ETV Bharat / state

नगर दक्षिण लोकसभा: 'सुजय - संग्राम' लढतीत विखे - पवारांची प्रतिष्ठा पणाला

लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने अहमदनगर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नगर दक्षिणच्या जागेसाठी आघाडीकडून राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप हे तर युतीकडून विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील निवडणुकीच्या रणांगणात उतरलेत. या मतदारसंघात शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: लक्ष घातल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.

नगर दक्षिण लोकसभा
author img

By

Published : Apr 10, 2019, 4:32 PM IST

Updated : Apr 11, 2019, 12:04 AM IST

अहमदनगर - लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने अहमदनगर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीसह भाजपच्या बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. नगर दक्षिणच्या जागेसाठी आघाडीकडून राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप हे तर युतीकडून विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील निवडणुकीच्या रणांगणात उतरलेत. या मतदारसंघात शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: लक्ष घातल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.

नगर दक्षिण लोकसभा: 'सुजय - संग्राम' लढतीत विखे - पवारांची प्रतिष्ठा पणाला

शिर्डी (पूर्वीचा कोपरगाव) लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जाती प्रवर्गाच्या लोकसंख्या निकषात अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाला. तेव्हापासून उत्तरेच्या काँग्रेसी पुढाऱ्यांची आणि त्यात खासदरकीसाठी नेहमीच स्पर्धेत असलेल्या विखे परिवाराने आपली नजर दक्षिण नगरकडे वळवली. त्याचाच प्रत्येय सध्या नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत आहे. नगर दक्षिणमध्ये जे राजकीय नाट्य सुरू आहे त्याचे पडसाद आघाडीवर पडताना दिसत आहेत. डॉ. सुजय विखेंचा या जागेसाठी आग्रह नसता तर भाजपचे विद्यमान खासदार दिलीप गांधी विरुद्ध राष्ट्रवादीच्या ढाकणे, घुले, कळमकर यापैकी एकजण निवडणुकीच्या रिंगणात असते आणि एक सामान्य लढत म्हणून या मतदारसंघाकडे पाहिले गेले असते.

  • २०१४ परिस्थिती

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत दिलीप गांधी हे भाजपकडून विजयी झाले होते. त्यांनी राष्ट्रवादीच्या राजीव राजळे यांचा पराभव केला होता.

  • विखे पाटलांचे मतदारसंघात जाळे

विखे परिवाराने डॉ. सुजय यांच्या रूपाने आपली पुढची पिढी राजकारणात उतरवण्यासाठी नगर दक्षिणची रणभूमी निवडली आहे. बाळासाहेब विखे यांनी जिल्हा विकास आघाडीच्या माध्यमातून दक्षिणेत तालुका-तालुक्यात आणि गावा-गावात सर्वपक्षीय मित्र केले आहेत. विखेंनी एकनिष्ठ कार्यकर्त्यांचे एक मोठे जाळे अनेक वर्षांपासून विणलेले होते. त्याचा लाभ बाळासाहेबानंतर राधाकृष्ण विखे यांना होतच होता. त्यामाध्यमातून जिल्हा परिषद, जिल्हा सहकारी बँक आपल्या ताब्यात ठेवण्यात विखे अनेकदा यशस्वी झाले. हा दबदबा कायम ठेवण्यासाठी, राज्यात आणि त्याचबरोबर पक्षांतर्गत विरोधक बाळासाहेब थोरात यांच्यावर मात करण्यासाठी दिल्ली सर करणे गरजेचे होते. त्यासाठी डॉ सुजय विखे हे ३ वर्षांपासून नगर दक्षिणेत जनसेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून कामाला लागले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसने ही जागा १९९९, २००९, २०१४ ला गमावलेली आहे. या ठिकाणी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा सातत्याने पराभव झाला ही वस्तुस्थिती आहे. या आधारावर जागांची अदलाबदली करून नगर दक्षिण काँग्रेस पक्षाला आणि पर्यायाने सुजय विखेंना सहज मिळेल असा अंदाज राधाकृष्ण विखेंचा होता. या भूमिकेला काँग्रेसच्या अशोक चव्हाण यांच्यासह सर्व वरिष्ठांचा (अगदी बाळासाहेब थोरतांचाही) पाठींबा होता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातत्याने आम्ही जागा काँग्रेसला सोडणार नाही असे स्पष्ट केले होते. त्यांची ही भूमिका स्वतः शरद पवारांशी पूर्ण विचारांती होती हे नंतर स्पष्ट झाले आहे.

