ETV Bharat / state

Vikhe Patil on Farmers : संकटाच्‍या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्‍याची शासनाची भूमिका - मंत्री विखे पाटील - मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची शेतकऱ्यांना भेट

अवकाळी पावसाने नुकसान झालेल्‍या शेती पिकांचे पंचनामे करण्‍याचे आदेश यंत्रणेला देण्‍यात आले आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असला तरी, पंचनाम्‍याचे काम थांबणार नाही. या संकटाच्‍या काळात शेतकऱ्यांच्‍या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्‍याची भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. पूर्वीप्रमाणेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्‍याची भूमिका सरकारची राहील. अशी ग्‍वाही महसूल, पशुसंवर्धन व दूग्‍ध व्‍यवसाय विकास मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांना दिली.

Etv BharatVikhe Patil Visited Farmers In Ahmednagar:
मंत्री विखे पाटील
author img

By

Published : Mar 19, 2023, 3:22 PM IST

अहमदनगर: राहात तालुक्यातील जिल्‍ह्यात अतिवृष्‍टी आणि गारपीटीने झालेल्‍या राजुरी, ममदारपूर या गावांमध्‍ये जाऊन शेती पिकांच्‍या नुकसानीची पाहणी मंत्री विखे पाटील यांनी आधिकाऱ्यां समवेत केली. तसेच जिल्‍ह्यात झालेल्‍या नुकसानीचा आढावा त्‍यांनी बैठकीच्‍या माध्‍यमातून आधिकाऱ्यांकडून जाणून घेतला. जिल्‍ह्यात मागील दोन दिवसात झालेल्‍या गारपीठ आणि पावसाने अंदाजे २ हजार हेक्‍टर क्षेत्रावरील शेती पिकांचे नुकसान झाले असल्‍याची प्राथमिक माहिती मंत्री विखे पाटील यांनी माध्‍यमांशी बोलताना दिली. शेतकऱ्यांनी घेतलेल्‍या शेती पिकांच्‍या कर्जाबाबतही मुख्‍यमंत्री आणि उपमुख्‍यमंत्र्यांशी बोलून लवकरच निर्णय घेऊ असेही ते म्हणाले.

Vikhe Patil Visited Farmers In Ahmednagar
गारपीटीने नुकसान झालेल्या द्राक्षांचे अवलोकन करताना मंत्री विखे पाटील

या अधिकाऱ्यांची उपस्थिती: याप्रसंगी जिल्‍हा अधिक्षक कृषी आधिकारी शिवाजी जगताप, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, उपविभागीय कृषि आधिकारी सुधाकर बोराळे, तहसीलदार कुंदन हिरे, भाजपाचे तालुका अध्‍यक्ष दीपक पठारे, गिरीधर आसणे, मारुतीराव गोरे, सतीश ससाणे, डॉ. सोमनाथ गोरे, प्रकाश गोरे, सुधाकर गोरे, सरपंच संगिता पठारे, सुरेश कसाब, राहुल गोरे, विशाल गोरे, शिवाजी गोरे, दिलीप यादव, विजय इनामके, विजय जवरे आदि अधिकारी यावेळी उपस्थित होते.

मंत्री विखे पाटील द्राक्षांच्या मळ्याची पाहणी करताना

नुकसानग्रस्तांना मदत करण्याच्या सूचना: बहुतेक गावांमध्‍ये द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवघ्‍या दोन ते तीन दिवसात जो माल काढून बाजारात विक्रीसाठी पाठवायचा होता तो मालच आता गारपीटीने मातीमोल झाल्‍याने हवालदिल झालेल्‍या द्राक्ष उत्‍पादकांसह कांदा, गहू, हरबरा, मका या पिकांनासुध्‍दा गारपीटीचा मोठा फटका बसला असल्‍याचे विखे पाटील यांनी सांगितले. श्रीरामपूर तालुक्‍यातील भोकर येथील राजू नामदेव मोरे यांचा वीज पडून मृत्‍यू झाला. त्‍यांच्‍या कुटूंबीयांना तातडीची मदत म्‍हणून ४ लाख रुपये देण्‍याच्‍या सूचना आधिकाऱ्यांना देण्‍यात आल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

शेतकऱ्यांशी चर्चा करताना मंत्री विखे पाटील

शेतकऱ्यांना आता १ रुपयात विमा: यापूर्वी राज्‍यात अतिवृष्‍टीमुळे नुकसान झालेल्‍या शेतकऱ्यांना निकष बदलून मदत देण्‍यात आली होती. त्‍याच पध्‍दतीने आता पुन्‍हा शेतकऱ्यांना मदतीची शासनाची तयारी असल्‍याचे विखे पाटील यांनी सांगितले. पीकविम्‍याच्‍या बाबतीत यापूर्वी कंपन्‍यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक झाली. ही परिस्थिती बदलविण्‍यासाठीच उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्‍या अर्थसंकल्‍पात शेतकऱ्यांना आता १ रुपयात विमा देण्‍याची भूमिका घेण्यात आली. शेतकऱ्यांना याची कोणतीही आर्थिक झळ बसणार नाही. यासाठी सरकारने सर्व आर्थिक तरतुद केल्‍याचेही विखे पाटील यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना मदतीचा निर्णय: अतिवृष्‍टी आणि गारपीटीमुळे नुकसान झालेली सर्व माहिती समोर आल्‍यानंतरच मदतीचा निर्णय शासन स्‍तरावर घेतला जाईल. परंतु अधिवेशना दरम्‍यान सभागृहातही मुख्‍यमंत्री आणि उपमुख्‍यमंत्र्यांनी मदतीची ग्‍वाही दिलेली आहेच. नुकसानीचे निकष पाहून मदतीबाबत निर्णय होतीलच. परंतु यापेक्षाही शेतकऱ्यांना आता १ रुपयात विमा, शेती पिकासाठी जिल्‍हा सहकारी बॅंक तसेच राष्‍ट्रीयकृत बॅंकांकडून घेतलेल्‍या कर्जाचे मोठे प्रश्‍न आता निर्माण होणार आहेत. याबाबतही शेतकऱ्यांना दिलासा देणारी भूमिका सरकारला घ्‍यावी लागेल यासाठी आपण मुख्‍यमंत्री आणि उपमुख्‍यमंत्र्यांना विनंती करणार असल्‍याचे मंत्री विखे पाटील म्‍हणाले.

जुन्या पेन्शन योजनेविषयी विखे पाटील म्हणाले... सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्‍या संपाबाबत प्रतिक्रिया व्‍यक्‍त करताना मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, जुन्‍या पेन्‍शन योजनेबाबत सरकारने आता तीन वरिष्‍ठ आधिकाऱ्यांची समिती नेमून यामध्‍ये मार्ग काढण्‍याचा निर्णय घेतला आहे. परंतु, सरकार त्‍यांच्‍या मागण्‍यांबाबत सकारात्‍मक आहे. याबाबतचे आश्‍वासन विधानसभेच्‍या अधिवेशनातही देण्‍यात आले आहे. कर्मचारी संघटनांनीसुध्‍दा याबाबत विचार करुन, सरकारला आता सहकार्य करण्‍याची आवश्‍यकता आहे.

हेही वाचा: Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगरमध्ये नामांतराच्या समर्थनार्थ सकल हिंदू समाजाचा मोर्चा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.