अहमदनगर - राज्यासह संपूर्ण देशात उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असताना अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात रविवारी दुपारी मान्सून पुर्व पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून थोडाफार दिलासा मिळाला आहे.
उन्हाचा पारा 40 डिग्रीपर्यंत पोहचलेला असल्याने या पावसामुळे नागरिकांना मात्र दिलासा मिळाला आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अचानक आलेल्या पावसामध्ये लहान मुलांनी या पहिल्या पावसाचा आनंद लुटला. तसेच वातावरणात गारवादेखील निर्माण झाला आहे.