ETV Bharat / state

राज्‍यात काँग्रेस सरकार आल्‍यास शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी - राधाकृष्ण विखे पाटील - loan

राज्‍यामध्‍ये काँग्रेस सरकार सत्तेत आल्‍यास शेतकऱयांना सरसकट कर्जमाफी करण्यात येईल, अशी ग्वाही विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी राहता तालुक्यातील अश्विवी दाढ बु. येथे दिली.

राधाकृष्ण विखे पाटील
author img

By

Published : Feb 13, 2019, 2:07 PM IST

मुंबई - राज्‍यामध्‍ये काँग्रेस सरकार सत्तेत आल्‍यास शेतकऱयांना सरसकट कर्जमाफी करण्यात येईल, अशी ग्वाही विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी राहता तालुक्यातील अश्विवी दाढ बु. येथे दिली. या गावात सुमारे १ कोटी ९३ लाख रुपयांच्‍या विविध विकास कामांचा शुभारंभ आणि तलाठी कार्यालयाचे उद्धाटन विखे पाटील यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले.

'शासन आपल्‍या दारी' या उपक्रमातून मंजूर झालेल्‍या रेशनकार्डचे वितरणही या कार्यक्रमात करण्‍यात आले. यावेळी तालुक्‍यात १२ हजार रेशनकार्डाचे वाटप करणारा राहता तालुका हा जिल्‍ह्यातील पहिला तालुका असून ग्रामपंचायतीच्‍या माध्‍यमातूनही ७० लाख रुपयांची कामे एका वर्षात पूर्ण केले असल्‍याचे विखे पाटलांनी नमूद केले.

यावेळी बोलताना विखे पाटील म्हणाले, की सध्याच्या सरकारकडून केवळ आश्‍वासने मिळाली. सत्‍तेवर येताच सातबारा कोरा करु म्‍हणणारे सत्‍तेवर येताच बदलले. काँग्रेस पक्षाने राज्‍यात जनसंघर्ष यात्रा काढल्याने दबावामुळे सरकारला कर्जमाफीचा निर्णय घ्‍यावा लागला. मात्र, कर्जमाफी योजनेचा कोणालाही लाभ झाला नाही. राज्‍यात काँग्रेस सरकार आल्‍यास शेतकिऱयांना सरसकट कर्जमाफी देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
मोदी सरकारवर टीका करताना विखे पाटील म्हणाले, की या सरकारच्‍या धोरणांमुळे बेरोजगारी वाढली आहे. याविरोधात संघटीतपणे आता सामना करावा लागेल. या सरकारच्‍या कोणत्‍याही धोरणांचा लाभ सामान्‍य माणसाला झालेला नाही. या सरकारच्‍या विरोधात आता लोकशाही मार्गानेच आपल्‍याला न्‍याय मिळवावा लागेल, असे त्‍यांनी सुचित केले.

undefined

माजी सभापती सुभाष गाडेकर यांच्‍या अध्‍यक्षतेखाली झालेल्‍या या कार्यक्रमास कारखान्‍याचे व्‍हा. चेअरमन कैलासराव तांबे, संचालक प्रतापराव तांबे, मुळा प्रवराचे संचालक देवीचंद तांबे, संचालक अशोकराव गाडेकर, माजी सभापती मच्छिंद्र थेटे, जि.प सदस्‍य दिनेश बर्डे, पंचायत समिती सदस्‍या नंदाताई तांबे, सरपंच पुनम तांबे, माजी जि. प. सदस्‍य श्रावणराव वाघमारे, गोरक्षनाथ तांबे, प्रल्‍हाद बनसोडे, विजय तांबे यांच्‍यासह विविध संस्‍थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Intro:Shirdi_Ravindra Mahale

राज्‍यामध्‍ये कॉंग्रेस सरकार आल्‍यास शेतक-यांना सरसकट कर्जमाफी करण्‍याची हमी आम्‍ही घेवु ना.राधाकृष्ण विखे पाटील....

राज्‍यामध्‍ये कॉंग्रेस सरकार आल्‍यास शेतक-यांना सरसकट कर्जमाफी करण्‍याची हमी आम्‍ही घेवु अशी ग्‍वाही विधानसभेतील विरोधी पक्षनेते ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी राहाता तालुक्यातील अश्विवी दाढ बु दिली आहे....

