अहमदनगर, शिर्डी : आज राज ठाकरे यांनी सपत्नीक शिर्डी साईबाबांचे दर्शन ( Raj Thackeray Took Saidarshan with Wife ) घेतले. साईबाबांच्या दर्शनानंतर राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलण्यास टाळले. मात्र, राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांना पत्रकारांनी विचारल्यानंतर शिर्डी साईबाबांची आमच्या ठाकरे कुटुंबीयांवर मोठी कृपा आहे. साईबाबांनी आम्हाला भरभरून दिले आहे. तसेच दसरा मेळाव्याकडे कसे बघतात याबाबत राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांना विचारले असता आम्हाला काही वाटत नाही, असे म्हणत ( On Dasara Melava We Don Think Anything ) त्यांनी जास्त बोलणे टाळले.
राज ठाकरे यांचे साईदर्शनासाठी सपत्नीक शिर्डीत आगमन : सर्वांचे लक्ष मुंबईत होणाऱ्या शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या दसरा मेळाव्याकडे लागले आहे. असे असताना राज ठाकरे हे सपत्नीक अनेक दिवसानंतर शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी आले होते. साईबाबांच्या दर्शनानंतर राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलण्यास टाळले. मात्र, राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांना पत्रकारांनी विचारल्यानंतर शिर्डी साईबाबांची आमच्या ठाकरे कुटुंबीयांवर मोठी कृपा आहे. साईबाबांनी आम्हाला भरभरून दिले आहे.
साईबाबांचे दर्शन घेऊन मनाला समाधान वाटले : शिर्डी साईबाबांचे परमभक्त असलेले राज ठाकरे आज कुटुंबीयांसोबत अनेक दिवसांनंतर शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी आले होते. साईबाबांच्या दर्शनानंतर राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलण्यास टाळले. मात्र, राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांना पत्रकारांनी विचारल्यानंतर शिर्डी साईबाबांची आमच्या ठाकरे कुटुंबीयांवर मोठी कृपा आहे. साईबाबांनी आम्हाला भरभरून दिले आहे. अनेक दिवसांपासून साईबाबांच्या दर्शनासाठी येण्याची इच्छा होती. मात्र, कोरोनामुळे मंदिर बंद होते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने सर्व खुले झाले. आज दोन वर्षांनंतर साईबाबांच्या दर्शनासाठी येण्याचा योग आला असून, साईबाबांचे दर्शन घेऊन मनाला समाधान वाटले असल्याचे शर्मिला ठाकरे यावेळी म्हणाल्या आहेत.
भाग्याश्री बानायत यांनी शाल व साईमूर्ती देऊन ठाकरे पती-पत्नीचा सन्मान केला : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सहपत्नीक शिर्डीत येऊन साईबाबा समाधीचे दर्शन घेतले आहे. यावेळी राज ठाकरे आणि पत्नी शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते साईबाबांची शिर्डी माझे पंढरपूर ही छोटी आरती करण्यात आली. तसेच, साईबाबांची पाद्यपूजाही ठाकरे यांनी केली. साईबाबांच्या दर्शनानंतर साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्याश्री बानायत यांनी शाल व साईमूर्ती देऊन ठाकरे पती-पत्नीचा सन्मान केला आहे.
चाहत्यांनी विमानतळावर आणि मंदिर परिसरात एकच गर्दी केली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे शिर्डीच्या दौऱ्यावर येणार म्हटल्यावर त्यांच्या चाहत्यांनी विमानतळावर आणि मंदिर परिसरात एकच गर्दी केली होती. अनेकांना त्यांना भेटायचे होते सत्कार करायचा होता. फोटोही काढायचे होते. त्यात गर्दीत अनेकांची ही गडबड सुरू असतांना शिर्डीच्या विमानतळावर काही मनसैनिकांनी आपल्या मुलांनाही सोबत आणले होते. गर्दी मोठी झाल्याने राज ठाकरे विमातळातून बाहेर येत असताना एका मनसे कार्यकर्त्याने चिमुकल्याला आपल्या खांद्यावर बसवले होते. राज ठाकरे जवळ येताच त्या चिमुकल्याने ठाकरेंना एक लाल कलरची पगडी भेट देत घालण्याचा आग्रह केला. त्या चिमुकल्याचा हट्ट राज ठाकरेही मोडू शकले नाही. त्यांनी दोन मिनिटे पगडी डोक्यावर घालत त्या बालसैनिकाचे समाधान केले.
राज ठाकरेंनी केले भक्तांशी हस्तांदोलन केले : त्यानंतर राज ठाकरे साईमंदिरात आले. मंदिरात जाऊन दर्शन घेऊन राज बाहेर आले तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या भक्तांनी साईनांमाचा जलघोष केला. त्यानंतर राज ठाकरे यांनी बँरीगेट जवळ उभ्या असलेल्या भक्तांची भेट घेत घेतली. त्यावेळी तिथे उपस्थित एका जोडप्याकडील चिमुकल्याचे गाल धरत राज यांनी गोंजारले. यावेळी त्या चिमुकल्याने काही वेळ राज यांचे बोट धरून ठेवले होते. त्यानंतर राज ठाकरेंनी इतरही भक्तांशी हस्तांदोलन केले. त्यावेळी तुम्हालाही माझ्याबरोबर सेल्फी घ्यायचा असेल तर घ्या, असे राज ठाकरे त्यांना म्हणाले. मात्र, आम्हाला मोबाईलचमध्ये आणू दिले नाही, असे भक्तांनी सांगितले.
महाराष्ट्र नवनिर्माण अध्यक्ष राज ठाकरेंनी आपल्या कुटुबियांसमवेत शिर्डीला येऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. आता राज ठाकरे येणार म्हटल्यावर मनसे कार्यकर्ते गर्दी करणारच. तसेच, शिर्डी विमानतळावर ही जमले होते. मात्र, त्यात विमानतळावर नगर दक्षिणेचे भाजप खासदार सुजय विखेंची एन्ट्री झाली आणि सगळ्याच्या नजरा तिकडे वळाल्या सुजय विखेंनी मनसेच्या स्थानिक नेत्यांच्या भेटी घेतल्या आणि राज ठाकरेंचे विमानतळावर आगमन झाल्यानंतर त्यांचे सर्वात आधी स्वागतही केले.
यावेळी माध्यमांनी सुजय विखेंना भेटीबाबत विचारले असता, राज ठाकरेंची भाषणे मी नेहमी एकतो मी त्यांचा फॅन आहे. माझ्यावर त्यांचा प्रभावही आहे. ते माझ्या वडीलांच्या मतदारसंघात आल्याने आणि मी त्यांचा फॅन असल्याने त्यांच्या स्वागतासाठी आल्याचे म्हटले आहे. सध्या भाजपची आणि मनसेची जवळीक वाढतेय तुम्हाला काय वाटते? असे विचारल्यानंतर मला जे वाटत ते मी माझ्या मनातच ठेवत असल्याचे सांगत त्या विषयावर जास्त न बोलणे पसंत केले.