ETV Bharat / state

अहमदनगर जिल्ह्यात दुष्काळामध्ये भ्रष्टाचार झाला.. रोहित पवारांची चौकशीची मागणी

भाजप सरकारच्या काळात अहमदनगर जिल्ह्यात दुष्काळावेळी राबविण्यात विविध योजनांतर भ्रष्टाचार झाला असून त्याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी जिल्हा नियोजन बैठकीत केली. यानिमित्ताने पवार यांनी तत्कालीन पालकमंत्री राम शिंदे यांच्यावर निशाणा साधल्याची चर्चा बैठकीत सुरू होती.

बैठकीपूर्वीचे छायाचित्र
बैठकीपूर्वीचे छायाचित्र
author img

By

Published : Jan 20, 2020, 9:07 PM IST

Updated : Jan 20, 2020, 11:08 PM IST

अहमदनगर - मागील सरकारच्या काळात दुष्काळावेळी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर टँकर, चारा छावण्यात घोटाळा झाला असून राज्य सरकारने जलयुक्त शिवार योजना राबवली त्यातही घोटाळा झाल्याने त्याची चौकशी व्हावी, अशी मागणी कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केली. यापूर्वी अनेकवेळा भाजप सरकारच्या काळात घोटाळे झाल्याचे आरोप झाले आहेत.

दुष्काळावेळी झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचा ठराव मंजूर

अहमदनगर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी हसन मुश्रीफ यांची नियुक्ती झाल्यानंतर प्रथमच सोमवारी (दि. 20 जाने.) मुश्रीफ अहमदनगरला आले होते. त्यांच्या उपस्थितीत अहमदनगर जिल्हा नियोजनाची बैठक आज संपन्न झाली. या बैठकीत अहमदनगर जिल्ह्यातील रस्ते, शाळा या विषयांवर जास्त निधीची मागणी अनेक सदस्यांनी केली. त्याचबरोबर जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी दुष्काळाच्या काळात झालेल्या विविध कामात झालेल्या घोटाळ्यांच्या चौकशीची मागणी केली.

घोटाळ्यांच्या चौकशीच्या निमित्ताने भाजप सरकारमध्ये पालकमंत्री राहिलेले राम शिंदे यांच्यावर रोहित पवार यांनी निशाणा साधल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. घोटाळ्याबाबात उच्चस्तरीय चौकशी करण्याचा ठराव यावेळी मंजूर करण्यात आला. तो शासनाला पाठवून याची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, असे हसन मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा - 'साई जन्मस्थळाबाबतच्या विधानावर टिप्पणी करण्याएवढा मी मोठा नाही'

साईबाबांच्या जन्मस्थानावरून सुरू असलेल्या वादावर बोलताना मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्याचे मुख्यमंत्री यावर योग्य आणि सर्वमान्य तोडगा काढतील असे सांगितले.

हेही वाचा - साई जन्मस्थळ वाद : 'शिर्डी बेमुदत बंद'ला राम शिंदेंचा पाठिंबा

Intro:अहमदनगर- पालकमंत्र्यांच्या पहिल्याच बैठकीत टँकर,चारा, जलयुक्तच्या घोटाळ्याच्या चौकशीची मागणी.. राम शिंदेंवर रोख!!Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_01_gardian_minister_meeting_pkg_7204297

अहमदनगर- पालकमंत्र्यांच्या पहिल्याच बैठकीत टँकर,चारा, जलयुक्तच्या घोटाळ्याच्या चौकशीची मागणी.. राम शिंदेंवर रोख!!
-साईबाबा जन्मस्थान मुद्यावर मुख8योग्य तोडगा काढतील-मुश्रीफ

अहमदनगर - मागील सरकारच्या दुष्काळाच्या काळात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर टँकर, चारा छवण्यात घोटाळा झाला असून राज्य सरकारने जलयुक्त शिवार योजना राबवली त्यातही घोटाळा झाल्याचे या आधी अनेकदा आरोप झाले आहेत, त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांनी जिल्हा नियोजन बैठकीत आज सोमवारी केली. 
अहमदनगर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी हसन मुश्रीफ यांची नियुक्ती झाल्यानंतर प्रथमच आज सोमवारी मुश्रीफ नगरला आले होते. त्यांच्या उपस्थितीत अहमदनगर जिल्हा नियोजनाची बैठक आज संपन्न झाली. या बैठकीमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील रस्ते, शाळा या विषयावरती जास्तीच्या निधीची मागण्या बैठकीत अनेक सदस्यांनी केली. त्याच बरोबर जामखेड चे आमदार रोहित पवार यांनी दुष्काळाच्या काळात झालेल्या विविध कामात झालेल्या घोटाळ्यांच्या चौकशीची मागणी केली. या विषयांची उच्चस्तरीय चौकशी करण्याचा ठराव यावरळू मंजूर केला असून तो शासनाला पाठवण्यात येईल आणि याची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल असे हसन मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.

बाईट रोहित पवार, आमदार.राष्ट्रवादी
बाईट- हसन मुश्रीफ-पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री

व्हीओ2- साईबाबांच्या जन्मस्थाना वरून सुरू असलेल्या वादावर बोलताना मुश्रीफ यांनी राज्याचे मुख्यमंत्री यावर योग्य आणि सर्वमान्य तोडगा काढतील असे सांगितले..

बाईट- हसन मुश्रीफ -पालकमंत्री

व्हीओ3- आज झालेल्या जिल्हा नियोजन बैठकीच्या निमित्ताने नगर मधे पहिल्यांदा आलेले पालकमंत्री मुश्रीफ यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. तसेच यानिमित्ताने घोटाळ्यांच्या चौकशीच्या निमित्ताने अगोदरच्या सरकार मधे पालकमंत्री राहिलेले राम शिंदे यांना रोहित पवार यांनी निशाण्यावर घेतल्याचे बोलले जात आहे..

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- पालकमंत्र्यांच्या पहिल्याच बैठकीत टँकर,चारा, जलयुक्तच्या घोटाळ्याच्या चौकशीची मागणी.. राम शिंदेंवर रोख!!
Last Updated : Jan 20, 2020, 11:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.