ETV Bharat / state

मुख्यमंत्र्यांचा रिमोट दुसऱ्याच्या हातात; आमदार राधाकृष्ण विखे पाटलांची टीका

दुधाचे दर वाढू नये ही मंत्र्याचीच भूमिका आहे. आपल्या दूधसंघातून मलिदा खाण्याचे काम सरकारमधील मंत्री करत असल्याचा आरोप राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला. मुख्यमंत्र्यांचा रिमोट दुसऱ्याच्या हातात गेल्याने त्यांना दबावाखाली काम करावे लागत आहे. राज्यातील दूध उत्पादक शेतकरी आणि जनतेची सरकारने फसवणूक केली आहे, अशी टीका भाजपा आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

Radhakrishna Vikhe Patil
राधाकृष्ण विखे पाटील
author img

By

Published : Jul 25, 2020, 6:11 PM IST

अहमदनगर - आघाडी सरकारने राज्यातील शेतकरी आणि जनतेची फसवणूक केली असून हे फेकू सरकार आहे. मुख्यमंत्र्यांचा रिमोट दुसऱ्याच्या हातात गेला आहे. त्यामुळे त्यांना स्वतः काही निर्णय घेता येत नाही, अशी टीका भाजपा आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. विखे पाटील यांनी आज प्रबोधनकार इंदुरीकर महाराज देशमुख यांची ओझर येथे निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांची महाविकासआघाडी सरकारवर टीका

दुधाचे दर वाढू नये ही मंत्र्याचीच भूमिका आहे. आपल्या दूधसंघातून मलिदा खाण्याचे काम सरकारमधील मंत्री करत असल्याचा आरोप राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा रिमोट दुसऱ्याच्या हातात गेल्याने त्यांना दबावाखाली काम करावे लागत आहे. राज्यातील दूध उत्पादक शेतकरी आणि जनतेची सरकारने फसवणूक केली आहे, असे विखे-पाटील म्हणाले.

राज्यातील कोरोनाची परीस्थिती हाताळण्यात सरकार अपयशी ठरले आहे. आपले अपयश झाकण्यासाठी महाविकासआघाडी सरकार केंद्र सरकारवर टीका करत आहे. कोरोना रुग्णसंख्येत महाराष्ट्र एक नंबरला आहे, ही दुर्दैवाची गोष्ट आहे, असेही विखे म्हणाले.

दरम्यान, इंदुरीकरांचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने त्यावर भाष्य करणे योग्य नाही. कायद्याला कायद्याचे काम करू द्यावे. इंदुरीकर महाराजांनी प्रबोधनातून समाजजागृतीचे काम केले. त्यांच्या कामाला समाजातून मोठे पाठबळ मिळत आहे. माझेही त्यांना त्यांच्या कार्यासाठी पाठबळ आहे हे त्यांना सांगण्यासाठी आलो असल्याचे विखे यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.