दाढ बु या गावात सुमारे १ कोटी ९३ लाख रुपयांच्‍या विविध विकास कामांचा शुभारंभ आणि तलाठी कार्यालयाचे उद्घाटन विरोधी पक्षनेते ना. विखे पाटील यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. शासन आपल्‍या दारी या उपक्रमातुन मंजुर झालेल्‍या रेशनकार्डचे वितरणही या कार्यक्रमात करण्‍यात आले....

माजी सभापती सुभाष गाडेकर यांच्‍या अध्‍यक्षतेखाली झालेल्‍या या कार्यक्रमास कारखान्‍याचे व्‍हा.चेअरमन कैलासराव तांबे, संचालक प्रतापराव तांबे, मुळा प्रवराचे संचालक देवीचंद तांबे, संचालक अशोकराव गाडेकर, माजी सभापती मच्छिंद्र थेटे, जि.प सदस्‍य दिनेश बर्डे, पंचायत समिती सदस्‍या नंदाताई तांबे, सरपंच पुनम तांबे, माजी जि.प.सदस्‍य श्रावणराव वाघमारे, गोरक्षनाथ तांबे, प्रल्‍हाद बनसोडे, विजय तांबे यांच्‍यासह विविध संस्‍थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते....

आपल्‍या भाषणात ना.विखे पाटील म्‍हणाले की, शिर्डी विधानसभा मतदार संघाने लोककल्‍याणकारी योजनांच्‍या अंमलबजावणीत मोठी आघाडी घेतली आहे. तालुक्‍यात १२ हजार रेशनकार्डाचे वाटप करणारा राहाता तालुका हा जिल्‍ह्यातील पहिला तालुका असुन, ग्रामपंचायतीच्‍या माध्‍यमातुनही ७० लाख रुपयांची कामे एका वर्षात पुर्ण केले असल्‍याचे नमुद करुन ना.विखे पाटील म्‍हणाले की, सत्‍ता कोणाचीही असो विकास कामांमध्‍ये आपण कुठेही कमी पडत नाही. सद्याच्‍या सरकारकडुन केवळ आश्‍वासने मिळाली. २०१४ साली त्‍यांच्‍या भुलथापांना मतदार बळी पडले. सत्‍तेवर येताच आम्‍ही सातबारा कोरा करु म्‍हणणारे सत्‍तेवर येताच बदलले. कॉंग्रेस पक्षाने राज्‍यात जनसंघर्ष यात्रा काढली. याचा दबाव राज्‍य सरकारवर आल्‍यामुळेच सरकारला कर्जमाफीचा निर्णय घ्‍यावा लागला. पण ही कर्जमाफी जाचक नियम आणि अटींमध्‍ये अडकविली. यांच्‍या कर्जमाफी योजनेचा कोणालाही लाभ झाला नाही त्‍यामुळे या सरकारला खाली खेचल्‍याशिवाय पर्याय नाही. तीन राज्‍यात नुकत्‍याच झालेल्‍या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा दारुन पराभव झाला. देशात आणि राज्‍यातही फारशी वेगळी परिस्थिती नाही. राजकीय वातावरण बदलत असल्‍याकडे त्‍यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.....

मोदी सरकार देशात २ कोटी युवकांना नोक-या देणार होते. मात्र यांच्‍या नोटाबंदीच्‍या निर्णयामुळे अनेकांना आपला रोजगार गमवावा लागला. वाढत्‍या बेरोजगारीचा ४५ वर्षातील उच्‍चांक या निमित्‍ताने समोर आला. वाढत्‍या बेरोजगारीमुळे युवकांमध्‍ये नैराश्‍य आलेले आहे. त्‍यामुळेच या सरकारच्‍या विरोधात संघटीतपणे आता मुकाबला करावा लागेल. या सरकारच्‍या कोणत्‍याही धोरणांचा लाभ सामान्‍य माणसाला झालेला नाही. या सरकारच्‍या विरोधात आता लोकशाही मार्गानेच आपल्‍याला न्‍याय मिळवावा लागेल असे त्‍यांनी सुचित केले. याप्रसंगी दाढ आणि पंचक्रोशितील नागरीक, युवक कार्यकर्ते मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.....Body:12 Feb Shirdi Radhkrushan Vikhe PatilConclusion:12 Feb Shirdi Radhkrushan Vikhe Patil
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.