ETV Bharat / state

राळेगणसिद्धीत आज चुलबंद आंदोलन; मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय कृषीमंत्री दाखल

आंदोलनाची तीव्रता वाढत असताना आता केंद्र आणि राज्य सरकारने हे आंदोलन थांबवण्याच्या दृष्टीने अण्णांच्या मागण्या सकारात्मक घेतल्याचे दिसून येत आहे. अण्णांचे आंदोलन थांबवण्यासाठी मुख्यमंत्री आणि केंद्रीय कृषीमंत्री राळेगणसिद्धीत दाखल झाले आहेत.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे
author img

By

Published : Feb 5, 2019, 2:34 PM IST

Updated : Feb 5, 2019, 4:18 PM IST

अहमदनगर - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचा आज सातवा दिवस आहे. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मंगळवारी ग्रामस्थांनी चुलबंद आंदोलन सुरू केले आहे. दुसरीकडे राज्य आणि केंद्र सरकारच्या वतीने अण्णांच्या मागण्या पूर्ण होण्याच्या दृष्टीने हालचालींना वेग आल्याचे दिसून येते आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह जलसंपदा मंत्री गिरीश महाजन राळेगणसिद्धीत दाखल झाले आहेत.

विविध खात्यांचे सचिवही राळेगणसिद्धीमध्ये दाखल झाल्याची माहिती आहे. त्या अनुषंगाने पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. एकूणच आंदोलनाची तीव्रता वाढत असताना आता केंद्र आणि राज्य सरकारने हे आंदोलन थांबवण्याच्या दृष्टीने अण्णांच्या मागण्या सकारात्मक घेतल्याचे दिसून येत आहे. कृषिमुल्य आयोगासंदर्भात असलेले अण्णांचे प्रश्न आणि मागण्यांवर सरकारकडून ठोस लेखी आश्वासन मिळाले तर अण्णा आपले आंदोलन थांबण्याची शक्यता आहे.

Intro:अहमदनगर- -राळेगण मध्ये आज चुलबंद आंदोलन, मंत्री गण येण्याची दाट श्यक्यता

Body:

mh_ahm_trimukhe_1_andolan_5_feb_wkt

अहमदनगर- -राळेगण मध्ये आज चुलबंद आंदोलन, मंत्री गण येण्याची दाट श्यक्यता

(wkt पाठवला आहे..)

अहमदनगर- समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनाच्या सातव्या दिवशी आज मंगळवारी ग्रामस्थांनी आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतलेला आहे. दुसरीकडे राज्य आणि केंद्र सरकारच्या वतीने अण्णांच्या मागण्या पूर्ण होण्याच्या दृष्टीने हालचालींना वेग आल्याचे दिसून येते आणि त्यामुळेच आज केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि विविध खात्यांचे सचिव थोड्याच वेळात राळेगणसिद्धीमध्ये दाखल होत असल्याची माहिती आहे. त्यानुषंगाने पोलीस प्रशासन या ठिकाणी सज्ज झाले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस येत असल्याची माहिती उपलब्ध झालेली आहे. एकूणच आंदोलनाची तीव्रता वाढत असताना आता केंद्र आणि राज्य सरकारने हे आंदोलन थांबवण्याच्या दृष्टीने अण्णांच्या मागण्या सकारात्मक घेतल्याचे दिसून येतेय. कृषी मूल्य आयोगासंदर्भात असलेले अण्णांचे प्रश्न आणि मागण्या यावर तोडगा निघाल्यास आणि त्याबद्दल सरकारकडून ठोस असे लेखी आश्वासन मिळाले तर अण्णा आपले आंदोलन थांबण्याची शक्यता आहे.

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर

Conclusion:अहमदनगर- -राळेगण मध्ये आज चुलबंद आंदोलन, मंत्री गण येण्याची दाट श्यक्यता
Last Updated : Feb 5, 2019, 4:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.