ETV Bharat / state

कांद्यासाठी धावून येणारे मागील सहा महिने कुठे होते? राधाकृष्ण विखे पाटील यांचा प्रश्न

केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतला. त्यानंतर महाविकास आघाडीसरकारमधील सर्व नेत्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा नेत्यांनीही महाविकास आघाडीतील नेत्यांवर जोरदार टीका केली आहे.

Radhakrishna Vikhe Patil
राधाकृष्ण विखे पाटील
author img

By

Published : Sep 18, 2020, 5:12 PM IST

अहमदनगर - कांदा निर्यातबंदी उठवावी ही सर्वांचीच मागणी असून याबाबत केंद सरकार लवकरच निर्णय घेईल, अशी अपेक्षा आहे. मात्र, कांद्याच्या प्रश्नावरून केंद्र सरकारला लक्ष करण्याऱ्या महाविकास आघाडी सरकारने मागील सहा महिन्यात शेतकऱ्यांना कोणती मदत केली? असा प्रश्न भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला. ते राहत्याचे ग्रामदैवत असलेल्या वीरभद्र महाराजांच्या मंदिरात झालेल्या चोरीची पाहणी करण्यासाठी आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली

कांदा निर्यातबंदीचा निर्णय मागे घ्यावा, यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून महाराष्ट्र भाजपाचा केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी देखील वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांची भेट घेऊन निर्यातबंदी उठवावी, अशी मागणी केली आहे. मात्र, कांदा निर्यातबंदीचा निर्णय केंद्र सरकार मागे घेईपर्यंत राज्यातील महाविकास आघाडी सरकार आपले दायित्व का निभावत नाही, असा सवाल करून, केवळ केंद्र सरकारकडे बोट दाखवून राज्य सरकार बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप विखे पाटील यांनी केला.

कोरोनामुळे गेल्या सहा महिन्यांपासून राज्यातील शेतकरी अर्थिक संकटात सापडला आहे. बाजार समिती बंद राहिल्याने शेतीमालाला बाजारपेठ मिळाली नाही. शेतकऱ्यांनी कवडीमोल भावाने आपला माल विकला, तेव्हा महाविकास आघाडीमधील मंत्री आणि नेते झोपले होते का? ऐन पेरणीच्या काळात शेतकऱ्यांना खताच्या टंचाईचा सामना करावा लागला. सोयबीन बियाणांमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक झाली, तेव्हा आजचे आंदोलन करणारे कुठे होते? असे प्रश्न विखेंनी उपस्थित केले.

राहत्याचे ग्रामदैवत वीरभद्र महाराजांच्या मंदिरात झालेल्या चोरीचा विखेंनी तीव्र शब्दांत निषेध केला. मंदिरे सुरू झाली असती तर, मंदिरांच्या व्यवस्थापनाचा कारभार सुरळीत सुरू झाला असता. भाविकांची वर्दळ वाढली असती. पण, मंदिरांबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नसल्यानेच मंदिरातील शांतता आता चोरांच्या फायद्याची ठरत आहे. मंदिरांबाबत निर्णय घेण्यात उदासीन असलेले महाविकास आघाडी सरकार भाविकांच्या भावनेशी खेळत असल्याचा आरोप विखे यांनी केला. जनतेच्या हिताचे कोणतेही निर्णय न घेणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा वेळ फक्त अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी खर्च होत असल्याचा टोलाही विखेंनी लगावला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.