ETV Bharat / state

लसीकरणाआधी कोरोनाची रॅपीड अँटीजन टेस्ट करणे आता गरजेचे

author img

By

Published : May 10, 2021, 2:16 PM IST

अहमदनगर जिल्ह्यातील काही लसीकरण केंद्रावर लसीकरणाआधी कोरोनाची रॅपीड अँटीजन टेस्ट करण्याच येत आहे. ही टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास त्या व्यक्तीचे लसीकरण न करता त्याची लक्षणे बघून त्यांना लसीकरण केंद्राजवळच्या कोविड हेल्थ केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात येणार आहे.

लसीकरणाआधी कोरोनाची रॅपीड अँटीजन टेस्ट करणे आता गरजेचे
लसीकरणाआधी कोरोनाची रॅपीड अँटीजन टेस्ट करणे आता गरजेचे

अहमदनगर - जिल्ह्यातील काही लसीकरण केंद्रावर आता लसीकरणाआधी कोरोनाची रॅपीड अँटीजन टेस्ट करण्यास सुरवात झाली आहे. संगमनेर तालुक्यातील लसीकरण केंद्रांवर कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेण्याआधी रॅपिड अँटीजन टेस्ट केली जात आहे. लसीकरणासाठी सध्या सर्वच केंद्रांवर मोठी गर्दी होत असल्याने, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी रॅपिड अँटीजन चाचणी करण्यात येत आहे. या चाचणीमुळे एखादी व्यक्ती पॉझिटिव्ह आहे की नाही? हे तात्काळ समजणार आहे.

लसीकरणाआधी कोरोनाची रॅपीड अँटीजन टेस्ट करण्यास सुरवात

लक्षणे असल्यास लगेच कोविड हेल्थ केअर सेंटरमध्ये दाखल

ही टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास त्या व्यक्तीचे लसीकरण न करता त्याची लक्षणे बघून, सौम्य लक्षणे असल्यास लसीकरण केंद्राजवळच्या कोविड हेल्थ केअर सेंटरमध्ये आणि मध्यम तीव्र स्वरूपाची लक्षणे असल्यास लसीकरण केंद्राजवळच्या डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात येणार आहे. पॉझिटिव्ह असल्यास त्या व्यक्तीला लसीकरण करून उपयोग नाही, तसेच त्या व्यक्तीला लगेच आयसोलेट करता येईल आणि भविष्यातील प्रादुर्भाव थांबविता येईल व पॉझिटिव्ह असेल तर त्या व्यक्तीला लगेच लक्षणानुसार उपचार सुरू करता येईल. त्यामुळे रॅपिड अँटीजन चाचणी करण्यात येत आहे.

लसीकरणाबरोबरच टेस्टींग करणेही तीतकेच आवश्यक

लसीकरणाची नोंदणी करण्यासाठी तासनतास वाट बघावी लागत आहे. त्यानंतर आता पुन्हा रॅपीड टेस्टसाठी ताटकळत बसावे लागणार आहे. मात्र टेस्टची भीती न बाळगता नागरिकांनी लसीकरणाबरोबरच टेस्टींग करणेही तीतकेच आवश्यक असल्याचे समजुन घ्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडुन करण्यात येत आहे.

हेही वाचा - 40 टन ऑक्सिजन घेऊन आयएनएस त्रिकंड मुंबईत दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.