ETV Bharat / technology

Vivo V40e ची भारतात जोरदार एंट्री, 50MP आय ऑटोफोकस फ्रंट कॅमेरा, 'इतकी' आहे किंमत - Vivo V40e - VIVO V40E

Vivo V40e Launched : Vivo V40e स्मार्टफोन भारतात लॉंच करण्यात आला आहे. 6.77 इंचाचा मोठा डिस्प्ले, 50MP फ्रंट कॅमेरा, 5500mAh मोठ्या बॅटरीसह या फोनच काय वैशिष्ट्ये आहे जाणून घ्या...

Vivo V40e
Vivo V40e (Vivo)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Sep 25, 2024, 2:30 PM IST

हैदराबाद Vivo V40e Launched : Vivo नं आपला नवीन स्मार्टफोन Vivo V40e आज भारतात एका व्हर्च्युअल इव्हेंटमध्ये लाँच केला. Vivo V40e मध्ये 6.77 इंच 120 Hz 3D वक्र AMOLED डिस्प्ले, 50MP आय ऑटोफोकस फ्रंट कॅमेरा, MediaTek Dimensity 7300 चिपसेट, 8GB व्हर्च्युअल रॅमसह 8GB इनबिल्ट रॅम सारखी वैशिष्ट्ये आहेत. Vivo च्या या हँडसेटमध्ये काय खास आहे? किंमत आणि वैशिष्ट्ये सर्व तपशील जाणून घ्या...

Vivo V40e वैशिष्ट्ये : Vivo V40E ला उर्जा करण्यासाठी, एक मोठी 5500mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हँडसेटमध्ये 6.77 इंच (2392 x 1080 पिक्सेल) फुलएचडी एमोलेड स्क्रीन आहे. स्क्रीनचा आस्पेक्ट रेशो 20:9 असून तो 120Hz रिफ्रेश रेट ऑफर करतो.

256 GB इनबिल्ट स्टोरेज इनबिल्ट : Vivo V40e स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimension 7300 4nm प्रोसेसर आहे. हँडसेटमध्ये Mali-G615 MC2 GPU उपलब्ध आहे. या फोनमध्ये 8 GB रॅमसह 128 GB आणि 256 GB इनबिल्ट स्टोरेजचा पर्याय आहे.

50 मेगापिक्सेल कॅमेरा : Vivo V40E स्मार्टफोनमध्ये अपर्चर F/1.79 सह 50 मेगापिक्सेल प्राइमरी आणि अपर्चर F/2.2 सह 8 मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड कॅमेरा असलेला ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. हँडसेटमध्ये ऍपर्चर F/2.0 सह 50-मेगापिक्सलचा i-ऑटो फोकस फ्रंट कॅमेरा आहे. स्मार्टफोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे. फोनमध्ये यूएसबी टाइप-सी ऑडिओ आणि स्टिरिओ स्पीकर आहेत.

Android 14 आधारित : Vivo चा हा नवीन फोन Android 14 आधारित FuntouchOS 14 सह येतो. फोन ड्युअल सिमला सपोर्ट करतो. डिव्हाइसचे परिमाण 163.72×75×7.49mm आणि वजन 183 ग्रॅम आहे. कनेक्टिव्हिटीसाठी 5G, Dual 4G VoLTE, Wi-Fi, Bluetooth 5.4, GPS आणि USB Type-C फीचर्स दिले आहेत.

Vivo V40e किंमत : Vivo V40E स्मार्टफोनचा 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज व्हेरिएंट 28 हजार 999 रुपयांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. यात 8 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज मॉडेल 30 हजार 999 रुपयांना उपलब्ध करून देण्यात आलं आहे. हा फोन रॉयल ब्रॉन्झ आणि मिंट ग्रीन कलरमध्ये खरेदी करता येईल.

10 टक्के फ्लॅट डिस्काउंट : या Vivo फोनची विक्री 2 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. हँडसेट आता फ्लिपकार्ट, विवो इंडियाच्या ऑनलाइन स्टोअर आणि ऑफलाइन स्टोअर्सवरून प्री-बुक केला जाऊ शकतो. SBI आणि HDFC बँक कार्ड्सने हँडसेट खरेदी केल्यास तुम्हाला 10 टक्के फ्लॅट डिस्काउंट मिळेल. तसंच 6 महिन्यांपर्यंत विनाखर्च EMI वर फोन मिळवण्याची संधी आहे.

हे वाचंलत का :

  1. 17 हजारांचा सॅमसंग गॅलॅक्‍सी A14-5G फक्‍त 9999 रुपायांमध्ये, फक्त 'या' वेबसाईटवर मिळतेय ऑफर - Flipkart Big Billion Day Sale Offer
  2. BSNL चा स्वस्त रिचार्ज प्लॅन, ग्राहकांना मिळतोय 1 GB दैनिक डेटा - Cheapest plan of BSNL
  3. Samsung Galaxy M55s 5G फोनवर दोन हजारांची सुट, मॉन्स्टर शॉट्ससाठी 50MP ट्रिपल कॅमेरा - Samsung Galaxy M55s 5G Launched

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.