ETV Bharat / state

Shirdi Airlines : शिर्डीमधून पुणे-नागपूर विमानसेवा 18 फेब्रुवारीपासून होणार सुरु; विमानतळ संचालकांची माहिती - विमानसेवा शिर्डी सुरु होणार

18 फेब्रुवारीपासून पुणे-शिर्डी-नागपूर विमानसेवा सुरु होणार आहे. नागपूर व पुणे विमानसेवा सुरु करण्यासंदर्भात अनेक दिवसांपासून प्रवाशांची मागणी होती.

शिर्डी विमानतळ
शिर्डी विमानतळ
author img

By

Published : Feb 14, 2022, 10:53 AM IST

शिर्डी - विमानतळावरुन पुणे-शिर्डी-नागपूर अशी विमानसेवा 18 फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. नागपूर व पुणे विमानसेवा सुरु करण्यासंदर्भात अनेक दिवसांपासून प्रवाशांची मागणी होती. कोरोनामुळे मध्यंतरी अठरा महिने या विमानतळावरुन विमानसेवा बंद होती. आता विमानसेवा सुरुळीत होत आहे, अशी माहिती शिर्डी विमानतळाचे संचालक सुशिलकुमार श्रीवास्तव यांनी दिली आहे.

सध्या चार ठिकाणांसाठी विमानसेवा सुरू आहे. यामध्ये बंगळुरुसाठी 2, दिल्ली 1, हैदराबाद 1, चेन्नई 1 अशा पाच विमानफेर्‍या आहेत. आता पुणे-शिर्डी-नागपूर अशी विमानसेवा सुरु होणार आहे. पुणे येथून येणारे विमान शिर्डी येथे येईल व तेच विमान नागपूरला जाणार आहे. त्याच दिवशी हे विमान नागपूरवरुन शिर्डीला येईल व तेथून पुणे येथे जाणार आहे. ही विमानसेवा आठवड्यातील सातही दिवस सुरु ठेवण्याचा विमान कंपनीचा मानस आहे. यासाठी प्रवासी किती मिळतात, यावरच ही सेवा यामार्गे किती दिवस सुरू ठेवायची याचा पुढील निर्णय होणार आहे. या निर्णयामुळे साईभक्तांनामधून समाधान व्यक्त होत आहे.

हेही वाचा - ISRO ने पुन्हा रचला इतिहास; PSLV-C52/EOS-04चे प्रक्षेपण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.