ETV Bharat / state

राज ठाकरेंनी महसूल वाढीसाठी सुचवलेली सूचना असंवेदनशील - हेरंब कुलकर्णी - hemant kulkarni shirdi lockdown

सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार आणि पेन्शनवर महिन्याला 12 हजार कोटीचा खर्च येतो. राज्याच्या महसुलाची चिंता असेल, तर गोर गरीबाच्या घरातील पैसा काढण्याऐवजी या रकमेतून दहा टक्के जरी कपात केली, तरी तुमची महसूल तूट भरुन निघेल. आमदार निधीही कमी केला, तरी प्रश्न सुटेल. महसुलासाठी दारु दुकाने सुरू करण्याचा विचार करण्याऐवजी ग्रामीण भागातील लोकांकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे हेरंब कुलकर्णी म्हणाले आहेत.

हेरंब कुलकर्णी
हेरंब कुलकर्णी
author img

By

Published : Apr 24, 2020, 3:54 PM IST

शिर्डी (अहमदनगर) - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महसूल वाढीसाठी सूचवलेली सूचना असंवेदनशील असल्याची टीका सामाजिक आणि शिक्षण क्षेत्रात काम करणारे हेरंब कुलकर्णी यांनी केली आहे. लॉकडाऊनमुळे महाराष्ट्राच्या महसुलात सातत्याने घट होत आहे. वाईन शॉप पुन्हा सुरू केल्यास राज्याच्या महसुलात वाढ होईल, असे राज ठाकरे यांनी सूचवले आहे. यापार्श्वभूमीवर त्यांनी ही टीका केली आहे.

हेरंब कुलकर्णी, शिर्डी

सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार आणि पेन्शनवर महिन्याला 12 हजार कोटीचा खर्च येतो. राज्याच्या महसुलाची चिंता असेल, तर गोर गरीबाच्या घरातील पैसा काढण्याऐवजी या रकमेतून दहा टक्के जरी कपात केली तरी तुमची महसूल तूट भरुन निघेल. आमदार निधीही कमी केला तरी प्रश्न सुटेल. महसुलासाठी दारू दुकाने सुरू करण्याचा विचार करण्याऐवजी ग्रामीण भागातील लोकांकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे हेरंब कुलकर्णी म्हणाले आहेत.

राज्यातील दारू दुकाने लॉकडाऊनमुळे बंद असल्याने आज अनेकांची दारू सुटण्याच्या मार्गावर आहे. तर नवऱ्याने व्यसन न केल्याने कौटुंबिक हिंसाचारातही घट झाली आहे. नवऱ्याची दारू सुटली म्हणून अनेक महिला आनंदात आहेत. मात्र, मुख्यमंत्र्यांचे बंधु राज ठाकरेंनी केवळ महसुलासाठी दारूची दुकाने सुरू ठेवण्याची मागणी केली आहे. त्यांना ग्रामीण भागातील महिलांचा आक्रोश कसा कळत नाही ? असा प्रश्न हेरंब कुलकर्णी यांनी उपस्थित केला आहे.

दारूची आजही दुप्पट-तिप्पट दराने विक्री होत आहे. ज्यांच्याकडै पैसा आहे ते दारू विकत घेत आहेत. काही लोक भाव जास्त असल्याने 'नको रे बाबा' म्हणत दारू सुटल्याच्या मनस्थितीत आहे. एकंदरीत वाईन शॉपबद्दल सरकारने सर्व बाबींचा विचार करावा, असे कुलकर्णी म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.