ETV Bharat / health-and-lifestyle

सावधान! तुम्ही देखील सकाळचा नाश्ता वगळता? होवू शकतात गंभीर परिणाम - Skipping Breakfast Side Effect

author img

By ETV Bharat Health Team

Published : 2 hours ago

Skipping Breakfast Side Effect: अनेक लोक विविध कारणांमुळे सकाळचा नाश्ता वगळतात. त्यांना वाटते की यामुळे शरीराला कोणतेच नुकसान होत नाही. परंतु सकाळचा नाश्ता वगळल्यास आपल्याला आरोग्यविषयक अनेक समस्या उद्भवू शकतात.

Skipping Breakfast Side Effect
सकाळचा नाश्ता (ETV Bharat)

Skipping Breakfast Side Effect: बरेच लोक अनेक कारणांमुळे सकाळचा नाश्ता वगळतात. काहींना ऑफिसला जाण्यास उशीर होतो म्हणून तर काही वजन वाढेल या भितीनं नाश्ता करत नाही. वजन कमी करणाऱ्या लोकांना वाटते की, सकाळी नाश्ता न केल्यास त्यांच वजन कमी होईल. तर,अनेकांना वाटते की सकाळचा नाश्ता न केल्यास कोणतेही विशेष नुकसान होणार नाही. परंतु सकाळचा नाश्ता स्किप केल्यास आरोग्यविषयक अनेक समस्या उद्भवू शकतात. महिनाभर सतत सकाळचा नाश्ता वगळल्यास काय होते? याबद्दल आपण या लेखातून जाणून घेणार घेऊया.

  • वजन वाढते: बऱ्याच लोकांचा असा गैरसमज आहे की, जास्त वेळ उपाशी राहिल्यास किंवा नाश्ता वगळल्यास वजन कमी होतं. जर तुम्ही सुद्धा हा विचार करत असाल, तर तुम्ही स्वतःची फसवणूक करत आहात. कारण नाश्ता न केल्यामुळे जेवतांना आपण जास्त अन्न खातो. परिणामी जास्त कॅलरीज शरीरात घेतो, त्यामुळे वजन कमी होण्याव्यतीरिक्त ते वाढते.
  • स्मरणशक्ती, शैक्षणिक आणि एकाग्रतेवर परिणाम : संतुलित न्याहारी मेंदूला इष्टतम कार्यासाठी आवश्यक ग्लुकोज प्रदान करते. नाश्ता वगळल्यास एकाग्रता, स्मरणशक्ती बिघडते. त्यामुळे एकूणच संज्ञानात्मक कार्यक्षमतेत बिघाड होवू शकते. विशेषतः किशोरवयीन मुलांवर याचा परिणाम जास्त होतो. याव्यतिरिक्त महिनाभर नाश्ता न केल्यास चिंता, चिडचिड आणि नैराश्याची समस्या उद्भवते.
  • मधुमेह : नाश्ता स्किप केल्यास मधुमेहाचा धोका जास्त वाढतो. सतत नाश्ता न केल्यास टाइप 2 मधुमेहाचा धोका 20 टक्क्या पेक्षा जास्त असतो.
  • हृदयविकाराचा झटका : सतत नाश्ता वगळल्यास हृदविकाराचा झटका आणि रक्तवाहिन्यांसंबंधीत घटनांचा धोका वाढतो.
  • पौष्टिक घटकांची कमतरता : महिनाभर नाश्ता वगळल्यास शरीराला पाहिजे त्या प्रमाणात फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे, कॅल्शियम यासारखे पोषक घटक मिळत नाही. यामुळे आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होवू शकतात.
  • मेटाबॉलिक सिंड्रोम : नाश्ता वगळल्यास शरीरातील मेटाबॉलिज्मचं नुकसान होते. बऱ्याच वेळ उपाशी राहिल्यानं शरीराच्या कॅलरीज बर्न करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. यामुळे स्ट्रोक, टाइप 2 मधुमेह आणि हृदविकाराचा धोका वाढतो.

संदर्भ

https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC6787634/

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

हेही वाचा

  1. स्ट्रेच मार्क्सच्या समस्येनं त्रस्त आहात? करा 'हे' उपाय - Pregnancy stretch marks oils
  2. मानदुखीच्या समस्येनं त्रस्त आहात? फॉलो करा तज्ज्ञांनी दिलेल्या टिप्स, मानदुखी होईल कमी - Neck Pain
  3. कोरफड एक फायदे अनेक, जाणून घ्या कोरफडीचे फायदे - Aloe Vera Gel Benefits For Skin

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.