ETV Bharat / state

...तर अहमदनगर जिल्हा न्यायालयाच्या आवारात धरणे आंदोलन - विखे-पाटील

संस्थानच्या रुग्णालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेगळा पगार दिला जातो. तर कायम कर्मचाऱ्यांना वेगळा पगार, मात्र काम सारखेच आहे. याच बरोबरीने ग्रॅच्युटी, पदोउन्नती असे  30 प्रश्न संस्थान मधील कर्मचारी यांचे आहे. सध्या साई संस्थानवर उच्च न्यायालयाने नियुक्त केलेली समीती लक्ष देत नाही. या समीतीचे अध्यक्ष हे जिल्हा न्यायाधीश आहेत. मात्र, संस्‍थानच्‍या अंतर्गत कामांचे निर्णय करण्‍यासाठी नेमलेली समिती न्‍याय देण्‍याऐवजी अन्‍यायच करत असल्याची भावना तयार होवू लागली आहे.

radhakrushna vikhe patil on shirdri sai sansthan employee various problem
विखे-पाटील
author img

By

Published : Sep 6, 2020, 5:41 PM IST

Updated : Sep 6, 2020, 7:03 PM IST

शिर्डी (अहमदनगर) - उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिर्डी साईबाबा संस्थानचे कामकाज पाहण्यासाठी तदर्थ समिती नेमन्यात आली. परंतु शिर्डी ग्रामस्थ आणि संस्थानमधील कर्मचारी यांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी या समितीला वेळ मिळत नसेल, तर अहमदनगर जिल्हा न्यायालयाच्या आवारात धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिला.

शिर्डीच्या साईबाबा संस्थानमधील कायम आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांची चाळीस टक्के पगार कपात करण्यात आली आहे. याच बरोबरीने संस्थानच्या रुग्णालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेगळा पगार दिला जातो. तर कायम कर्मचाऱ्यांना वेगळा पगार, मात्र काम सारखेच आहे. याच बरोबरीने ग्रॅच्युटी, पदोउन्नती असे 30 प्रश्न संस्थान मधील कर्मचारी यांचे आहे. सध्या साई संस्थानवर उच्च न्यायालयाने नियुक्त केलेली समीती लक्ष देत नाही. या समीतीचे अध्यक्ष हे जिल्हा न्यायाधीश आहेत. मात्र, संस्‍थानच्‍या अंतर्गत कामांचे निर्णय करण्‍यासाठी नेमलेली समिती न्‍याय देण्‍याऐवजी अन्‍यायच करत असल्याची भावना तयार होवू लागली आहे. शिर्डीचे प्रश्‍न समजून घेण्‍यासाठी लोकप्रतिनिधी म्‍हणून समिती वेळ देणार नसेल तर आम्‍हाला जिल्‍हा न्‍यायालयाच्‍या दारात येवूनच प्रश्‍न मांडावे लागतील.आमची सहनशिलता संपल्‍याने आंदोलना शिवाय आम्‍हाला पर्याय राहिलेला नसल्याचे आज शिर्डीचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. आज विखे पाटील यांची आणि ग्रामस्थ तसेच कामगार यांच्यात झालेल्या बैठकी नंतर विखे पाटलांनी स्पष्ट केले. शिर्डीच्या प्रश्ना संदर्भात तदर्थ समितीच्‍या विरोधातील आंदोलनाची उद्या पासुनच सुरुवात शिर्डी ग्रामस्‍थ आणि संस्‍थान कर्मचारी करणार आहेत.

साईबाबा संस्‍थानमधील कर्मचाऱ्यांच्‍या प्रश्‍नांसंदर्भात तसेच शिर्डी शहरातील विविध विकास कामांच्‍या निर्णयांसाठी मागील अनेक दिवसांपासून राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍यासह नगरपंचायतीचे पदाधिकारी, कर्मचारी त्रिसदस्‍यीय समितीच्‍या अध्‍यक्षांकडे वेळ मागत आहेत. मात्र, समितीकडून या संदर्भात कोणताही प्रतिसाद मिळत नाही, समितीने संस्‍थानमधील तसेच साईबाबा रुग्‍णालयातील कर्मचाऱ्यांच्‍या वेतनाबाबतही अन्‍यायकारक निर्णय घेतल्‍याने या विरोधात शिर्डी ग्रामस्‍थांसह कामगारांनी एकजुट केली आहे. कामगारांच्या प्रश्‍नांसाठी तीनही कर्मचारी संघटनांनी एकत्रित येवून कृती समितीची स्‍थापना केली असून आपल्या प्रश्नासाठी संस्‍थानमधील कर्मचारी सोमवारी काळ्या फिती लावून काम करतील आणि मुख्‍य कार्यकारी अधिकाऱ्यांना आपल्‍या मागण्‍यांचे निवेदन देतील. गुरुवारी ग्रामस्‍थांच्‍या उपस्थितीत घंटानांद आंदोलन करुन, महाआरती करण्‍यात येणार असून, रविवार दिनांक 13 सप्‍टेंबरला शिर्डी ग्रामस्‍थांकडून मुकमोर्चा काढण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला. या आंदोलनानंतरही तदर्थ समितीला जाग आली नाही, तर लाक्षणिक उपोषणासह नगर येथे मोर्चाचे आंदोलन करणार असल्‍याचा इशारा विखे पाटील यांनी यावेळी दिलाय.

Last Updated : Sep 6, 2020, 7:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.