  • मतदारसंख्या

१८ लाख ३१ हजार ५३८

  • पक्षीय बलाबल

या मतदारसंघात ६ विधानसभा क्षेत्रांचा समावेश होतो. यामध्ये ३ जागेवर भाजपचे, २ जागेवर राष्ट्रवादीचे तर १ जागेवर शिवसेनेचे वर्चस्व आहे.

  1. नगर शहर - विदयमान उमेदवार संग्राम जगताप (राष्ट्रवादी)
  2. श्रीगोंदा - राहुल जगताप (राष्ट्रवादी)
  3. कर्जत-जामखेड - पालकमंत्री राम शिंदे (भाजप)
  4. पाथर्डी - मोनिका राजळे (भाजप)
  5. राहुरी - शिवाजी कर्डीले (भाजप)
  6. पारनेर - विजय औटी (शिवसेना)

या मतदारसंघात युतीचे प्राबल्य दिसत असले तरी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या सुजय विखेंना सर्वजन मदत करतील की नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

  • पवार - विखेंची प्रतिष्ठा पणाला

या लढतीकडे आघाडी-युतीपेक्षा पवार आणि विखे यांच्यातील राजकीय संघर्षाची लढत म्हणून पाहिले जात आहे. यात डॉ. सुजय यांचा विजय झाल्यास राधाकृष्ण विखेंच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी संजीवनी असेल तर पवारांसाठी हा धक्का असेल. आमदार संग्राम जगताप विजयी झाले तर जगताप कुटुंबासाठी एक मोठी राजकीय लॉटरी असेल आणि पवारांसाठी १९९१ ची पुनरावर्ती असेल. तर राधाकृष्ण विखे यांच्यासमोर राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरेल असेही राजकीय विश्लेषक बोलत आहेत. त्यामुळे एकूणच नगर दक्षिण मतदारसंघात 'सुजय-संग्राम'यांच्यात सध्या मोठे राजकीय घमासान सुरू आहे.

  • जातीय समीकरणे

नगर शहरात मराठा, माळी, मुस्लिम, मागासवर्गीय, वंजारी, पदमसाळी, धनगर या उतरंडीवर मतदार विभागले आहेत. शहरात शिवसेनेने नेहमीच वर्चस्व ठेवले आहेत. मात्र, शिवसेनेचे राठोड आणि भाजपमध्ये कधीही सूत जुळले नाहीत. भाजपचे खासदार गांधी गट हा राष्ट्रवादीच्या जगताप यांच्या पूरक राहिल्याचे अनेकदा दिसून आले.

डिसेंबर २०१८ ला राष्ट्रवादी नगरसेवकांच्या समर्थनावर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भाजपला महापौर, उपमहापौरपद विनासायास मिळाले. हा विषय राज्यभर गाजला होता. मात्र, याप्रकरणी राष्ट्रवादीच्या 'त्या' १८ नगरसेवकांना प्रदेशाध्यक्षांनी निलंबित केले. त्यानंतर अवघ्या ३ महिन्यातच या नगरसेवकांना पुन्हा सन्मानाने पक्षात घेतले. पण हेही नगरमध्येच घडू शकते असे नागरिक अभिमानाने सांगतात. भाजपने विद्यमान खासदार दिलिप गांधी यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांच्या पुत्रांनी सुवेंद्र यांनी बंड पुकारले होते. पण ते तूर्तास शांत केले असले तरी खासदार गांधी गट डॉ. सुजय यांना किती प्रामाणिक मदत करेल यावर राजकीय विश्लेषक शंका व्यक्त करत आहे. असे असले तरी शिवसेनेचे अनिल राठोड मात्र, डॉ. सुजय यांच्या विजयासाठी धडाडीने कामाला लागले आहेत.

Intro:Body:

GANESH SIR

Conclusion:
Last Updated : Apr 11, 2019, 12:04 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.