ETV Bharat / state

Droupadi Murmu Shirdi Visit: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज शिर्डी दौऱ्यावर, दुसऱ्यांदा घेणार साईबाबांच्या समाधीचे दर्शन; पोलिसांचा बंदोबस्तात तैनात - Shirdi visit

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी येत आहेत. यानिमित्ताने शिर्डीला आणि साई मंदिराला छावणीचे स्वरुप आले आहे. राज्यातून जवळपास 1500 पोलिस कर्मचारी याठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. त्याच बरोबर पोलिस उपमहासंचालक, पोलिस महानिरक्षक अशा अधिकाऱ्यांचा मोठा जथ्या याठिकाणी राष्ट्रपती दौऱ्याला सुरक्षा देणार आहे.

Droupadi Murmu Shirdi Visit
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा शिर्डी दौरा
author img

By

Published : Jul 7, 2023, 7:25 AM IST

अहमदनगर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्या आज विशेष विमानाने दुपारी शिर्डी साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल होणार आहे. त्यानंतर त्या थेट शिर्डी साईबाबांच्या दुपारी होणाऱ्या मध्यान्ह आरतीला उपस्थिती राहणार असल्याचे सांगितले जात आहे. साईबाबांच्या आरतीनंतर मुर्मू यांच्या हस्ते साईबाबांची पाद्य पूजा व शिर्डी माझे पंढरपूर ही छोटी आरती करण्यात येणार आहे. साई दर्शनानंतर मुर्मू यांच्या साईबाबा संस्थानच्या वतीने साईबाबांची मूर्ती आणि शॉल देवून सन्मान करण्यात येणार आहे.

साई संस्थानच्या प्रसादालयात भोजन करणार : दरम्यान, साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेवुन मंदिराबाहेर आल्यानंतर, साईबाबांच्या आगमनाची स्मृती जपणार्‍या गुरुस्थान मंदिर व निंब वृक्षाला भेट देऊ दर्शन घेणार आहे. त्यानंतर बाबांचे आयुष्यभर जेथे वास्तव्य घडले, त्या सर्वधर्म समभावाचे प्रतिक असलेल्या द्वारकामाईतही त्या नतमस्तक होणार असल्याचेही सांगण्यात येते. साईबाबांनी वापरलेल्या वस्तू, कपडे, पादत्राणे, रथ, पालखी, साईबाबांच्या ओरीजनल प्रतिमा जतन करून ठेवण्यात आलेल्या साईबाबा वस्तुसंग्रहालयालाही त्या भेट देण्याची व साईबाबांचे जीवनचरित्र समजावून घेण्याचीही शक्यता आहे. यानंतर त्या साई संस्थानच्या प्रसादालयात भोजन करणार आहे.

दुसऱ्यांदा घेणार साईसाईबाबांचे दर्शन : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या झारखंडच्या राज्यपाल असतांना साईबाबांच्या दर्शनासाठी आल्या होत्या, आता राष्ट्रपती झाल्यानंतर पहिल्यांदाचा साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यावेळी मुर्मू तब्बल तीन तास साईबाबांच्या पावन भूमीत थांबणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या उद्या शिर्डी दौऱ्यावर असल्याने राज्यभरातून तब्बल 1500 पोलीस कर्मचारी साई मंदिरासह शिर्डीत पोलिसांचा बंदोबस्तात तैनात करण्यात आला आहे. यात पोलिस उपमहासंचालक, पोलीस निरीक्षक, पोलिस महानिरक्षक अशा अधिकाऱ्यांनासह, श्वानपथक शिर्डीत दाखल झाले आहे.

शिर्डीत आतापर्यंत सहा राष्ट्रपतींची हजेरी : शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी आतापर्यंत सहा राष्ट्रपतींनी हजेरी लावली आहे. या आधी निलम संजीव रेड्डी, शंकरदयाळ शर्मा, प्रतिभाताई पाटील, प्रणव मुखर्जी, रामनाथ कोविंद यांनी देखील शिर्डीत येवुन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले आहे. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी 7 जानेवारी 2009 रोजी या प्रसादालयाचे उद्घाटन केलेले आहे. आज द्रौपदी मुर्मू या शिर्डीत आहेत.

हेही वाचा :

  1. President Draupadi Murmu : संघर्ष करून पुढे जा; समाजबांधवांचा विकास करा - राष्ट्रपतींचा आदिवासी समुहाच्या प्रतिनिधींशी संवाद
  2. Draupadi Murmu : संस्कृती आणि राष्ट्रभक्तीच्या सांस्कृतिक केंद्राचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते लोकार्पण
  3. Draupadi Murmu : संत, समाज सुधारकांची भूमी असलेले महाराष्ट्र खरोखरच महान राज्य - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.