ETV Bharat / state

OBC Reservation in MH : मराठा आरक्षणाप्रमाणे सरकारकडून ओबीसी आरक्षणाचे वाटोळे - प्रकाश आंबेडकर - OBC reservation in Maharashtra

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले, की राज्यात सोमवारी पारीत केलेला ओबीसी आरक्षणाचा कायदा बेकायदेशीर तसेच संविधानाच्या चौकटीत न बसणारा ( violation for OBC reservation ) आहे. ओबीसी जनतेने राज्यातील या चोरांच्या अपप्रचाराच्या नादी लागू नका. या चोरांना महाराष्ट्रातील तिजोरी लुटायची आहे. प्रशासकीय यंत्रणेमार्फत लुटमार करायची असल्याचा घणाघाती ( Prakash Ambedkar slammed Mahavikas Aghadi ) आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

प्रकाश आंबेडकर
प्रकाश आंबेडकर
author img

By

Published : Mar 8, 2022, 3:22 PM IST

Updated : Mar 8, 2022, 3:40 PM IST

अहमदनगर- राज्यातील चोरांच्या सरकारने गरीब मराठा समाजाच्या आरक्षणाचे ( Prakash Ambedkar on Maratha Reservation ) वाटोळे लावले आहे. त्याच पद्धतीने ओबीसी समाजाचे वाटोळे लावत असल्याची टीका प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar on OBC Reservation ) यांनी केली आहे. राज्यातील सरकार हे श्रीमंत मराठ्यांचे सरकार आहे. त्यामुळे गरीब मराठा आरक्षणाचे वाटोळे या सरकारने केल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली. ते शिर्डीत पत्रकार परिषदेत बोलत होते.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले, की राज्यात सोमवारी पारीत केलेला ओबीसी आरक्षणाचा कायदा बेकायदेशीर तसेच संविधानाच्या चौकटीत न बसणारा ( violation for OBC reservation ) आहे. ओबीसी जनतेने राज्यातील या चोरांच्या अपप्रचाराच्या नादी लागू नका. या चोरांना महाराष्ट्रातील तिजोरी लुटायची आहे. प्रशासकीय यंत्रणेमार्फत लुटमार करायची असल्याचा घणाघाती ( Prakash Ambedkar slammed Mahavikas Aghadi ) आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

चोरांना महाराष्ट्रातील तिजोरी लुटायची आहे

हेही वाचा-Nari Shakti Puraskar : महाराष्ट्रातील फर्स्ट वुमन स्नेक रेस्क्यूअरला राष्ट्रपतींच्या हस्ते नारी शक्ती पुरस्कार प्रदान

घटनेची पायमल्ली करणाऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादी बरोबर काँग्रेस राहणार नाही-
राज्यघटना काँग्रेसच्या कालावधीमध्ये निर्माण झाली. आज दुर्दैवाने हेच काँग्रेस घटनेची पायमल्ली करत आहे. काँग्रेस पक्षाला आपल्या इतिहासाचा आणि वारशाची लज्जा असेल तर घटनेची पायमल्ली करणाऱ्या राष्ट्रवादी आणि शिवसेना बरोबर राहणार नाही, असे यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले आहे. भाजप घटनेची पायमल्ला उडवित आहे. आता शिवसेना आणि राष्ट्रवादीही घटनेची पायमल्ली करत आहे. या सरकारमध्ये काँग्रेस राहिले तर निकष असाच निघतो की काँग्रेसवालेदेखील भाजपच्या भूमिकेशी सहमत असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

हेही वाचा- Aditya Thackeray : केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडी म्हणजे दिल्लीचे महाराष्ट्रावर आक्रमण -आदित्य ठाकरे

सुशांतसिंग आणि दिशा सालीयन प्रकरणातील सगळे पुरावे राणे यांनी जनते समोर आणावे.....
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सुशांतसिंग आणि दिशा सालीयन प्रकारणी गंभीर आरोप केला. नारायण राणे यांच्याकडे सुशांतसिंग आणि दिशा सालीयन प्रकरणी जे काही पुरावे आहेत, ते जनते समोर आणावेत. न्यायालयात सादर करावेत. या पुराव्याचा खेळ करू नये, या खेळाला लोक आता राजकारण म्हणून पाहत आहेत. ज्या लोकांचा जीव गेला त्यांच्या कुटुंबियांच्या भावना लक्षात घेवून राणे यांनी हे सगळे पुरावे जनते समोर आणावेत, असे आवाहनआंबेडकर यांनी केले आहे.

हेही वाचा- Assembly Election 2022 : गोव्यात काँग्रेसचे आमदार नजरकैदेत, निकालानंतर आमदार फुटण्याची भीती?

जुने सभागृह बरखास्त होण्याआधीच नवीन सभागृह झाले पाहिजे
राज्यातील आणि देशातील जिल्हा परिषद महानगरपालिका, नगरपालिका निवडणुकीसंदर्भात निवडणूक आयोगाला डिलीमीटेशनचे अधिकार देण्यात आले आहेत. दरम्यानच्या काळात याचा गैरवापर झाला आहे. पुर्वीच्या सदस्यांचा कालावधी संपण्याअगोदर नवीन सदस्यांची बॉडी झाली पाहिजे. शपथग्रहण झाला पाहिजे. यामध्ये कोणताही खंड पडता कामा नये. सभागृह चिरंतर असते अशी संविधानैक तरतूद आहे. त्यामुळे प्रशासक नेमण्याची कोणतीही तरतूद नाही. घटनेच्या आदेशानुसार जुने सभागृह बरखास्त होण्याआधीच नवीन सभागृह झाले पाहिजे. ही जबाबदारी निवडणूक आयोगाची असून त्यांनी व्यवस्थित पार पाडावी. यावर कॅबिनेटचा निर्णय बंधनकारक नाही, असेही यावेळी आंबेडकर म्हणाले आहेत.

ईडीच्या कोणत्या अधिकाऱ्यांनी पैसे कमवले त्यांची यादी द्यावी
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ईडीच्या कोणत्या अधिकाऱ्यांनी पैसे कमवले, त्यांची यादी द्यावी. संबंधित प्रकरण न्यायालयात दाखल करावे. सध्या आयाराम गयाराम यांचे राजकारण वाढत चालले आहे. तत्वशुन्य राजकारणाची सुरुवात झाली आहे. साचलेपणा आला की त्यामध्ये किडे पडायला सुरुवात होते. मिश्र सरकारमुळे एकमेकांच्या चोरीवर अंकुश ठेवता येत असल्याचे सांगून लोकांना एकहाती सरकार नको, असेही आंबेडकर यांनी बोलून दाखवले आहे.

Last Updated : Mar 8, 2022, 3:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.