अहमदनगर - श्रीगोंदा-बेळवंडी रेल्वे स्थानकादरम्यान दौंडहुन मनमाडकडे जाणारी एका मालगाडीचे दहा डबे रुळावरून घसरले आहेत. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र रेल्वे रुळाचे मोठे नुकसान झाले आहे. रेल्वे रूळ पुन्हा दुरुस्त करून घसरलेले डबे रुळावर आणण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू करण्यात आले आहे. तरी सोलापूर, पुणेहून दौंडमार्गे मनमाडकडे जाणाऱ्या इतर रेल्वे गाड्या थांबवण्यात आलेल्या असल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. या मार्गावरून धावणाऱ्या पाच गाड्या पुणेमार्गे वळविण्यात आल्या आहेत.
दौंड-मनमाड रेल्वे मार्गावर मालगाडीचे दहा डबे घसरले, रेल्वे वाहतूक विस्कळीत
मनमाड-दौंड रेल्वेमार्गावरील श्रीगोंदा रेल्वे स्थानकाजवळ बुधवारी पहाटे मालगाडीचे १२ डबे घसरले. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, यामुळे रेल्वेरुळांचे मोठे नुकसान झाले असून या मार्गावरून धावणाऱ्या पाच गाड्या पुणेमार्गे वळविण्यात आल्या आहेत.