ETV Bharat / state

'मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याने जनतेत रोष; भाजपाची पिछेहाट सुरू ' - Balasaheb thorat slam modi

लोकांना शाश्वत विकास पाहिजे भूलथापा व जाहिरातबाजी नको. त्यामुळेच मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या भाजपाबद्दल भारतीय जनतेमध्ये मोठा रोष निर्माण झाला आहे.

महसूल मंत्री थोरात
महसूल मंत्री थोरात
author img

By

Published : May 3, 2021, 3:02 PM IST

संगमनेर(अहमदनगर)- देशात सध्या कोरोनाचे मोठे संकट आहे. मात्र अशा संकटात कोरोनाशी लढण्याऐवजी भारताचे पंतप्रधान आणि सर्व केंद्रीय मंत्री सत्तेसाठी निवडणुका जिंकण्यात व्यग्र होते, अशी टीका महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. पाच राज्यातील निकाल रविवारी जाहीर झाले, त्यावरून थोरात यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

लोकांना शाश्वत विकास पाहिजे भूलथापा व जाहिरातबाजी नको. त्यामुळेच मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या भाजपाबद्दल भारतीय जनतेमध्ये मोठा रोष निर्माण झाला आहे. परिणामी भाजपाची पिछेहाट सुरू झाली असल्याची प्रतिक्रिया राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

थोरात पुढे म्हणाले की , जनतेला शाश्वत विकास व सुरक्षितता हवी आहे. मात्र भाजपाने मागील सात वर्षात फक्त जाहिरातबाजी केली आहे. कोणतेही विकासाचे काम केले नाही. पेट्रोल-डिझेलच्या किमती भरमसाठ वाढल्या आहेत. महागाईने जनता त्रस्त झाली असून देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. सर्वत्र बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. देशात हे सर्व मोठे प्रश्न निर्माण झाले असताना कोरोनाचे मोठे उभे संकट उभे राहिले आहे. अशा परिस्थितीत देशातील जनतेला मदत करण्याऐवजी भाजपाचे सरकार सत्तेसाठी निवडणुकांमध्ये भावनिक मुद्दे निर्माण करून जनतेचे लक्ष विचलित करत आहेत.

मूलभूत प्रश्नांकडे केंद्र सरकारचे दुर्लक्ष

देशात कोरोनाचे मोठे संकट आले आहे. यामुळे अनेकांचे प्राण गेले आहेत. त्यावर वेळीच उपाययोजना केली असती तर या संकटावर मात करता आली असती.
ज्या मुलभूत गोष्टी आहेत त्या होणे अत्यंत गरजेचे आहे. सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण तातडीने होणे गरजेचे आहे. महाराष्ट्रा मध्ये रेमडेसिवीर औषधांचा तुटवडा आहे. ऑक्सिजनची टंचाई सर्वत्र निर्माण झाली आहे. संपूर्ण देशामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाची लाट आली आहे. अजूनही अनेक राज्यात आवश्यक तेवढ्या तपासण्या झाल्या नाहीत. अशा मूलभूत प्रश्नांकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केले असल्याने भाजप कडून भारतीय जनतेचा मोठा भ्रमनिरास झाला आहे.

पश्चिम बंगालमधील निकाल भाजपाला चपराक-

पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांनी मिळवलेल्या ऐतिहासिक विजय हा भाजपला मोठा चपराक देणारा आहे. एक हाती निवडणूक जिंकणाऱ्या ममता बॅनर्जी यांचे आपण अभिनंदन करत असून इतर राज्यांमध्ये ही भाजपला रोखले जात आहे. आता तरी केंद्र सरकारने निवडणुकांच्या राजकारणा ऐवजी जनतेच्या विकासाचे राजकारण करत कोरोना संकटात नागरिकांना औषधोपचार, ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करून आर्थिक मदत करावी अशी मागणीही बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.