ETV Bharat / state

Ahmednagar Crime : नोकरी फसवणूक प्रकरणी सैराट चित्रपटातील प्रिन्स पोलिसांच्या रडारवर, आणखी एका आरोपीला अटक - मंत्रालयातील नोकरीचे आमिष

मंत्रालयात नोकरी लावतो, असे आमिष दाखवून अनेकांना गंडा घालणाच्या प्रकरणात राहुरी पोलिसांनी तिघांना अटक केली ( case of cheating by pretending to ministerial job ) आहे. सर्वत्र गाजलेल्या सैराट चित्रपटातील प्रिन्सची भूमिका साकारणाऱ्या सूरज पवार हा पोलिसांच्या रडारवर असताना राहुरी तालुक्यातील खंडांबे येथील एकास पोलिसांनी ताब्यात ( Police arrested accused ) घेतले.

Suraj Pawar
आरोपी सूरज पवार
author img

By

Published : Sep 16, 2022, 3:10 PM IST

Updated : Sep 16, 2022, 3:34 PM IST

अहमदनगर - मंत्रालयात नोकरी लावतो, असे आमिष दाखवून अनेकांना गंडा घालणाच्या प्रकरणात राहुरी पोलिसांनी तिघांना अटक केली ( case of cheating by pretending to ministerial job ) आहे. सर्वत्र गाजलेल्या सैराट चित्रपटातील प्रिन्सची भूमिका साकारणाऱ्या सूरज पवार हा पोलिसांच्या रडारवर असताना राहुरी तालुक्यातील खंडांबे येथील एकास पोलिसांनी ताब्यात ( Police arrested accused ) घेतले. परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मंत्रालयात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून पैसे उकळले विजय बाळासाहेब साळे वय ३१ असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. नेवासा येथील महेश वाघडकर याने फिर्याद दिल्यानंतर मंत्रालयात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून पैसे उकळणारे तिघांना दत्तात्रय क्षीरसागर आकाश शिंदे व ओंकार तरटे या तिघांना अटक केली होती. त्यानंतर राहुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रतापराव दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सज्जन नार्हेडा यांच्या पथकाने खंडांबे येथून विजय बाळासाहेब साळे यास ताब्यात घेतले (Rahuri Police arrested accused ) आहे. या फसवणूक प्रकरणात आरोपींची संख्या वाढत असल्याने मोठं रॅकेट उघडकीस होणार असून, अनेक नावे यात समोर येणार येण्याची शक्यता आहे.

काय आहे नक्की प्रकरण ? याबाबत सविस्तर माहिती अशी की, महेश बाळकृष्ण वाघडकर रा.भेंडा, ता. नेवासा. जि.अ.नगर याला दि ३ सप्टेंबर रोजी एक फोन आला. समोरची व्यक्ती म्हणाला की, मी श्रीरंग कुलकर्णी सामाजिक न्याय विभाग मंत्रालयातून बोलत आहे. आमच्या विभागात कोरोनामुळे दोन जणांचा मृत्यु झाला आहे. त्यांच्या सहायक कक्षाधिकारी म्हणून जागा खाली असून त्या भरायच्या आहेत. तेथे तुम्ही इच्छुक असाल, तर तुम्हाला पाच लाख रुपये द्यावे लागतील. काम होण्यापुर्वी दोन लाख आणि जेव्हा तुमच्या हातात ऑर्डर तयार होईल. तेव्हा तीन लाख रुपये द्या. त्यामुळे रोजगाराचा प्रश्न असल्याने वाघडकर यांनी पैसे देण्यास सहमती दर्शविली. तर ठरल्याप्रमाणे दि ४ सप्टेंबर २०२२ रोजी राहुरी बस स्थानकावर दोघांमध्ये तोंडी करार झाला आणि पहिल्या टप्प्यात त्याने आरोपीस दोन लाख रुपये दिले. तर उरलेली रक्कम ३ लाख रुपये ही नियुक्तीपत्र आल्यानंतर देण्याचे ठरले होते.

बनावट कार्ड असल्याची माहिती समोर दरम्यान २ दोन दिवसानंतर तुमचे नियुक्तीपत्र हे राहुरी विद्यापीठ येथे घेऊन येऊ असे सांगितले. त्यानंतर दि ९ सप्टेंबर रोजी आरोपी तथा तोतया श्रीरंग कुलकर्णी याने विद्यापीठ येथे येणार असल्याचे सांगितल्याने फिर्यादी वाघडकर हे देखील तेथे गेले. त्यांनी सोबत तीन लाख रुपये देखील नेले होते. जेव्हा तोतया श्रीरंग कुलकर्णी हा तेथे आला. तेव्हा तो राहुरी विद्यापीठाच्या व्हीआयपी गेस्ट हाऊस येथे थांबला होता. त्याच्याकडे काही बनावट कार्ड असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र जेव्हा आरोपी आणि फिर्यादी हे तेथे भेटले, तेव्हा आरोपीच्या काही गोष्टींचा वाघडकर यांना संशय आला. तोतया श्रीरंग कुलकर्णी याने आपली फसवणुक केली आहे, असे लक्षात आल्याने रक्कम देण्याचे टाळले व आरोपीच्या विरोधात तक्रार दाखल केली. राहुरी पोलिसांनी चौकशी केली असता लक्षात आले की, श्रीरंग कुलकर्णी हा कोणी व्यक्ती मंत्रालयात नसून तो व्यक्ती म्हणजे दत्तात्रय आरुण क्षिरसागर रा. दत्तनगर, मालेगाव बस स्टॅप नाशिक हा आहे. पोलिसांनी त्यास बेड्या ठोकल्या आहेत.

ही सर्व घटना लक्षात आल्यानंतर संबंधित ऑर्डर बनविणे, बनावट ओळखपत्र बनविणे, यासाठी शिक्के आणि अन्य कागदपत्रे आवश्यक असतात. ते कोठे तयार केले ? याबाबत आरोपी याने खुलासा केला आहे. त्यानंतर त्यात आकाश विष्णु शिंदे रा. संगमनेर याचे नाव पुढे आले आहे. म्हणून पोलिसांनी पुढे तपास सुरू केला. त्यात ओमकार नंदकुमार तरटे रा. उपासनी गल्ली ता. संगमनेर या तरुणाच्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकला. तो रबरी शिक्के तयार करण्याचे काम करतो. पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. त्यानंतर त्याच्याकडून मोठी माहिती उघड झाली आहे.

आरोपींनी भारताच्या राजमुद्रा बनावट करुन त्याचा गौरवापर केला सैराट चित्रपटात ज्याने आर्चीचा भाऊ म्हणजे प्रिंन्स म्हणून काम केले. तो प्रिन्स देखील संगमनेरात आला होता. त्याने बनावट शिक्के तयार करणाऱ्याला भेटून आम्हांला कामासाठी हे शिक्के लागतात, असे सांगून नागराज मंजुळे यांचेशी बोलणे करून दिल्याचे आरोपीनी सांगितले आहे. आरोपींनी भारताच्या राजमुद्रा बनावट करुन त्याचा गौरवापर केला आहे. म्हणजे हा एक प्रकारे देशद्रोहासारखा गुन्हा मानला जातो. त्यामुळे राहुरी पोलीस लवकरच सैराटचा प्रिन्स सेलिब्रेटी सुरज पवार याच्या देखील मुसक्या आवळून गजाआड करणार आहेत. पुढील तपास पोलिस प्रताप दराडे, उपनिरीक्षक सज्जन नऱ्हेडा, शिपाई गणेश लिंपणे, शशी वाघमारे करत आहेत.

Last Updated : Sep 16, 2022, 3:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.