ETV Bharat / state

Radhakrishna Vikhe Patil On CM : संवेदशील विषयाबाबत मुख्‍यमंत्री चुप्‍पी साधून - विखे पाटील

धार्मिक स्‍थळांवरील भोग्‍यांचा विषय हा एका शहरापुरता मर्यादीत नाही. तरीही या संवेदशील विषयाबाबत मुख्‍यमंत्री चुप्‍पी साधून आहेत. त्‍यांचे प्रवक्‍ते वातावरण आणखी चिघळ‍विण्‍याचा प्रयत्‍न करीत आहेत. त्‍यांचे प्रवक्‍ते जे बोलतात ती मुख्‍यमंत्र्यांची भूमिका आहे का ? असा सवाल भाजपा नेते राधाकृष्‍ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil On CM Uddhav Thackeray ) यांनी केला आहे. ते लोणी येथे माध्‍यमांशी बोलत होते.

vikhe patil
vikhe patil
author img

By

Published : May 5, 2022, 5:41 PM IST

अहमदनगर - धार्मिक स्‍थळांवरील भोग्‍यांचा विषय हा एका शहरापुरता मर्यादीत नाही. तरीही या संवेदशील विषयाबाबत मुख्‍यमंत्री चुप्‍पी साधून आहेत. त्‍यांचे प्रवक्‍ते वातावरण आणखी चिघळ‍विण्‍याचा प्रयत्‍न करीत आहेत. त्‍यांचे प्रवक्‍ते जे बोलतात ती मुख्‍यमंत्र्यांची भूमिका आहे का ? असा सवाल भाजपा नेते राधाकृष्‍ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil On CM Uddhav Thackeray ) यांनी केला आहे. ते लोणी येथे माध्‍यमांशी बोलत होते.

काकड आरतीच्या मागणीचे स्वागत - विखे पाटील म्‍हणाले की, या सर्व विषयाबाबत भारतीय जनता पक्षाची भूमिका वेळोवेळी प्रदेशाध्‍यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil ) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी स्‍पष्‍ट केली आहे. परंतू मुख्‍यमंत्री या संदर्भात कोणतीही भूमिका स्‍पष्‍ट करायला तयार नाहीत. राज्‍य सरकारनेच धोरणात्‍मक निर्णय घेण्‍याची मागणी त्‍यांनी केली. शिर्डीतील मुस्लिम धर्मियांनी काकड आरती संदर्भात केलेल्‍या मागणीचे विखे पाटील यांनी स्‍वागत केले.

विखे पाटील

शिवसेना प्रमुखांचा विचारापासून फारकत - भोंग्‍याचा विषय हा एका शहरापुरता मर्यादीत नाही. परंतू राज्‍य सरकार याबाबत खरच गंभीर आहे का? असा प्रश्‍न उपस्थित करुन मुख्‍यमंत्र्यांनी या संवेदनशील विषयावर बोलले पाहिजे. परंतू ते बोलत नाहीत त्‍याचे प्रवक्‍तेच वातावरण अधिक चिघळविण्‍याचा प्रयत्‍न करतात, असा थेट आरोप करुन प्रवक्‍ते जे बोलत आहेत. ती मुख्‍यमंत्र्यांची भूमिका आहे का? हे तरी एकदा सरकारने सांगितले पाहिजे. अशी अपेक्षा व्‍यक्‍त करुन, शिवसेना प्रमुखांचा वेळोवेळी आधार घेणारेच आता त्‍यांच्‍या विचारापासून फारकत घेत आहेत, हाच आता शिवसेनेचा अजेंडा झाला असल्‍याचा टोला त्‍यांनी लगावला.

ओबीसी आरक्षणाची जबाबदारी राज्‍य सरकारची - मराठा आरक्षणाप्रमाणेच ओबीसी आरक्षणही आघाडी सरकारने घालविले. सरकारने कोणताही डेटा गोळा केला नाही, मगासवर्ग आयोगाची स्‍थापना केली नाही, आरक्षणाच्‍या संदर्भात सरकार कधीच गंभीर नव्‍हते. त्‍यामुळेच मराठा समाजाप्रमाणेच ओबीसी आरक्षण घालविण्‍याचे पाप आघाडी सरकारने केले असून, याची जबाबदारी राज्‍य सरकारला घ्‍यावीच लागेल अशी प्रतिक्रिया विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केली.

हेही वाचा - Ajit Pawar On Raosaheb Danve : रावसाहेब दानवेंच्या विधानाला अजित पवारांनी दिले प्रत्युत्तर, म्हणाले... तृतीयपंथी पण...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.