १ किलोमीटरपर्यंत चोरांचा माग काढला. मात्र, त्या ठिकाणाहून चोरटे वाहनाने पसार झाल्याची शक्यता आहे.

संगमनेर शहर आणि परिसरात गंठण चोरी, पॉकीटमारी, घरफोडी अशा घटना वाढ झाली आहे. त्यामुळे चोरट्यांना पोलीसांचा धाक राहिला नसल्याचे बोलले जात आहे.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे धाडसी चोरीची घटना घडली आहे..पहाटेच्या दरम्यान घरात घुसून चोरट्यांनी सहा तोळ्याचे दागिने आणी रोख अडीच लाख रूपयांवर डल्ला मारला आहे....

VO_ संगमनेर शहराजवळ असणाऱ्या सुकेवाडी येथील रामनाथ बाळाजी कुटे यांच्या घरात पहाटेच्या दरम्यान चोरटे घुसले आणी त्यांनी अडीच लाख रुपये रोख रक्कम आणि सहा तोळे सोन्याचांदीचे दागिने घेऊन पोबारा केलाय..चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून घरामध्ये प्रवेश केला मात्र याची घरच्यांना भनकही लागली नाही सकाळी जेव्हा घरचे लोक उठले तेव्हा झालेला हा प्रकार त्यांच्या लक्षात आला .. संगमनेर पोलिसांना खबर करताच त्यांनी श्वान पथकालाही पाचारण केले .. श्वानाने घरापासून एक किमी पर्यंत चोरांचा माग काढला मात्र तेथून चोरटे वाहनाने पसार झाल्याची शक्यता आहे.. संगमनेर शहर आणि परिसरात गंठण चोरी, पाकीटमारी, घरफोडी अशा घटना वारंवार घडत असल्याने चोरट्यांना पोलीसांचा धाक राहिला नसल्याचं चित्र निर्माण झालं आहे....

BITE_ रामनाथ कुटेBody:11 May Shirdi Sangamner RoberiyConclusion:11 May Shirdi Sangamner Roberiy
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.