ETV Bharat / state

प्रवरा नदीपात्रातून खुलेआम वाळू उपसा; महसूल आणि पोलीस प्रशासनाचा कानाडोळा

उपसा केलेली वाळू प्लास्टिकच्या गोण्यांमध्ये भरून ती ट्युबच्या साहाय्याने बाहेर काढण्यात येत आहे. ट्युबच्या सहाय्याने वाळूने भरलेल्या तीन ते चार गोण्या बाहेर काढल्या जातात. त्यानंतर वाळू तस्कर रिक्षाच्या माध्यमातून गोण्यांची वाहतूक करतात.

author img

By

Published : Nov 16, 2019, 2:00 PM IST

प्रवरा नदीपात्र

अहमदनगर- संगमनेर बाह्यवळ मार्गावर प्रवरा नदीपात्रावरील पुलावरून पुणे-नाशिक महामार्ग जातो. या पुलालगत कासारवाडी शिवारातून ट्यूबच्या सहाय्याने वाळू चोरांनी दिवसरात्र बेकायदा उत्खनन सुरू केले आहे. वाळू चोरांनी नदीपात्रात धुडगूस घातला आहे. वाळू चोरीकडे स्थानिक महसूल आणि पोलीस प्रशासनाने सोयीस्करपणे दुर्लक्ष केल्याने स्थानिक नागरिक हवालदिल झाले आहेत.

अनोखी शक्कल लढवून वाळूमाफिया चोरताहेत वाळू

प्रवरा नदीपात्रात संगमनेर शहरासह नजीकच्या बहुतांश ठिकाणी खुलेआम मोठ्या प्रमाणात राजरोस वाळूचोरी सुरु आहे. नदीला पाणी असल्याने वाळू तस्कर प्रामुख्याने ट्यूबचा वापर करत आहे. शहरापासूनच हाकेच्या अंतरावर असलेल्या कासारवाडी शिवारात प्रवरा नदीपात्रात पाणी असताना देखील जवळपास वीस ते तीस वाळू तस्कर दिवसाढवळ्या अवैधरित्या वाळू उपसा करत आहे. विशेष बाब म्हणजे, पाण्यातून ही वाळू बाहेर काढण्यासाठी वाळू तस्करांनी आगळीवेगळीच शक्कल लढवली आहे.

उपसा केलेली वाळू प्लास्टिकच्या गोण्यांमध्ये भरूण ती ट्युबच्या साहाय्याने बाहेर काढण्यात येत आहे. ट्युबच्या सहाय्याने वाळूने भरलेल्या तीन ते चार गोण्या बाहेर काढल्या जाते. त्यानंतर वाळू तस्कर रिक्षाच्या माध्यमातून गोण्यांची वाहतूक करतात. पुणे-नाशिक महामार्गावर उभारलेल्या नवीन पुलावरून हा सर्व प्रकार नागरिकांना दिसत असला तरी, स्थानिक महसूल आणि पोलीस प्रशासनाने अर्थपूर्ण संबंधातून सोयीस्करपणे याप्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. बुधवारी दुपारी जवळपास ५०० ते ६०० वाळूने भरलेल्या गोण्यांचा ढीग या भागात पहावयास मिळाला. स्थानिक महसूल आणि पोलीस विभागाचा वाळू तस्कारांना आशीर्वाद असल्याने जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी आणि पोलीस अधीक्षक इशू सिंधू यांनीच या प्रकरणावर लक्ष घालावे, अशी मागणी संगमनेर पर्यावरण प्रेमी व नागरिकांनी केली आहे.

हेही वाचा- राष्ट्रपती राजवटीमुळे खासदार या नात्याने जबाबदारी वाढली - खासदार सुजय विखे

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ संगमनेर बाह्यवळ रस्त्यावरील प्रवरा नदीपात्रात पुणे नाशिक महामार्गावर उभारलेल्या नवीन पुलालगत कासारवाडी शिवारातून ट्यूबच्या सहाय्याने वाळूचोरांनी दिवसरात्र बेकायदा उत्खनन करून नदीपात्रात धुडगूस घातला आहे...या वाळू चोरीकडे स्थानिक महसूल आणि पोलीस प्रशासनाने सोयीस्करपणे दुर्लक्ष केल्याने स्थानिक नागरिक हवालदिल झाले आहे....

VO_ प्रवरा नदीपात्रात संगमनेर शहरासह नजीकच्या बहुतांश ठिकाणी खुलेआम मोठ्या प्रमाणात राजरोस वाळूचोरी सुरु आहे. नदीला पाणी असल्याने वाळू तस्कर प्रमुख्याने ट्यूबच्या वापर करत आहे. शहरापासूनच हाकेच्या अंतरावर असलेल्या कासारवाडी शिवारात प्रवरा नदीपात्रात पाणी असताना देखील जवळपास वीस ते तीस वाळू तस्कर दिवसाढवळया अवैधरित्या वाळू उपसा करत आहे. विशेषबाब म्हणजे पाण्यातून ही वाळू कशी बाहेर काढायची त्यासाठी या वाळू तस्करांनी चांगलीच शक्कल लढवली आहे. प्लास्टीकच्या गोण्यांमध्ये ही वाळू भरायची आणि ती ट्युबच्या साहाय्याने आल्हादपणे बाहेर काढायची टूपच्या माध्यमातून तीन ते चार वाळूने भरलेल्या गोण्या बाहेर काढता येत आहे. त्यानंतर रिक्षातून वाळू तस्कर या गोण्यांची वाहतूक करत आहेत. पुणे नाशिक महामार्गावर उभारलेल्या नवीन पुलावरून हा सर्व प्रकार नागरिकांना दिसत असला तरी स्थानिक महसूल आणि पोलीस प्रशासनाने अर्थपूर्ण संबंधातून सोयीस्करपणे दुर्लक्ष केल्याचे स्थानिक रहिवाश्यांचे म्हणणे आहे..बुधवारी दुपारी जवळपास पाचशे ते सहाशे वाळूने भरलेल्या गोण्यांचा ढीग या भागात पहावयास मिळाला. स्थानिक महसूल आणि पोलीस विभागाचा वाळू तस्कारांना आशीर्वीद असल्याने जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी आणि पोलिस अधीक्षक इशू सिंधू यांनीच लक्ष घालावे अशी मागणी संगमनेर पर्यावरण प्रेमी नागरिकांनी केली आहे....Body:mh_ahm_shirdi_sand smuggling_15_visuals_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_sand smuggling_15_visuals_mh10010
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.