अहमदनगर - पूर्वीच्या फडणवीस सरकारची 'जलयुक्त शिवार योजना' गुंडाळत नव्याने 'मुख्यमंत्री जलसंधारण योजने'साठी दोन हजार कोटीची तरतूद आज ठाकरे सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पात केली आहे. या तरतुदीसह सौरपम्प आदींसाठी अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदींचे स्वागत आदर्शग्राम संकल्प समितीचे कार्याध्यक्ष तथा पद्मश्री पुरस्कार विजेते पोपटराव पवार यांनी केले आहे.
आज सादर झालेल्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी अर्थमंत्र्यांनी घोषित केलेल्या अनेक तरतुदींचे पोपटराव पवार यांनी स्वागत केले. मात्र, नियमित कर्ज फेडणाऱया शेतकऱ्यांना सरकारने वाढवून दिलेली पन्नास हजारांची सूट एक लाख रुपयांपर्यंत हवी होती, कारण नियमितपणे कर्ज फेडणाऱया शेतकऱ्यांच्या संख्येत त्यामुळे वाढ होऊ शकते आणि सरकार आपल्याला न्याय देते, अशी भावना त्यांच्यात राहील, असे मत त्यांनी व्यक्त केले. मात्र, एकंदरीत अजित पवार यांनी सादर केलेला अर्थसंकल्प चांगला असल्याची भावना पोपटराव पवार यांनी व्यक्त केली.
हेही वाचा -