ETV Bharat / state

#CAA Protest : अहमदनगरमध्ये धरणे आंदोलन, तहसिल कार्यालयावर काढला मोर्चा

author img

By

Published : Dec 21, 2019, 4:16 PM IST

नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे देशात दुफळी निर्माण होऊन देशाच्या समता बंधुता, न्यायाला बाधा निर्माण होणार आहे. त्यामुळेच देशाची एकता व अखंडता टिकविण्यासाठी या विधेयकाला कडाडून विरोध करणे अत्यंत आवश्यक आहे. मागील ७३ वर्षात कॉलेजचे विद्यार्थी रस्त्यावर आले नव्हते, यावेळची युवा पिढी हुशार आहे. ते या कायद्याच्या विरोधात रस्त्यावर आले आहे. मोदी, शहा हे कोणत्या देशभक्तीबाबत बोलत आहे.

Prorest against CAA in jamkhed ahmednagar
#CAA Protest : अहमदनगरमध्ये धरणे आंदोलन

अहमदनगर - नागरिकत्व सुधारणा कायद्याविरुद्ध संपूर्ण देशात आंदोलने होत आहेत. याचेच पडसाद जिल्ह्यातील जामखेडमध्ये पहायला मिळाले. जामखेड येथे मुस्लीम बांधव, जमियत-ए-ऊलेमा हिंद, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, वंचित बहुजन आघाडी आणि समविचारी संघटनांनी तहसिल कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी धरणे आंदोलनही करण्यत आले. आंदोलक दुपारी तीनच्या सुमारास येथील खर्डा चौकात जमा झाले. यावेळी विविध घोषणाही देण्यात आल्या.

जमियत-ए-ऊलेमाचे जिल्हाध्यक्ष मौलाना इर्शाद अल कासमी यांनी केंद्र सरकारवर या बिलाच्या संदर्भात जोरदार टिका केली. ते म्हणाले, देशातील भाजप सरकार हे लोकशाही व संविधान विरोधी सरकार आहे. या सरकारने आणलेले नागरिकता संशोधन विधेयक (NRC व CAB) हे घटनाबाह्य आहे. तसेच ते संयुक्त राष्ट्र संघ आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या विरोधात आहे.

हेही वाचा - "भारताचे नागरिकत्व सिद्ध करण्यात 'प्रॉब्लेम' काय ?"

सदर कायद्यामुळे देशात दुफळी निर्माण होऊन देशाच्या समता बंधुता, न्यायाला बाधा निर्माण होणार आहे. त्यामुळेच देशाची एकता व अखंडता टिकविण्यासाठी या विधेयकाला कडाडून विरोध करणे अत्यंत आवश्यक आहे. मागील ७३ वर्षात कॉलेजचे विद्यार्थी रस्त्यावर आले नव्हते, यावेळची युवा पिढी हुशार आहे. ते या कायद्याच्या विरोधात रस्त्यावर आले आहे. मोदी, शाह हे कोणत्या देशभक्तीबाबत बोलत आहे. त्यांनी आसामच्या चार जिल्ह्यात ४० लाख लोकांना एनआरसी मध्ये आणण्यासाठी निर्णय घेतला. त्यातील २१ लाख लोकांपैकी १७ लाख हिंदू तर ४ लाख मुस्लिम आहेत. त्यांना मुलभूत सुविधा दिल्या जात नाहीत त्यांच्या मोठ्या प्रमाणावर हालअपेष्टा चालू आहे. तेथील इंटरनेट सुविधा, मोबाईल सेवा बंद आहेत. मीडिया तेथे जाऊ शकत नाही. आता ते आपल्याच नागरिकत्वाबाबत त्यांनी शंका घेत आहेत.

हेही वाचा - कांदे भाववाढीनंतर महागणार फोडणीचाही 'तडका'

