अहमदनगर - बाजारपेठेत दिवाळीच्या सायंकाळी सुरू असलेला हा गोंधळ पाहून सहाजिकच आपल्याला वाटेल ही व्यक्ती एखाद्या सामाजिक प्रश्नावर आंदोलन करत असेल, आणि पोलिसांवर रोष व्यक्त करत असेल.. पोलीस व्यक्तीला समजवत होते आणि गाडीमध्ये बसवण्याचा प्रयत्न करत होते, मात्र काही केल्या ही व्यक्ती पोलीस गाडीत बसण्यास तयार नव्हती. त्याचबरोबर सोबत असलेली त्याची पत्नी रडत पोलिसांना दूषणे देत होती.
काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध पत्रकार अर्णव गोस्वामींना त्यांच्या घरातून ज्या पद्धतीने ताब्यात घेण्यात आले, त्याच पद्धतीचा हा प्रकार अहमदनगर मधील बाजारपेठेतील महात्मा गांधी रस्त्यावर अनेक वेळ सुरू होता. दिवाळीची खरेदी करायला आलेले नगरकर हा लाखो देखा हाल पाहत होते. अर्थात कोरोनाचा काळ अजून ओसरला नसल्याने मास्क चेहऱ्यावर नसल्याने या दाम्पत्याला पोलिसांनी अडवले.
विनामास्क दंड भरण्यास नकार
हे दाम्पत्य नगर तालुक्यातील टाकळी खातगाव या गावातील असून पुण्यामध्ये नोकरीस आहे. दीपावलीच्या सणानिमित्ताने गावाकडे आले असताना आज बुधवारी सायंकाळी नगरच्या महात्मा गांधी रस्त्यावरील बाजारपेठेत खरेदीसाठी आले होते. मात्र, यावेळी त्यांनी चेहऱ्यावर मास्क लावलेला नव्हता. महानगरपालिकेला जी कारवाई पार पाडायची सध्या ती नगर शहर पोलीस पाडत असून या दाम्पत्याला पोलिसांनी अडवले आणि शंभर रुपये दंडाची पावती भरावी लागेल, असे सांगितले. मात्र, ही पावती फाडण्यास त्या दाम्पत्याने चक्क पोलिसांना नकार दिला. त्यातून दाम्पत्य आणि पोलिसांत शाब्दिक चकमक उडाली.
या दाम्पत्याची वादावादी सुरू झाली. ती शब्द-शब्दानुसार वाढत जात वाढली आणि पोलिसांनी आपला खाक्या दाखवत या दाम्पत्याला ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर जो गोंधळ सुरू झाला तो पाहण्यासारखा होता. कारण या दाम्पत्याने दंड भरण्यास नकार देतानाच पोलीस चुकीची कारवाई करत आहेत. आम्ही गाडीवर असताना मास्क चेहऱ्याच्या खाली होता. मात्र, या परिस्थितीमध्ये गर्दी असताना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे खाली होतो, असे कारण दिले. अखेर पोलिसांनी या दाम्पत्याला ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले. या दाम्पत्यावर साथरोग नियंत्रण कायदा आणि त्याच बरोबर शासकीय कामात अडथळा आदी कलमांन्वये कारवाई करण्याचे काम सुरू करण्यात आले.