ETV Bharat / state

राम शिंदे हे तर बॅनर मंत्री; रोहित पवारांची अहमदनगरमध्ये टीका

रोहित पवार हेच आता कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. याला दुजोरा देत सभेत उपस्थित असलेले प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रोहित पवार हेच कर्जत-जामखेडचे पुढचे आमदार असतील, असे जाहीर वक्तव्य करुन दिला.

author img

By

Published : Aug 27, 2019, 9:00 PM IST

रोहित पवार

अहमदनगर - गेली दहा वर्षे लोकप्रतिनिधी असलेले राम शिंदे हे सध्या गावागावात विकास केल्याचे बॅनर लावत आहेत. पण केलेली कामे नागरिकांना दिसत नाहीत. विकास केल्याचे त्यांना बॅनर लावून सांगण्याची वेळ आली असल्याने जामखेडचे लोकप्रतिनिधी हे बॅनर मंत्री असल्याची टीका राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी केली आहे. खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या शिवस्वराज्य यात्रेनिमित्ताने जामखेड बाजारतळावर आयोजित जाहीर सभेत बोलताना रोहित पवार यांनी ही टीका केली.

शिवस्वराज्य यात्रेत बोलताना रोहित पवार

रोहित पवार हेच आता कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. याला दुजोरा देत सभेत उपस्थित असलेले प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रोहित पवार हेच कर्जत-जामखेडचे पुढचे आमदार असतील, असे जाहीर वक्तव्य करुन दिला. सभेस खासदार अमोल कोल्हे, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, पक्ष प्रवक्ते अंकुश काकडे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब खान आदी उपस्थित होते. याच मतदारसंघातून उमेदवारी मागत असलेल्या महिला जिल्हाध्यक्षा मंजुषा गुंड मात्र सभेस अनुपस्थित होत्या. जामखेडमध्ये एकाच दिवशी मुख्यमंत्री फडणवीस यांची महाजनादेश यात्रा आणि राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा आलेल्या असताना या सभांना मोठ्या गर्दीची तजवीज दोन्ही बाजूंनी केल्याचे दिसून आले.

Intro:अहमदनगर- राम शिंदें हे बॅनर मंत्री.. जामखेडकर बॅनरवरचा विकास शोधतायेत-रोहित पवार यांची टीकाBody:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_01_jamkhed_ncp_yatra_vij_7204297

अहमदनगर- राम शिंदें हे बॅनर मंत्री.. जामखेडकर बॅनरवरचा विकास शोधतायेत-रोहित पवार यांची टीका

अहमदनगर- गेली दहा वर्षे लोकप्रतिनिधी असलेले राम शिंदे हे सध्या गावागावात विकास केल्याचे बॅनर लावताहेत. पण केलेली कामे नागरिकांना दिसत नाहीत. विकास केल्याचे त्यांना बॅनर लावून सांगण्याची वेळ आली असल्याने जमखेडचे लोकप्रतिनिधी हे बॅनर मंत्री असल्याची तिखट टीका राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी केली आहे. खा.अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या शिवस्वराज्य यात्रे निमित्ताने जामखेड बाजारतळावर आयोजित जाहीर सभेत बोलताना रोहित पवार यांनी ही टीका केली. रोहित पवार हेच आता कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार असल्याचे एव्हाना स्पष्ट झाले आहे. याची स्पृष्टी सभेस उपस्थित असलेले प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रोहित पवार हेच कर्जत-जमखेडचे पुढचे आमदार असतील असे जाहीर वक्तव्य करून यावेळी दिली. सभेस खा.अमोल कोल्हे, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, पक्ष प्रवक्ते अंकुश काकडे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके,युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब खान आदी उपस्थित होते. याच मतदारसंघातून उमेदवारी मागत असलेल्या महिला जिल्हाध्यक्षा मंजुषा गुंड मात्र सभेस अनुपस्थित होत्या. जामखेड मधे एकाच दिवशी मुख्यमंत्री फडणवीस यांची महाजनांदेश यात्रा आणि राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा आलेल्या असताना या सभांना मोठ्या गर्दीची तजवीज दोन्ही बाजूंनी केल्याचे दिसून आले.

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- राम शिंदें हे बॅनर मंत्री.. जामखेडकर बॅनरवरचा विकास शोधतायेत-रोहित पवार यांची टीका
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.