आम्ही देश सोडून जाणार नाही आम्ही येथील वतनदार आहे. या गोष्टीवर ध्यान देण्यापेक्षा देशाचा जीडीपी दर बांगलादेश व पाकिस्तान पेक्षा जास्त घसरला आहे. देशातील १३० कोटी जनतेपैकी २२ कोटी जनता अद्याप उपाशी आहेत. दररोज 4 मुलीवर लैंगिक अत्याचार होत आहेत, १२ लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यावर उपाययोजना करण्यापेक्षा इतरत्र लक्ष वेधले जात आहे. तिहेरी तलाक, ३७० कलम लागू केले ते आम्ही स्विकारले याचा फायदा घेऊन ते आता नागरिकत्व कायदा लागू करून केवळ मुस्लीम समाज नव्हे तर इतर सर्व समाजाची देशप्रेमाबाबत शंका घेत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Intro:जमायते ऊलैमे हिंद, कॉग्रेस, राष्ट्रवादीचा
नागरिकत्व सुधारणा कायद्याविरुद्ध तहसीलवर मोर्चा व धरणे आंदोलन केले,Body:जमायते ऊलैमे हिंद, कॉग्रेस, राष्ट्रवादीचा
नागरिकत्व सुधारणा कायद्याविरुद्ध तहसीलवर मोर्चा व धरणे आंदोलन केले,
अहमदनगर जिल्ह्यातील जामखेडमध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात येथील खर्डा चौकातून तालुक्यातील सर्व मुस्लीम बांधव, जमीयते ऊलैमा हिंद जामखेड व समविचारी संघटना, कॉग्रेस, राष्ट्रवादी, वंचीत आघाडीच्या वतीने तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला व धरणे आंदोलन करण्यात आले.
सरकारने आणलेल्या संविधान विरोधी "नागरिकता संशोधन विधेयकाचा ( NRC व CAB चा )" विरोध व निषेध व्यक्त करण्यासाठी दुपारी तीनच्या सुमारास येथील खर्डा चौकात जमा झाले. यावेळी मोर्चाक-यांनी घोषणा देत व हातात निषेधाचे फलक घेऊन मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. यावेळी बोलताना जमायते ऊलैमाचे जिल्हाध्यक्ष मौलाना इर्शाद अल कासमी यांनी केंद्र सरकारवर या बिलाच्या संदर्भात जोरदार टिका केली ते म्हणाले, देशातील भाजप सरकार हे लोकशाही व संविधान विरोधी सरकार आहे. या सरकारने आणलेले नागरिकता संशोधन विधेयक (NRC व CAB) हे घटनाबाह्य आहे. तसेच ते संयुक्त राष्ट्र संघ आणि आंतरराष्ट्रीय मानव अधिकार आयोग यांच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या विरोधात आहे. त्यामुळे आम्ही सर्वजण या कायद्याचा विरोध करीत आहे.
सदर कायद्यामुळे देशात दुफळी निर्माण होवुन देशाच्या समता बंधुता व न्यायाला बाधा निर्माण होणार आहे. त्यामुळेच देशाची एकता व अखंडता टिकविण्यासाठी या विधेयकाला कडाडुन विरोध करणे अत्यंत आवश्यक व गरजेचे आहे. मागील ७३ वर्षात कॉलेजचे विद्यार्थी रस्त्यावर आले नव्हते यावेळची युवा पिढी हुशार आहे. ते या कायद्याच्या विरोधात रस्त्यावर आले आहे. मोदी, शहा हे कोणत्या देशभक्ती बाबत बोलत आहे. त्यांनी आसामच्या चार जिल्ह्यात ४० लाख लोकांना एनआरसी मध्ये आणण्यासाठी निर्णय घेतला त्यातील २१ लाख लोकांपैकी १७ लाख हिंदू तर ४ लाख मुस्लिम आहेत त्यांना मुलभूत सुविधा दिल्या जात नाहीत त्यांच्या मोठ्या प्रमाणावर हालअपेष्टा चालू आहे. तेथील इंटरनेट सुविधा, मोबाईल सेवा बंद आहेत. मिडिया तेथे जाऊ शकत नाही. आता ते आपल्याच नागरिकत्वाबाबत त्यांनी शंका घेत आहे. आम्ही देश सोडून जाणार नाही आम्ही येथील वतनदार आहे. या गोष्टीवर ध्यान देण्यापेक्षा देशाचा जीडीपी दर बांगलादेश व पाकिस्तान पेक्षा जास्त घसरला आहे. देशातील १३० कोटी जनतेपैकी २२ कोटी जनता अद्याप उपाशीपो जीवन जगत आहेत. दररोज चार मुलीवर लैंगिक अत्याचार होत आहेत, १२ लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यावर उपाययोजना करण्यापेक्षा इतरत्र लक्ष वेधले जात आहे. तिहेरी तलाक, ३७० कलम लागू केले ते आम्ही स्विकारले याचा फायदा घेेऊन तेे आता नागरिकत्व कायदाा लागू करून केवळ मुुस्लि समाज नव्हे तर इतर सर्व समाजाची देशप्ररेमबाबत शंका घेत असल्याचाा आरोप मौलाना इर्शाद अल कासमी यांनी केला.
यावेळी मौलाना खलील कासमी, हाजी सय्यद जावेदभाई, हाजी अजरभाई काझी,हाजी ताहेर खान, मुप्ती अपजल, मौलाना फकिरभाई शेख, हाजी सलिमभाई तांबोळी, हाजी हामीदभाई बागवान,
उमरभाई कुरेशी, समीर पठाण, गफ्फार पठाण, सय्यद जमीरभाई, शामीरभाई सय्यद, उमरभाई कुरेशी, इम्रान कुरेशी, नासिर खान, हबीब मास्टर शेख, सामाजिक कार्यकर्ते विकी सदाफुले, हनीफभाई कुरेशी, रा काँ पक्षाचे नेते प्रा मधुकर आबा राळेभात, रा काँ पक्षाचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, रा काँ पक्षाचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, भारीप बहुजन पक्षाचे जिल्हाध्यक्ष अरुण जाधव, कॉग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष शाहजी राजेभोसले, बहुजन समाज पक्षाचे अध्यक्ष बापुसाहेब गायकवाड, अमित जाधव, मोहन पवार, कुंडल राळेभात आदी उपस्थित होते.
Conclusion:जमायते ऊलैमे हिंद, कॉग्रेस, राष्ट्रवादीचा
नागरिकत्व सुधारणा कायद्याविरुद्ध तहसीलवर मोर्चा व धरणे आंदोलन केले,

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.